२७ जानेवारी इ.स.१६८०
*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*२७ जानेवारी इ.स.१६५८*
छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड" जिंकून स्वराज्यात आणला.
ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला.
*२७ जानेवारी इ.स.१६६७*
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो :
"धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शिवाजीची तुलना करायची झाल्यास ती सिझर आणि सिकंदर ह्याच्याशी करावी लागेल. तो नाही अशी एकही जागा नाही तो सबंध आशियाशी युध्द करीत आहे."
*२७ जानेवारी इ.स.१६८०*
*(माघ शुद्ध ६, षष्ठी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार)*
उंदेरीवर पुन्हा आरमारी युद्ध!
पहाटे छत्रपती शिवरायांच्या आरमारी तुकडीने पुन्हा उंदेरीसाठी सिद्धी बरोबर तुंबळ युद्ध आरंभले. दौलतखानाच्या नेतृत्वात सुमारे ३० जहाजे व शेकडो सैनिकांनी उंदेरीवर पुन्हा एकदा एल्गार मांडला. या युद्धात सिद्धीचे तसेच मराठ्यांच्या आरमाराचेही बरेच नुकसान झाले.
*२७ जानेवारी इ.स.१६८४*
सुमारास क्रृष्णा नदीच्या काठावर मराठे सैनिकांच्या एका तुकडीची युद्ध करण्याची तयारी चालू होती. अचानकपणे खानजान बहादूर व त्याचा मुलगा हे मराठ्यांवर तुटून पडले. अनेक लोक मारले गेले. बायकामाणसे कैद झाली. अखबारात खोट्या बातम्या दिल्या जात असत ह्याचे हे एक उदाहरण आहे. "मराठे सैनिक लढाईवर आपल्या बायकांना कधीही येत नसत."
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
Comments
Post a Comment