आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १३९९*
तैमूरलंग भारतांतून अगणित लूट घेऊन आणि मनसोक्तपणे रक्तपात करून आपल्या मायदेशी गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १६३७*
बाल शिवराय व राजमाता जिजाऊ खेडेबारे मावळ (खेड शिवापूर-शिवगंगा खोरे) येथे वास्तव्यास आले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १६६२*
पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचा जन्म.
(मृत्यू: १२ एप्रिल १७२०)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १६६४*
महाराज त्र्यंबकेश्वरहून दि. १ जानेवारी १६६४ रोजी जव्हारपाशी सिरपांव येथे पोहोचले. सुदैवाने जव्हारच्या राजाने महाराजांना अजिबात विरोध केला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १६७१*
छत्रपती शिवरायांनी खान्देशातील धरणगावातील इंग्रजांची वखार लुटली. आंग्ल नवीन वर्ष साजरे करत होते अन शिवछत्रपती त्यांचा काळ बनून उपस्थित राहिले ते आजच्याच दिवशी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १६८१*
इंग्रजांच्या आश्रयाने मराठी मूलखाला त्रास देणाऱ्या सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी संभाजी महाराजांनी इंग्रजांशी बोलणी करण्यासाठी आपला वकील मुंबईला पाठवला. संभाजीराजेंचे वकील आवजी पंडित यांनी इंग्रजांना सांगितले की शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे इंग्रजानी जर सिद्दीचा बंदोबस्त केला नाही तर संभाजीराजे इंग्रजांशी युद्ध पुकारतील. आवजी पंडित मुंबईत आल्याचे पाहून मराठ्यांच्या आरमाराला तोंड द्यायची तयारी नसल्याने सिद्दीने आपले आरमार बंदराच्या बाहेर नांगरले. त्यानंतर शंभुराजेंच्या आणि पर्यायाने मराठ्यांच्या सामर्थ्याची पुरेपुर माहिती व परिणामांची त्यांना असलेली भीती इंग्रजानी पत्र पाठवून लंडनला कळवली होती. "संभाजीराजे इंग्रजांशी मैत्री राखण्यासाठी तयार असले तरी ते यापुढे हा उपद्रव सहन करणार नाहीत. सिद्दीचा मदत ताबडतोब थांबवून त्याला आरमारासह बाहेर काढले नाही आणि त्याची मदत चालू राहिली तर संभाजी महाराजांनी मुंबईवर स्वारी करण्याचा निश्चय केला आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १६८२*
छत्रपती संभाजी महाराजांनी डिचोलीच्या सुभेदाराची बदली केली आणि शिवाजी फडनाइकांची नेमणूक केली. ही बातमी समजल्यावर विजरई येसाजी गंभिरराव यांस कळवितो की, "आमचे या दोन्ही राज्यांत सलोखा निर्माण व्हावा ही तळमळीची इच्छा आहे".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १७०१*
परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळविला. येथे बादशहाने आपल्या शहाजाद्याला व इतर सरदारांना सैन्यासह निरनिराळ्या शहरात जाऊन विश्रांती घेण्यास पाठविले. त्यांनी त्याप्रमाणे केले व त्यामुळे त्यास व त्यांचे घोड्यांस भरपूर दाणागोटा मिळाल्यामुळे ते आनंदित झाले. बादशहा ३० ऑगस्ट १७०० ला खवासपुरी येथे जाऊन राहिला. तेथे असताना माण नदीस अचानक मोठा पूर आल्याने चार-पाच हजार लोक, हत्ती, घोडे, वगैरे वाहून गेले व लष्कराचे फार नुकसान झाले. नंतर १६ डिसेंबर १७०० ला बादशहाने मिरजेस जाण्यासाठी आपला तळ हालविला व १ जानेवारी १७०१ ला बादशाही सैन्य मिरजेस आले. त्यानंतर तो २ महिने तिथेच मुक्काम ठोकून राहिला. त्या मुदतीत त्याने पन्हाळगडावर स्वारी करण्याचे ठरविले. त्यासाठी उत्तर हिंदुस्थानातील ताज्या दमाची फौज व सामानसुमान मिरजेस येऊन पोहचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १७५६*
निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १८४८*
महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. समाजाच्या विरोधात जाऊन एखादं चांगलं काम करायचं झालेतरी अंगावर दगडी पडतात. सगळ्यात या दगडी खाण्याची हिम्मत असतेच असे नाही, मनात खूप असते ओ पण समाज काय म्हणेल या विचारातून उठणाऱ्या मनातल्या लाटा पुन्हा मनातचं विरून जातात. पण क्रांतीज्योती कधीच डगमगली नाही, नावाप्रमाणेचं जोतीबानं अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी सुरवात केली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१ जानेवारी १९१९*
छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४