Posts

Showing posts from April, 2022

किल्ले सरसगड 🚩**ता.सुधागड जि.रायगड*

Image
*🚩 किल्ले सरसगड 🚩* *ता.सुधागड जि.रायगड* *रायगड जिल्ह्यातील पाली या गावाच्या पूर्वेस "सरसगड किल्ला" आहे.* 🚩🚩🚩 या किल्ल्याच्या पूर्वेला १०-१२ कि.मी. वर सुधागड हा किल्ला आहे. धनगड, कोरीगड, तेलबैला, खंडाळा घाट, नागफणी, जांभूळपाडा, अंबा नदी, गरम पाण्याची कुंडे असणारे उन्हेरे गाव असा मुलूख या गडावरून दिसतो. किल्ल्याच्या पाथ्याला असलेल्या पाली गावात प्रसिद्ध अष्टविनायक गणपती बल्लाळेश्वराचे भव्य मंदिर आहे. सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यामधे आहे.🪴🪴 *🚩 इतिहास:-* इ.स. १३४६ मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर मलिक अहमद ( निजामशाहीचा संस्थापक) कोकणात उतरला. त्या वेळी कोरीगड, सुधागड, सरसगड, सुरगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले.नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले.🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराजांनी नारो मुकुंदाना सुधागड व सरसगडाची सबनिशी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सुधागडच्या देखभालीसाठी पाच हजार होन आणि सरसगडासाठी दोन हजार होन दिले. पुढे भोर संस्थानात या किल्ल्य

श्री मोरया गोसावींच्या परम भक्तीमुळेच त्यांचे नाव श्री गणेशाबरोबर जोडले गेले व संपूर्ण जगात जयघोष सुरु झाला ....

🌹 *चिंचवडचे श्री मोरया गोसावी* म्हणजेच आपले गणपती बापा मोरया मधले *मोरया* 🌹 श्री मोरया गोसावी महाराज हे १४ व्या शतकातील गाणपत्य संप्रदायातील संत होते. ते मोठे गणेशभक्त होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील मोरगाव येथे झाला. त्यांनी मोरगाव येथे मयुरेश्वराची आराधना केली. अष्टविनायक यात्रेची सुरुवात करण्याचे श्रेय पण त्यांनाच देण्यात येते. ते संत एकनाथ महाराज यांचे समकालीन होते. त्यांनी पुण्यातील चिंचवड येथे संजीवन समाधी घेतली.  असे म्हटले जाते की,गणपतीने मोरयास असा सक्षात्कार करून दिला की "मी (गणपती) तुझ्या पूजे करीता चिंचवड येथे प्रकट होणार आहे.मोरया गोसावी महाराज यांना कऱ्हा नदीच्या पात्रात तांदळा स्वरूपातील गणेश मूर्ती (मंगलमूर्ती) प्राप्त झाली.त्यानंतर मोरया गोसावी महाराज मोरगावहून चिंचवड येथे जाऊन स्थायिक झाले.तेथे त्यांनी गणपती मंदीर उभारले व त्यात कर्हेत प्राप्त झालेल्या गणेशमुर्तीची (मंगलमूर्तीची ) स्थापना केली काही कळाने मोरया गोसावी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. श्री मोरयांना चिंतामणी नावाचा मुलगा होता,तो गणेशावतार होता. चिंचवड येथील मोरया गोसावी महाराजांची समाधी आणि त्यांनी ऊ

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ एप्रिल १६६१* छत्रपती शिवरायांनी कोकणातील आताच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळील “प्रचीतगड उर्फ उचीतगड” जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ एप्रिल १६७९* छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदृष्टीचे धोरण व त्या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत आहेत ते गड, कोट बांधणारे म्हणून.. पण स्वराज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी देसाई, देशमुख यांना तटबंदी असलेले वाडे बांधून द्यायचे नाहीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होते. या धोरणाची स्वराज्यात किती काटेकोर अंमलबजावणी केली जात होती त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बंकापूरचा देशाधिकारी बाबाजी शिवदेव याला धाडलेले खालील आज्ञापत्र. या आज्ञापत्रात "सांउसीचा कोट देखील पाया पाडून टाकणे" असे फर्माविले आहे. कर्नाटकातील तत्कालीन कुंदगोळ परगण्यात मौजे सांउशी हा गाव येत होता. हा गाव केंचणगौडा देसाई यास इनाम होता. महाराजांनी त्याचे इनाम चालू ठेवले मात्र गाव त्याच्या ताब्यात देण्याअगोदर सांउसी गावची तटबंदी पायासकट पाडावी अशी आज्ञा केली. सदर पत्राची आताच्या कालगणनेप

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ एप्रिल १६४५* हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी यांनी वयाच्या १६व्या वर्षी म्हणजेच २७ एप्रिल १६४५ ला रायरेश्वर येथे स्वराज्याची शपथ घेतली. सह्याद्रीतील प्राचीन रायरेश्वर मंदिराला शिवाजी छत्रपतींमुळे अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपली स्वराज्याची संकल्पना त्याची दूरदृष्टी काही मोजक्या परंतु विश्वासू आणि जिवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते आणि सोनोपंत डबीर अशा बारा मावळातील सवंगडी यांच्या समोर मांडली. त्या दिवसापासून सुरुवात झाली इतिहासातील काही सोनोरी क्षणांना, पाच मुसलमानी पातशाहींच्या विरोधात एकजूट होऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ एप्रिल १६८०* राजापूरच्या इंग्रजांनी आपल्या आपल्या वरीष्ठास पत्रे लिहून कळवले कि, छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व राज्यसूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. ठीकठिकाणच्या सुभेदारास व हवालदारास त्याने आपल्यापाशी बोला

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२६ एप्रिल इ.स.१६७५* मराठा फौजेने कारवारवर हल्ला केला. फोंडा काबीज होताच महाराजांनी त्वरेने हालचाल करून कारवार प्रांत जिंकून घेतला. ३ हजार मराठी घोडदळ व काही पायदळ एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शिवेश्वर किल्ल्याला वेढा घालून बसले.  *२६ एप्रिल इ.स.१६८०* (वैशाख शुद्ध अष्टमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार) संपूर्ण देश छत्रपती संभाजी महाराजांचा झाला.              छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण प्रदेशावर अंमल बसवून आपले सुभेदार रावजी पंडितांकरवी हुकूम जारी केला की, सर्वांनी किल्ले पन्हाळ्यास येऊनहिशेब द्यावेत. किल्ले रायगडावर जाण्याआधीचे राजकारण करण्यास व आपले बस्तान व्यवस्थित करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली. *२६ एप्रिल इ.स.१६८४* (वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार शनिवार) छत्रपती संभाजी महाराज बिरवाडीच्या किल्ल्यावर मुक्कामी. १६६१ मध्ये सिद्दीकडून दंडाराजापुरी जिंकल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला. छत्रपती संभाजीराजे व इंग्रज यांच्यातील तहाच्या अटी ;- केग्विन हा सातत्याने चार्लस राजाला संभाजी महाराज

शिराळा किल्ला सांगली जिल्हा किल्ला ब्लॉग नंबर 8

शिराळा किल्ला शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. या गावास बत्तीस शिराळा किंवा ३२ शिराळा या नावांनीही ओळखले जाते. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले आहेत शिराळा आणि प्रचीतगड. आढळतो. इथे असणारे अंबामातेचे मंदिर, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले मारुतीचे मंदिर, गोरक्षनाथानी इथे केलेले वास्तव्य, इथे असणारी पुरातन मंदिरे, या गावात महाराजांच्या काळात गोळा होत असलेल्या ३२ गावांच्या महसुलामुळे या गावाला पडलेले नाव म्हणजेच बत्तीस शिराळा. छत्रपती संभाजी महाराजांना गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी पकडले तेव्हा शिराळ्यात त्यांचा एक मुक्काम पडला होता. तेव्हा शिराळा गावच्या इनामदार आणि किल्ल्याचे किल्लेदार तुलाजी देशमुख आणि गावाचे दीक्षित यांनी त्यांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला होता; पण त्यात ते अयशस्वी झाले.

किल्ले बागणी सांगली किल्ले ब्लॉग नंबर 7

बागणी किल्ला वाळवा तालुक्यातील बागणी भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. वारणाकाठचे बागणी हे तीनशे वर्षापूर्वीचे नावाजलेले आणि गजबजलेले गाव होते, त्यावेळची येथे एक मोठी बाजारपेठ होती. शिवाय या जागेला ऐतिहासिकदृष्ट्याही महत्व होते. तेथे संभाजी महाराजांच्या काळाआधीपासून एक भुईकोट किल्ला होता. तो किल्ला आजही गावातील एक प्रमुख स्थान म्हणून ओळखला जातो. आज किल्ल्याची तटबंदी आणि भग्न वास्तू शिवाय पाह्ण्यासारखे काही शिल्लक नाही.बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्घ आहे. कवठेएकंद येथील श्री सिद्धराम मंदिर पाहण्यासारखे आहे. विजयादशमीच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.

किल्ला सांगली किंवा सांगलीचा किल्ला ब्लॉग नंबर 6

हा किल्ला भूईकोट किल्ला असून सांगली शहरात आहे. या किल्ल्याची उभारणी 1804मध्ये चिंतामणी पटवर्धन यांनी केली आहे असे सांगितलं जाते. सांगलीचा गणेशदुर्ग किल्ला प्राचीन इतिहास असलेल्या सांगली ह्या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या.सांगली या नावाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर सहा गल्ल्या होत्या. त्यावरून त्यास सांगली हे नाव पडले असावे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी जे गाव होते त्याला कानडी भाषेत सांगलकी म्हटले जाई. मराठीमध्ये त्याचे सांगली झाले असावे. अन्य एका आख्यायिकेनुसार वारणा व कृष्णा या नद्यांचा संगम सांगली येथे होतो. संगम या शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली हे नाव पडले असावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगल

रामगड (रामदुर्ग) छोटा किल्ला सांगाली जिल्हा ब्लॉग नंबर 5

सांगली जिल्ह्यामध्ये रामगड (रामदुर्ग) नावाचा एक अतिशय छोटा किल्ला आहे. किल्ल्याची उंची जेमेतेम १५० फूट आहे. जत हा सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुका. याच तालुक्यात [[जत कवठे महाकाळ रस्त्यावर जत अवघ्या ५ किमी अंतरावर रामपूर नावाचे गाव आहे. या गावात एक छोटा, देखणा व अप्रसिद्ध किल्ला लपला आहे त्याचे नाव रामगड. रामपूर गावाच्या मागच्याच टेकडीवर हा छोटेखानी किल्ला आहे. ही टेकडी इतकी छोटी आहेत की टेकडी चढायला सुरुवात करेपर्यंत माणूस किल्ल्याच्या महादरवाज्यात येऊन पोहोचतो. रामपूर गावाच्या मागे एक पाण्याची टाकी आहे तेथून अगदी पाचच मिनिटात रामगडाच्या ढासळलेल्या तटबंदीवरून किंवा प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करता येतो. इथल्या स्थानिकांना या किल्ल्याबद्दल कोणतीही आस्था दिसत नाही हे किल्याच्या दुरवस्थेवरूनच लक्षात येते. किल्ल्यामध्ये बाभळीचे भयंकर रान माजले आहे त्यामुळे येथे चालताना खूप काळजी घ्यावी लागते. रामगड किल्ल्याचे प्रवेशद्वार सुस्थितीत असून तटबंदी मात्र बरीचशी ढासळली आहे. तटबंदीमधेच एक दरवाजा अगदी साधेपणाने बांधलेला आहे ज्याची कमान अजून तरी टिकून आहे. दरवाज्याच्या आतील पहारेकऱ्यांच्या देवड

प्रचितगड किल्ला सांगली जिल्हा ब्लॉग नंबर 4

प्रचितगड  हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील  सगमेश्वर तालुक्याच्या ठिकाणा हुन सांगली जिल्हा हद्द मध्ये असणारा या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर पर्वतामधून वाट काढत जायचे म्हणजे बिकट परिस्थितीची व अनेक संकटांची प्रचिती घ्यावी लागते. गडावर जाण्याच्या वाटा शृंगारपूर गावामधून साडेचार तासांची अवघड चढण पार केल्यावर प्रचितगडावर पोहोचता येते. कंधारडोह येथून तीन तासांचे अंतर चालून गेल्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीचा मुकुटमणी असलेल्या प्रचितगडावर पोहोचता येते. नेरदवाडी येथून किमान सहा तासांची पायपीट करावी लागते. नेरदवाडीतून तीन तासांचे अंतर मळेघाटमार्गे पार केल्यावर सातारा जिल्ह्याची हद्द लागते. सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून मार्गक्रमण करीत कंधार या प्रसिद्ध डोहावर जावे लागते. कंधार डोहाची छायाचित्रे व माहिती इंटरनेटवर असल्याने देशाच्या विविध राज्यांतून असंख्य तरुण पर्यटक हा प्रसिद्ध डोह पाहण्यासाठी येतात.

किल्ले मच्छिंद्रगड किल्ला सांगली जिल्हा ब्लॉग नंबर 3

मच्छिंद्रगड  हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे.1776 च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे. नाव मच्छिंद्रगड उंची प्रकार गिरीदुर्ग  चढाईची श्रेणी मध्यम ठिकाण ,इस्लामपूर डोंगररांग सांगली सध्याची अवस्था व्यवस्थित स्थापना मच्छिंद्रगडावर जाण्यासाठी जवळचे कराड किंवा इस्लामपूर येथून जाता येते. कराड ते रेठरे कारखाना बसने रेठरे कारखाना येथे उतरुन तिथून खाजगी वाहनाने मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी उतरतून गडावर जावे. इस्लामपूरहून रेठरे कारखाना कडे बस किॅंवा खाजगी वाहनाने जाताना गडाच्या पायथ्याजवळ उतरता येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली, पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी या गडाचा किल्लेदार होता देवीसिंग. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला,तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील

किल्ले मंगळवेडा सांगली जिल्ह्या ब्किल्ला लॉग नंबर 2

सोलापूर पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण आहे. चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत. सोलापूरचा किल्ला, मंगळवेढा किल्ला आणि माचणूर किल्ला, सिध्देश्वर मंदिर (माहिती साईटवर आहे) दोन दिवसात सहज पाहून होतात. इतिहास : प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्‍या मुलाचा याठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. आठव्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली असे मानले जाते. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रम्हाचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ नष्ट झाले असले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते. आदिलशहाची

सांगली जिल्हा किल्ले ब्लॉग नंबर 1 किल्ले बानूरगड /भोपाळगड

किल्ले बाणूरगड  हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो, सांगली जिल्ह्यात खानापूर व आटपाडी ता. व सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते. बाणूरगड (भूपाळगड) नाव बाणूरगड (भूपाळगड) उंची प्रकार  गिरीदुर्ग  चढाईची श्रेणी सोपी. ठिकाण सांगली जिल्हा  जवळचे गाव सांगली,पळशी,खानापूर डोंगररांग खानापूर-आटपाडी सध्याची अवस्था व्यवस्थित स्थापना बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायानी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात  अफजल खान च्या (दि. १० नोव्हेंबर १६५९)ला झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्याची डागडुजी झाली. भूपाळगडाची किल्लेदारी शिवरायांनी फिरागोजी नरसाळा  या अनुभवी सहकाऱ्याकडे दिली. पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सां

सांगली जिल्ह्यातील ईतिहासिक किल्ले

सांगली जिल्हा तेरदाळ दोदवाड प्रचितगड भूपाळगड/भोपाळगड/ बाणूरगड मंगळवेढे मच्छिंद्रगड रामगड शिरहट्टी श्रीमंतगड सांगली येलवट्ट

निमसोड येथील मनाची सासन काठी किल्ले वसंतगड येथील मूळ ठाण असलेल्या चंद्रसेन महाराज यात्रेसाठी विधी पूर्वक सज्ज

Image
निमसोड येथील मनाची सासन काठी किल्ले वसंतगड येथील मूळ ठाण असलेल्या चंद्रसेन महाराज यात्रेसाठी विधी पूर्वक सज्ज करण्यासाठी गुलाल खोबऱ्याची उधळण करत सणईच्या व ठोल ताश्याच्या सुरात नारळ वाढवून आरती करून पूजा करण्यात आली. बुधवार दि. २७ रोजी तळबीड येथे चंद्रसेन देवाचा नैवद्य आहे कॅलंडर मध्ये २६ रोजी तळबीड यात्रा लिहिली आहे तळबीड गावात आज यात्रा असते आणि उद्या डोगरावर यात्रा असते

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ एप्रिल १६६५* मुघल सरदार दाऊदखान सुमारे ७००० घोडदळ घेऊन  किल्ले पुरंदरच्या पायथ्यापासून स्वराज्याच्या नासाडीकरता निघाला. त्याने रोहीड खोरे, हिरडस मावळ आणि गुंजन मावळ मध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ एप्रिल १६७४* ६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती. आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल. त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते. २४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला ११.७५ ग्रामचा होता) १६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते. १ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते. असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो). 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ एप्रिल १६७४* कालिकतहून सूरत येथे एप्रिल २५ चे जें पत्र रवाना झालें, त्यांत कालीकातकरांनी कळविले

स्वातंत्र्यवीर

*१. स्वातंत्र्यवीर अण्णाजी,*  *२. स्वातंत्र्यवीर भिमाजी*  *३. स्वातंत्र्यवीर बागल यदु पाटील*  *४. स्वातंत्र्यवीर भीमराव*  *५. स्वातंत्र्यवीर आत्माराम सन्तु भोसले*  *६. स्वातंत्र्यवीर बाबाजी भुजंग भोसले*  *७. स्वातंत्र्यवीर राजू खंडू भोसले*  *८. स्वातंत्र्यवीर रघु मानाजी भोसले*  *९. स्वातंत्र्यवीर विठू हंगू भोसले*  *१०. स्वातंत्र्यवीर व्याकात्राव भोसले*  *११. स्वातंत्र्यवीर बिरबत कुणबी*  *१२. स्वातंत्र्यवीर अन्न नाथु*  *१३. स्वातंत्र्यवीर बाळकृष्ण*  *१४. स्वातंत्र्यवीर बारकू*  *१५. स्वातंत्र्यवीर भीमा*  *१६. स्वातंत्र्यवीर गानू बापू चव्हाण*  *१७. स्वातंत्र्यवीर कृष्णाप्पा गोपाल चव्हाण*  *१८. स्वातंत्र्यवीर महादेव चव्हाण*  *१९. स्वातंत्र्यवीर दामोदर आबाजी* *२०. स्वातंत्र्यवीर दत्तू नथु*  *२१. स्वातंत्र्यवीर दामू सरमळकर*  *२२. स्वातंत्र्यवीर नारायण देसाई*  *२३. स्वातंत्र्यवीर पांचाली गोविंद देसाई*  *२४. स्वातंत्र्यवीर राघोबा देसाई*  *२५. स्वातंत्र्यवीर देवाजी शिरसाठ*  *२६. स्वातंत्र्यवीर देवजी गायकवाड*  *२७. स्वातंत्र्यवीर गानू सावंत*  *२८. स्वातंत्र्यवीर गणेश महाराज =* *२९. स्वातंत्र्यवी

हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे.

Image
हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना इतिहास ओळखतो. आपण आज या रणरागिनी चा इतिहास पाहणार आहोत. उमाबाई चे वडील अभोणेकर देवराम ठोके देशमुख. यांचं गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील अभोणे. हे गाव पूर्वीच्या बागलाण प्रांतात येत असे. ठोके घराने घरंदाज असल्याने उमाबाई वरती चांगले संस्कार लहान वयात झाले घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, राजकारण, लष्कर, आणि हिशोब तसं चांगलं ज्ञान लहान वयात आत्मसात केलं.  उमाबाईचा विवाह तळेगाव येथील मातब्बर घराणे दाभाडे घराण्यात खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला. खंडेराव दाभाडे हिंदवी स्वराज्याचे सेनापती होते. परंतु त्यांना पाटील,सर पाटील, देशमुख सर देशमुख राजे अशी बीरुदे दाभाडे अभिमानाने लावत असत.  सेनापती खंडेराव दाभाडे व उमाबाई यांना तीन मुली आणि तीन मुलगे असा परिवार होता. 1729साली सरसेनापती खंडेराव यांचा मृत्यू झाल्यामुळे सेनापती पदाची सूत्रे मुलाकडे आली.  परंतु अल्प काळ मध्येच पेशव्यांच्या बरोबर झालेल्या युद्धामध्ये  त्रिंबकराव यांचा मृत्यू झाला. कर्तुत्वान मुलाच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखी व पेशवे कारण या वरती संतप्त झाल्या. हिंदूंनु

छत्रपती महाराणी छत्रपती महाराणी येसूबाई

Image
छत्रपती महाराणी छत्रपती महाराणी येसूबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री होत.तसेच त्याना शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार प्रधान केले होते. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले. पण येसूबाईंनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले, त्याला इतिहासात तोड नाही. भोसले घराण्यात सून शोभेल असेच त्या शेवटपर्यंत वागल्या. येसूबाईंची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबद्दल मराठमंडळात मोठा पूज्यभाव होता. इ.स.४ जुलै १७१९ला राजमाता येसूबाई मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. या घटनेला येत्या ४ जुलै २०२० रोजी ३०१ वर्षे पूर्ण झाली. मराठा साम्राज्य महाराणी, युवराज्ञ

थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Image
🚩 थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना स्मृतिदिनानिमित्त                विनम्र अभिवादन 🚩 तात्या टोपे जन्म - 1814 AD, येवले गावी ता.पाटोदा जिल्हा नगर , महाराष्ट्र. मृत्यू - 18 एप्रिल, 1859, शिवपुरी, मध्य प्रदेश) 1857  च्या 'पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात' अग्रगण्य नायकांमध्ये उच्च स्थान आहे. . अनेक ठिकाणी आपल्या लष्करी मोहिमांद्वारे या वीराने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात इत्यादी ठिकाणी ब्रिटीश सैन्याशी जोरदार मुकाबला केला आणि त्यांना त्रास देऊन सळो की पळो करून सोडले.  तात्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवले गावी झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग टोपे. तात्यांना सात भाऊ होते.  त्यापैकी तात्या दोन नंबरचें.  दुसरा बाजीरावांच्या काळामध्ये पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांच्यामार्फत पांडूरंग टोपे बाजीरावांच्या पदरी आल. एका अधिकृत निवेदनानुसार, तांत्या टोपेचे वडील पांडूरंग हे सध्याच्या महाराष्ट्रातील पाटोदा जिल्हा नगर येथील जोला परगना येथील रहिवासी होते. एका सरकारी पत्रात, ते बडोद्याचे मंत्री असल्याचे म्हटले होते, तर दुसर्‍या संभाषणात ते नान

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 📜 १९ एप्रिल इ.स.१६७३ छत्रपती शिवाजी महाराजांची  हुबळीवर स्वारी अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 📜 १९ एप्रिल इ.स.१६८० (वैशाख शुद्ध प्रतिपदा, शके १६०२, संवत्सर रौद्र, वार सोमवार) पन्हाळगडावर असंख्य सैन्याची छत्रपती संभाजी महाराजांकडे धाव!            महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असला तरी इतकी संवेदनशील बातमी गुप्त राहणे शक्यच नव्हते? शंभुराजेंचेही हेर खाते प्रबळच होते. त्यामुळे कर्णोपकर्णी ही बातमी शंभुराजेंना समजली. इतकच नव्हे तर म्रुत्यूसमयी महाराजांच्या जवळ फारशी मातबर असामी नसून महाराजांचे अंतिम संस्कार साबाजी भोसले यांच्याकडून केल्याचेही कळले! महाराजांच्या महानिर्वाणाच्या बातमीनंतर शंभुराजेंना अतीव दुःख झाले याची कल्पना फक्त "तो काळ" करू शकतो! शंभुराजेंनी किल्ले

सातारा जिल्ह्यातील किल्ले थोडक्यात माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. माहिती आवडली असल्यास ब्लॉगला शेअर आणि फॉलो करा

सातारा जिल्ह्यातील किल्ले  थोडक्यात माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. माहिती आवडली असल्यास ब्लॉगला शेअर आणि फॉलो करा. 👉किल्ले भूषणगड http://nitinghadage.blogspot.com/2022/03/blog-post_79.html                                                  👉 किल्ले वसंतगड http://nitinghadage.blogspot.com/2021/06/blog-post_12.html   👉किल्ले  सदाशिवगड         http://nitinghadage.blogspot.com/2022/03/3.html      👉 किल्ले वर्धनगड                    http://nitinghadage.blogspot.com/2022/03/4.html  👉 किल्ले महिमानगड                              http://nitinghadage.blogspot.com/2022/03/blog-post_15.html     👉 किल्ले अजिंक्यतारा              http://nitinghadage.blogspot.com/2022/03/6.html   👉 किल्ले कमळगड                                 http://nitinghadage.blogspot.com/2022/03/7.html  👉 किल्ले कल्याणगड                    http://nitinghadage.blogspot.com/2022/03/8.html   👉 किल्ले पाटेश्वर             http://nitinghadage.blogspot.com/2022/03/9.html   👉 किल्ले मकरंदगड                       

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ एप्रिल १६७३* छत्रपती शिवाजी महाराजांची हुबळीवर स्वारी अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ एप्रिल १७१९* फारुखसियर बादशाहची हत्या फेब्रुवारी १७१९ ला लाल किल्ल्यातली सगळी बादशाही फौज आणि पहारेकरी हटवण्यात आले, मराठे आणि हुसेन अलीने स्वतःची माणसे नेमली. २८ तारखेला हरम (शयनकक्षात) मध्ये लपलेल्या फारुखसियर बादशाहला पकडून दरबारात आणले गेलॆ कुतुब उल मुल्क सय्यद अलीने बादशहाचे डोळे काढले आणि बादशहाला बंदीखान्यात टाकले. रफी ऊत दर्जतला नवीन बादशाह घोषित करण्यात आले. फारुखसियर ने बंदीखान्यातून बंडाळी चे प्रयत्न केले, दिल्ली शहरातसुद्धा प्रचंड अशांतता माजली होती. बादशाह समर्थकांनी पुन्हा किल्ल्यावर ताबा मिळवला तर सय्यद बंधू हुसेन अली आणि हसन अलीं यांचे मरण निश्चित होते आणि मराठ्यांची मोहीम सुद्धा

अभिमान आणि अहंकार यामध्ये खूप पातळ लाईन असते ती ओळखन कठीण असते सर्वसामान्य माणुस ती ओळखु शकतं नाही.

माणसाने स्वाभिमानी असावं पण अहंकारी असू नये. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये खूप पातळ लाईन असते ती ओळखायला काही लोकांना जमत नाही आणि त्यामुळे कधी स्वाभिमान अहंकारमध्ये रूपांतरित होतो हे कळत देखील नाही.. माणूस जेव्हा मी पणा सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगायला शिकतो.... मी का फोन करू ?  मी का कमीपणा घेऊ ? मी का बोलू ? असे बरेच मी माणसांत आढळतात पण याच मी पणाने आपण आपलं खूप नुकसान करून घेत असतो हे लक्षातच येत नाही आणि काहींच्या तर लक्षात येऊन देखील त्यांना त्यांचा मी पणा कुरवाळत बसणं जास्त महत्वाचं वाटत असत.... दुसऱ्याला समजून घेण्यासाठी आधी स्वतःचा मी पणा बाजूला ठेवावा लागतो आणि ज्या माणसांना नात्यांपेक्षा आपला मी पणा प्रिय असेल त्यांनी खरंच नाती बनवू नयेत कारण जेव्हा एखादी गोष्ट कमी जास्त होते तेव्हा यांना समोरच्याला समजून घेण्यापेक्षा त्यांचा मी पणा जपणं जास्त गरजेचं वाटत असत आणि नाती म्हणजे कुठलाही व्यवहार नसतो...... कोणत्याही नात्यात अहंकार नावाची कीड आली की ती कीड नातं जास्त काळ टिकू देत नाही कारण नातं म्हणलं की समजून घेणं आलं *काही वेळी माघार घेणं कमी पणा घेणं हे देखील त