सांगली जिल्हा किल्ले ब्लॉग नंबर 1 किल्ले बानूरगड /भोपाळगड

किल्ले बाणूरगड हा इतिहासात भूपाळगड किंवा भोपाळगड या नावाने ओळखला जातो,




सांगली जिल्ह्यात खानापूर व आटपाडी ता. व सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका अशा तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर भूपाळगड उभा आहे. शिवकालात स्वराज्याच्या सीमारक्षेच्या दृष्टीने भूपाळगडास अनन्यसाधारण असे महत्त्व होते.

बाणूरगड (भूपाळगड)
नावबाणूरगड (भूपाळगड)
उंची
प्रकार गिरीदुर्ग 
चढाईची श्रेणीसोपी.
ठिकाणसांगली जिल्हा 
जवळचे गावसांगली,पळशी,खानापूर
डोंगररांगखानापूर-आटपाडी
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना


बुसातिन-उस-सलातिन' या साधन ग्रंथानुसार छत्रपती शिवरायानी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडले भूपाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात  अफजल खान च्या (दि. १० नोव्हेंबर १६५९)ला झालेल्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्याची डागडुजी झाली. भूपाळगडाची किल्लेदारी शिवरायांनी फिरागोजी नरसाळा  या अनुभवी सहकाऱ्याकडे दिली.

पुढे डिसेंबर १६७८ मध्ये युवराज संभाजी राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यानुसार (गनिमी कावा) मोगलास जाऊन मिळाले, त्यावेळी त्यांना सप्तहजारी मनसबदारी मिळाली. या घटनेनंतर दिलेरखान संभाजीराजांना बरोबर घेऊन मराठी मुलखावर हल्ला करत सुटला, पुढे विजापूरवर चालून जात असताना वाटेत लागणाऱ्या भूपाळगडावर मोगलानी हल्ला चढविला. या युद्धात दिलेरखानाने शेजारील डोंगरावरून तोफा डागून गडाचा एक बुरूज पाडला व एका प्रहरात भूपाळगड मोगलांच्या ताब्यात गेला. (मराठी मुलखाची जीवितहानी होऊ नये म्हणून व दिलेरखानाचा शंभुराजेंवर विश्वास बसावा म्हणून शंभुराजेंनी हा किल्ला मुघलांना दिला.) पुढे या घटनेचा खटला शंभूराजे विरोधात कारभारी मंडळींनी दरबारात बसवला व शंभूराजे यांच्याकडून किल्ल्याचा किल्लेदार फिरोंगोजी नरसाळा यांच्या पुराव्याने शंभुराजाना दोष मुक्त करण्यात आले.


भूपाळगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड क्षेत्रफळाचा आहे. याच्या एका कोपऱ्यावर बाणूरगड गाव वसलेले आहे. गावातून पायवाट गडावर जाते येथून पुढे कातळात खोदून तयार केलेल्या एका मोठ्या तलावावर येऊन पोहोचते. या तलावाजवळूनच गडाच्या बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्यांची वाट आहे. टेकडीसमोरच महादेवाचे मंदिर लागते, मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग असून ते बाणूर्लिंग या नावाने ओळखले जाते.

मंदिरातून बाहेर पडल्यावर उजव्या हातास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांची दगडी चौथऱ्यावर वृंदावन समाधी दिसते. बाणूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते हा वीर शत्रूच्या ताब्यात सापडला; तर काहींच्या मते दूरवरच्या शत्रूचा घाव वर्मी बसल्याने या वीराने शंभू महादेवापाशी येऊन प्राण सोडले. पण ही समाधी बहिर्जी नाईक यांची असल्याची नोंद इतिहासात कागदपत्रात कोठेच नाही. समाधी समोरून जाणाऱ्या पायवाटेने थोडे खाली उतरल्यावर गजची तटबंदी पहायला मिळते; दगड एकमेकावर रचून तयार केलेल्या या तटबंदीत जागोजागी बाहेर पडण्यासाठी छोटे चोर दरवाजेही तयार केले आहेत. भूपाळगड हा किल्ला आकाराने विस्ताराने प्रचंड असला तरी एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.




Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४