राष्ट्रीय मतदान दीनाच्या शुभेच्छा. तुमचा अधिकार तुमचं मत.वाया जाऊ देऊ नका.

 कोणत्याही भूल थापांना बळी न पडता, कोणत्याही विकृत दहशतीला बळी न पडता, पैशाच्या मोहाला बळी न पडता. *मटनाचा तुकड्याला दारूच्या घोटाळा" बळी न पडता. सर्वगुणसंपन्न  उत्तम असा,लोकांना आपला वाटणारा लोक प्रतिनिधी उमेदवार निवडून देण ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी अन हक्क आहे.
 सर्वच पक्ष चागली विचारधारा घेऊन पुढे येत असतात.  परंतु त्या पक्षातील उमेदवार पात्रतेचे आहेत का नाही. हे तपासन हे प्रत्येक भारतीयच नागरिक या नात्याने तपासणे कर्तव्य आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य आहे.
 भारताचा राजकीय इतिहासात या आधी 1-1 च्या मताने सरकार बनले आणि कोसळल सुद्धा आहेत. अशी उदारणे भरपूर आहेत.मी या ठिकाणी माडनार नाही म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे, आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग घेतला पाहिजे,

 तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचावर येऊ शकेल.या मध्ये प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची.

 प्रत्येक भारतीयांनी मतदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेव्हाच लोकशाही निरोगी  होऊ शकेल किंवा लोकशाही मजबूत करण्याची ही एक प्रक्रिया आहे असा समजा.

 आशिया खंडातील नावे संपूर्ण जगातील मोठी लोकशाही भारताची आहे. 18 वर्षावरील नागरिकांना देशात मत देण्याचे स्वातंत्र्य आहे. भारतीय सरकार बनवण्यामध्ये भारतामध्ये प्रत्येक नागरिकांच्या सहभागातून सरकार बनल जातं ही खूप महत्वाचं आहे.


👉 मतदानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपलं मत मांडण्याचा हक्क बजावत असतो.

👉निवडणुकी आधी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार जनतेसमोर आपले विचार व अजेंडा मांडतात.

👉दुसरीकडे, ज्या उमेदवाराच्या अजेंड्यावर बहुतेक लोक आपली संमती व्यक्त करतात आणि सर्वाधिक मतदान करतात, त्याच उमेदवाराला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जाते.


निवडून आलेले उमेदवा देशातील सर्व विकासात्मक कामांसाठी जबाबदार तो उमेदवार असतो.

प्रत्येक नागरिकाने त्यांच्या मताधिकारांचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि कोणताही प्रतिनिधी निवडण्यास सहकार्य केले पाहिजे जो कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता देशाच्या विकासात योगदान देईल असा.

 जनहितासाठी आणि त्याच्या विकासासाठी कार्य करेल अशाच उमेदवार निवडा.

👉विचार करा.
उमेदवार पैसे वाटून मत मिळवतो का?
उमेदवार गुंड व गुंड प्रवृत्तीचा दहशत माजूवून मत मिळवतो का?
उमेदवार त्या पद सांभाळण्याच्या क्षमतेचा आहे का?
उमेदवार भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा आहे का?
उमेदवार चोर, दरोडे खोर, गुन्हेगारी वृत्तीचा नाही ना?
 



 


लेखक @
नितीन घाडगे 

 







Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...