युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज !!जय जिजाऊ जय शिवराय!!


युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

जय जिजाऊ जय शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी1630ला किल्ले शिवनेरी येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे त्या काळातील मातब्बर सरदार सेनानी होते.शहाजीराजे हे गनिमी युद्धाच्या सुरुवातीच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. त्यांनी भोसले कुटुंबाला वेगळेपण दिले. तंजावर, कोल्हापूर, सातारा ही मूळ राज्येही भोसले घराण्याची देणगी आहेत.

मातोश्री राजमाता जिजाऊ या मूळच्या शिंदखेडा येथील जाधव घराण्यातील होत्या.छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब शौर्य, नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी शिवाजी महाराजाना दिला. त्यांचे वडील राजेलखुजी जाधव हे त्या काळातील मातब्बर सरदार पराक्रमी होते.

छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. (महाराज)1630ते 1680 हे एक महान भारतीय राजे होते. त्यांनी महाराष्ट्र मध्ये रयतेचे राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याचा पाया घातला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मिती मध्ये अनेक बलाढ्य सत्तांशी सामना करावा लागला. त्यामध्ये विजापूरचा आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल साम्राज्याचा बादशहा औरंगजेब तसेच तर स्थानिक अनेक विविध सत्तांचा पण विरोध मोडून काढून. राज्य निर्माण करावे लागेल.1674 मध्ये रायगड येथे महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि ते मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले.

त्यावेळेस त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन करून शिस्तबद्ध सुव्यवस्थित शासन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी युद्ध आणि विज्ञान यांची सांगड घालून अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी निर्माण केल्या. गनिमी कावा तंत्राचे नवनवीन प्रयोग करून. स्वराज्य वाढवल. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय पद्धत. न्यायाचे व समतेचे शिष्टाचार पुनर्जीवित केले.

स्वराज्य निर्मितीची ओढ

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज व व राजमाता जिजाऊ त्यांच्या संस्कार मधून घडलेले शिवाजी महाराज. शिवनेरी माऊली आणि पुणे त्यांचे बालपण गेले अनेक संदर्भातून दिसते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांनी पुणे इंदापूर येथील जहागिरी ची व्यवस्था राजमाता जिजाऊ व शिवाजी महाराज त्यांच्याकडे सोपवली. जहागिरीची व्यवस्था राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज नेतृत्वाखाली पाहिली जायची. जिजामाते सारखाच कणखरपणा छत्रपती शिवाजी महाराजां मध्ये दिसून येतो. देशासाठी असलेले प्रेम, कठीण प्रसंगातून बाहेर येण्याचे ध्येय, अशा अनेक संस्कार राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजेंनी बाल शिवाजी वरती केले होते. माता पित्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीची ओढ लागली होती. स्वतःचे राज्य निर्माण करायचा असेल टीकवायच असेल तर सभोवतालची गड किल्ले ताब्यात पाहिजेत. अस महाराजांना वाटू लागलं.

पुढे अनेक किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आणि त्यांनी घेतली सुद्धा. पुण्याजवळील किल्ले शिवाजी महाराजांनी केलेल्या सुरुवात केली. मध्ये तोरणा किल्ला, पडके किल्ले, टेकड्या महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन. स्वराज्य निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे लहानपणीचे सौंगडी तानाजी मालुसरे,नेताजी पालकर, येसाजी कंक,कान्होजी जेधे,बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे व ज्ञात-अज्ञात अनेक निष्ठावंत माणसे महाराजांनी कमवली.त्यानंतर महाराष्ट्रातील साडेतीनशे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले.

रायरेश्वर किल्ला हा स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी. आपल्या साथीदारांना घेऊन रायरेश्वर शिवमंदिर येते रक्ता अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी पराक्रमी मित्र समूह निर्माण व त्यांना शिवाजी महाराज मावळा असे म्हणत. या मूठभर मावळ्यांनी मध्ये महाराजांनी देश प्रेम जागृत करून स्वराज्या कार्या साठी सामावून घेतले. लढाईचे प्रशिक्षण दिले, लढाऊ हत्यारे तयार केली, याचे प्रशिक्षण दिले. याच मावळ्यानीं रक्ताचं पाणी करुन विजापूर ते दिल्ली येथील सत्तांना झुकायला भाग पाडले. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा सिंहगड पुरंदर असे किल्ले महाराजांनी बादशहाकडून जिकूंन घेतले.आणि पुणे प्रांतावर वर्चस्व सिद्ध केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह14मे 1640 फलटण राजे निंबाळकर मातब्बर सरदार यांच्या कन्या सईबाई यांच्याशी झाला. पुढे महाराजांनी अनेक लग्न केली. मराठा सरदारांना एक छताखाली आणण्याचा प्रयत्न केला.

सईबाई निंबाळकर यांच्या नंतर तळबीड येथील मोहिते सरदार यांच्या कन्या सोयराबाई मोहिते यांच्याशी झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांना सईबाई यांच्या पासून छत्रपती संभाजी महाराज( 1657ते 1689)व सोयराबाई पासून छत्रपती राजाराम त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला.(1670ते 1700) असे दोन सुपुत्र लाभले.

राज्य विस्तार:- शिवाजी महाराजांनी महाराजांनीं साडेतीनशे किल्ल्यावरती भगवा फडकवला. महाराष्ट्राबाहेर जिंजीचा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्य वाढवल.

अफजलखान वध:- प्रतापगडची लढाई महाराष्ट्रातील रोमांचित इतिहासिक लढाई मानली जाते. स्वराज्य वर स्वारी करण्यासाठी आलेला अफजलखान अतिशय जुलूम, अत्याचारी होता. तू येता अनेक मंदिरे उद्ध्वस्त करत आला. असे अनेक संदर्भ मिळतात. अफजल रुपी आलेल्या संकटाला धैर्याने सामोरे जाऊन बलाढ्य अफजलखानाचा वध केला.

पन्हाळगडाचा वेढा. पन्हाळगडचा वेढा मध्ये महाराज अडकले. प्रदीर्घ काळ चाललेल्या सिद्धी जोहर च्या वेड्यातून त्यातून महाराजांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शत्रूसैन्याला हुलकावणी देण्यासाठी महाराजांनी गनिमी कावा चा उपयोग करून महाराज घराच्या बाहेर पडले.शिवा काशिद या मावळ्यांने महाराजांसाठी बलिदान दिलं. पुढे विशाळगडला जात असताना पावनखिंड मध्ये पाटी लागलेल्या शत्रूसैन्याला थोपवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी बलिदान दिलं. त्यांच्यासोबत रायची बादल देशमुख,काटे वगैरे अनेक मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. पुढे महाराजांना सुर्वे नावाच्या मराठा सरदारांची युद्ध करून विशाल गडावर जावं लागलं. महाराज सुखरुप विशाळगडावर पोहोचले.

सुरतेची लूट:- मोगल सरदार शाहिस्तेखान महाराष्ट्र मध्ये तीन वर्षात तळ ठोकून होता. या काळामध्ये मराठा साम्राज्याची महसूल कमी झाला. परिणामी स्वराज्याचा खजिना खाली झाला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी धाडशी पाऊल रयतेसाठी उचलले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख त्याच बहिर्जी नाईक यांच्यामार्फत सुरतेच्या ऐश्वर्याची माहिती मिळाली. रायगडापासून 325 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असणाऱ्या सुरत हे मुघलांच मोठे उत्पन्न असणारे स्थान होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला करून लूटले व सर्व संपत्ती स्वराज्य कार्यसाठी लावली.

पुरंदरचा तह:-

मिर्झा राजा जयसिंग ऐंशी हजार स्वार सैन्यासोबत घेऊन , बरोबरी दिलेरखान, पाच हजार पठान घेऊन शिवाजी महाराजांचे पारिपत्य करण्यासाठी औरंगजेबाने महाराष्ट्रात पाठवला . मिर्झाराजांनी पुढे पुरंदरला वेढा घातला. दिलेरखानाने वज्रगडाचा ताबा घेतला. वज्रगडावरून पुरंदरवर तोफांचा मारा सुरू करण्यात आला. तोफांच्या हल्ल्याने पुरंदरच्या तटबंदीला खिण्डार पडले. मोगल सेनेने किल्ल्यात प्रवेश केला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले. मुरारबाजी पडले आणि त्याच बरोबर पुरंदर ही पडला. हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंहाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून १६६५ साली इतिहास प्रसिद्ध ‘पुरंदरचा तह’ झाला.

यात २३ किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले. त्यांची नावे अशी,

१. अंकोला
२.  कर्नाळा
३. कोंढाणा ( सिंहगड )
४  कोहोज
५. खिरदुर्ग  (सागरगड)
६. तिकोना
७. तुग
८. नंगगड
९. नरदुर्ग
१०. पळसगड
११. किल्ले पुरंदर
१२.  प्रबळगड -मुरंजन
१३. भण्डारगड
१४. मनरंजन
१५. मानगड
१६. मार्गगड
१७. माहुलीगड
१८. रुद्रमाळ
१९.  रोहिडा किल्ला
२०. लोहगड
२१. वसंत गड
२२. विसापूर चा किल्ला
२३.  सोनगड

महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर हालचाली

आरमार उभारणी:-

मोगल व इंग्रज संघर्ष:- मोगलांच्या सर्व आघाड्यांवर ती एकटे शिवाजी महाराज पुरून उरले. हिंदुस्तानचा बादशहा औरंगजेब याला महाराष्ट्रातील यावं लागलं. आणि त्याला महाराष्ट्र मध्येच संपाव लागलं.

इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराज यांना शरण यावं लागलं. शेवटी नाईलाजाने 1774 इंग्रजांनी महाराजांशी तह केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांची दूरदृष्टी अनेक गोष्टींतून जाणवते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे महाराजांनी जाणलं होतं. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आदी जलदुर्गांमधलं वेगळेपण महाराजांनी जाणल .वेळच्या परकीय सत्तांमध्ये मोघल, जंजिऱ्याचे सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे प्रामुख्यानं होते. यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर मोठा धाक होता. या तिघांना कर दिल्याशिवाय कोणत्याही नौका समुद्रात विहार करू शकत नसत. मराठ्यांच्या व्यापाराला हा मोठा अडथळा होता. शिवरायांनी आरमारनिर्मितीचा विचार करून आरामार निर्माण केलं.

आदिलशहा व इंग्रज संघर्ष:-1673ला महाराजांनी विजापूरवर हल्ला केला. महाराजांनी आदिलशहाचा प्रदेश जिंकून घेतला. परंतु विजापूर सरदार व मोगल यांनी युती करून महाराजांवर हल्ला केला. परंतु मराठ्यांनी न घाबरता त्यांना पळवून लावले. ठाणे,लक्ष्मीश्वर, संपगांव, हुबळी अशी ठाणे महाराजांनी लुटली. तिकडं कोकणामध्ये मोगल आणि सिद्धी चा महाराजांनी दणदणीत पराभव केला.

राज्याभिषेक:- नंदान्त क्षत्रियकुलम् आणि पृथ्वी नि:क्षत्रिय
या वर्णद्वेशी सिद्धांताला आजच पायदळी तुडवून शिवछत्रपती नावाचा बळीराजा सिंहासनाधिस्त झाला.

“मर्हाटा पातशहा एवढा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही.”


शालिवाहन शके 1596, आनंद नाम संवस्तरे, ज्येष्ठ मासी शुद्ध 13 स, मंदवासरे यादिवशी ” मर्हाटा पातशाहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.” याच दिवसापासून शिवशकास सुरुवात झाली.

राज्याभिषेकानंतर मोहिमा

दक्षिण दिग्विजय मोहिमेत:- दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये महाराजांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशहा ची मदत मागितली. कुतुबशहाने सुद्धा त्यांना आदर सन्मान करून महाराजांना धन्य केलं. चेन्नई पासून जवळ असणारा जिंजी किल्ला महाराजांनी जिंकून घेऊन आसपासचा प्रदेश काबीज केला. तू जवळ असनारा वेल्लोरचा किल्ला महाराजांनी जिंकला. महाराजांनी वीस लक्ष उत्पन्नाचा कर्नाटकातील प्रदेश जिंकला.

शासन व्यवस्था:- छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य आता साम्राज्य मधील रुपांतरीत होत होतं. स्वराज्याच्या प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी व सूत्रबद्धता येण्यासाठी. महाराजांनी मंत्री मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यास अष्टप्रधान मंडळ असे म्हणतात. आमात्य,वित्त आणि महसूल, सुमंत, सैन्याच्या प्रधानास सरसेनापती असे म्हणत. धर्मादाय आणि धार्मिक कार्य करणारे मंत्री म्हणजे पंडितराव होय.

छत्रपती शिवराजी महाराज याची वंशावळ बाबाजी भोसले याच्या पासून खालील टेबल मध्ये पाहावी

अशा अनेक प्रसंगांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुशल नियोजनाने यशस्वी झाले. स्वराज्य निर्माण केले आणि वाढवले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु

मार्च 1680 च्या शेवटी हनुमान जयंती पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज तापाने आजारी पडले.3 एप्रिल 1680च्या सुमारास महाराज स्वर्गवासी झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन व पराक्रमावर 60 ते 65 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली गेलेली आहे.अनेक चित्रपट,कादंबऱ्या, नाटके, काही ललित साहित्य, चरित्र लिहिलेली आहेत.

©®लेखक :-नितीन घाडगे

लेखनामध्ये काही चुका आढळल्यास कळवावे, त्या त्वरित दुरुस्त केल्या जातील. धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...