पायदळ एक वादळ.दक्षिण दिग्विजय गरुडभरारी जिंजी तमिळनाडू ते सिंहगड 1100 किलोमीटर पायी चालत मोहीमेचे ठीक ठिकाणी शिवप्रेमी बांधवाकडून स्वागत होत आहे.
"पायदळ एक वादळ"मा.मारुती गोळे आबासाहेब व त्याचे सहकारी यांची*दक्षिण दिग्विजय गरुडभरारी जिंजी तमिळनाडू ते सिंहगड 1100 किलोमीटर पायी चालत मोहीमेचे अनेक ठिकाणी शिवप्रेमी कडून जागोजागी स्वागत करण्यात येत आहे.
या मोहीमेच्या पाठीमागे संकल्पना व ती प्रत्यक्षात राबवण्यासाठी एडवोकेट मारुती बाबा गोळे व त्यांचे सहकारी तन-मन-धन आणि वेळ देऊन करत आहेत.
सिंहगड येथील पवित्र जल कुंडातील जलाने, जिंजी येथील राजाराम महाराजांचे तक्ताचे पूजन करून एडवोकेट मारुती गोळे व त्यांचे सहकारी यांनी 26डिसेंबर 2021सुरु केलेली पायी मोहीमेचे अनेक ठिकाणी शिवप्रेमी कडून जागोजागी स्वागत करण्यात येत आहे.
नेर्ले ता वाळवा येथील ग्रामस्थ यांचे वतीने कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक,माजी सरपंच, मा. संभाजी पाटील आप्पा यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रीय क्षत्रिय जणसंसद सांगली जिल्हा अध्यक्ष मा.विरसिंह पाटील,पै.संजय पाटील, प्रसाद पाटील,वैभव गावडे,बंटी पाटील,शंतनू वंजारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ॲड.मारुती गोळे यांच्या पायी जिंजी ते सिंहगड अशी अकराशे किलोमीटरची गरुडभरारी मोहीमेची सांगता झाली. ‘रक्तदाब, मधुमेह मुक्त भारत’ याचा प्रचार त्यांनी यामोहिमेतून केला. त्यांच्यासोबत सागर थरकुडे, विक्रम पवार सोबत होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असल्याने १३५ कोटी भारतीयांना ही मोहीम त्यांनी अर्पण केली.
सिंहगडावर खेडशिवापूर कल्याण मार्गे आले. शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता त्यांनी कल्याण दरवाज्यात पोचले. तेथे मित्र परिवाराच्या वतीने डॉ.नंदकिशोर मते, ॲड.प्रकाश केदारी, यांनी हार घालून आणि पेढा भरवून स्वागत केले. श्रीअमृतेश्वर मंदिर, नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी व श्री कोंढाणश्वर मंदिर येथे नतमस्तक झाले. त्या नंतर ते सिंहगडावरील छत्रपती राजारामांच्या समाधीला अभिषेक घातला. जिंजी(तामिळनाडू) येथून आणलेल्या पाण्याने सिंहगडावरील छत्रपती राजारामांच्या समाधीला अभिषेक घातला.
खुप छान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete