छत्रपती महाराणी छत्रपती महाराणी येसूबाई

छत्रपती महाराणी छत्रपती महाराणी येसूबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री होत.तसेच त्याना शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार प्रधान केले होते. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले.

पण येसूबाईंनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले, त्याला इतिहासात तोड नाही. भोसले घराण्यात सून शोभेल असेच त्या शेवटपर्यंत वागल्या.

येसूबाईंची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबद्दल मराठमंडळात मोठा पूज्यभाव होता.

इ.स.४ जुलै १७१९ला राजमाता येसूबाई मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. या घटनेला येत्या ४ जुलै २०२० रोजी ३०१ वर्षे पूर्ण झाली.

मराठा साम्राज्य महाराणी, युवराज्ञी, श्री सखी राज्ञी

एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाई बद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराणी येसूबाई माहिती इतिहासकारांना मिळाली नाही हे दुर्दैव आपले की इतिहासाचे? केवळ वीस वर्षांचा संसार….तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजी राजांना दडवून ठेवून अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेवून घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते..🚩

महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा ! या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री होत.तसेच त्याना शिवरायांनी स्वराज्याच्या कुलमुखत्यार पदाची शिक्के कट्यार प्रधान केले होते. त्या स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार होत्या.

छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंच्या जीवनात जेवढी संकटे आली तेवढी राजघराण्यातील कोणत्याही स्त्रीवर आली नसावीत. एवढे सर्व राजवैभव असूनही आयुष्यात दुर्दैव त्यांच्या पाठीशी लागले आणि सुमारे तीस वर्षे मराठयांच्या या महाराणीला शत्रूच्या बंदिवासात जीवन कंठावे लागले.

पण येसूबाईंनी ज्या धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले, त्याला इतिहासात तोड नाही. भोसले घराण्यात सून शोभेल असेच त्या शेवटपर्यंत वागल्या.

येसूबाईंची मान्यता मोठी होती या थोर स्त्रीबद्दल मराठमंडळात मोठा पूज्यभाव होता.

इ.स.४ जुलै १७१९ला राजमाता येसूबाई मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. या घटनेला येत्या ४ जुलै २०२० रोजी ३०१ वर्षे पूर्ण झाली.

मराठा साम्राज्य महाराणी, युवराज्ञी, श्री सखी राज्ञी

एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाई बद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. महाराणी येसूबाई माहिती इतिहासकारांना मिळाली नाही हे दुर्दैव आपले की इतिहासाचे? केवळ वीस वर्षांचा संसार….तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजी राजांना दडवून ठेवून अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेवून घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते..🚩

महाराणी येसूबाई यांना मानाचा मुजरा !

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४