श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा !!...श्री स्वामी समर्थ...!!

🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩

           🌻  🌻

    *श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाची*

  🙏 *!!...श्री स्वामी समर्थ...!!* 🙏

        *‼️..ॐ श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय..‼️*

⚜🌹⚜🌹🙏🌹⚜🌹⚜

        *कलियुग.. ज्यामध्ये षड्रिपूग्रस्त मानवाचा अहंकार वाढेल. महवाकांक्षा वाढून जगात अकारण युद्धही होतील.. समाजात सतत समस्या उध्द्ववतील.. अविश्वास कळस गाठेल.. ज्ञात अज्ञात संकटाने मानवी मन अशांत असेल हे कलियुगात ठरलेलेच होते.*
        *अशावेळी लोकांना सद्बुद्धी देत सन्मार्ग दाखवून उद्धार करण्यासाठी श्री दत्तगुरुंचे अवतार प्रकटले. विज्ञानाच्या.. मानवी कल्पनेच्या पलिकडे असणारी.. अशक्य ते शक्य करुन दाखवणारी परमेश्वरी शक्ती म्हणजे दत्त अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ.*
        *त्यांनी समाजात श्रद्धा.. विश्वास, भक्तीभावाची रुजवण केली. सद्बुद्धी प्रदान करुन आत्मविश्वास निर्माण केला. जीवनात कल्पित.. अकल्पित परीक्षेच्यावेळी सामना करायला लोकांमध्ये कणखर मानसिकता निर्माण केली. स्वामी समर्थांच्यावरच्या अढळ विश्वासाने.. भक्तीमुळे लोकांना अवघड परीक्षेचा सामना करता येवू लागला. भक्तांच्या मनातील भय दूर होत जीवनात आनंद निर्माण झाला.*
        *'श्री स्वामी समर्थ भक्तांना या भवसागरी निःशंक होत निर्भयपणे जगण्याची हमी देतात. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे"..  "निःशंक हो".. या त्यांच्या आश्वासनाने भक्तांच्या जीवनाला सुरक्षा कवच प्राप्त होते.*  
        *करोडो भक्तांचे आश्रय स्थान असलेल्या स्वामींचा आज प्रकटदिन. आपण त्यांच्या चरणी भक्तीभावाने शरणागत होवू या. स्वामींवरच्या विश्वासाने निर्भय होत आपलेही जीवन उजळवू या.*

🌸🌿🌼🌺🙏🌺🌼🌿🌸

  *_निःशंक होई रे मना,_*
  *_निर्भय होई रे मना_*
  *_प्रचंड स्वामीबळ पाठीशी,_*
  *_नित्य आहे रे मना_*
  *_अतर्क्य अवधूत हे स्मर्तू गामी_*
  *_अशक्यही शक्य करतील स्वामी ॥१॥_*

  *_जिथे स्वामी चरण तिथे न्युन काय_*
  *_स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय_*
  *_आज्ञेविणा काळही ना नेई त्याला_*
  *_परलोकही ना भिती तयाला ॥२॥_*

  *_उगाची भितोसी भय हे पळू दे_*
  *_वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे_*
  *_जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा_*
  *_नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥_*

  *_खरा होई जागा श्रध्देसहित_*
  *_कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त_*
  *_आठव कितीदा दिली त्यांनीच साथ_*
  *_नको डगमगू स्वामी देतील हाथ ॥४॥_*

  *_विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ_*
  *_स्वामीच या पंचामृतात_*
  *_हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती_*
  *_न सोडती तया स्वामी जया घेई हाती ॥५॥_*

🌹🌿🚩🔆🌺🔆🚩🌿🌹

  *श्री स्वामी समर्थ तारक मंत्र*

  

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४