*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*ৎ एप्रिल इ.स.१६३३*
स्वतः शहाजी राजे यांचा सहभाग असलेल्या लढाईत मोघल बादशहा शाहजहानच्या फौजांनी निजामशाही विरुद्ध त्यांच्या देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवला. ९ एप्रिल ला मुघलांना किल्ल्याच्या तटबंदीच्या एका भागात स्फोट करून भगदाड पाडता आले पण त्यातून किल्ल्यात प्रवेश करता आला नाही, १७ एप्रिलला रणदुल्लाखान व शहाजी राजांनी किल्ल्याजवळ रसद पोहोचवायचा प्रयत्न केला पण मुघलांनी त्यांना अडविले व परतवून लावले. मुघलांच्या वाढत्या प्रभावाने व घटणाऱ्या रसदेमुळे किल्ल्यातले आदिलशाही सैन्य विवश झाले. त्यांनी मुघलांकडे अभयवचन मागितले व किल्ला देऊ केला. मालोजी भोसलेनी हा निरोप महाबतखानकडे नेला व त्यानी लगेच अभयदान दिले.

*ৎ एप्रिल इ.स.१६६९*
काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम बादशहाने दिला. औरंगजेब बादशहाने एक फतवा काढून हिंदुस्थानात सर्व हिंदुंना अतिशय पुज्य असलेल्या मोठमोठ्या देवालयांवर पडू लागली. सोमनाथचे दुसरे देवालय, काशीचे विख्यात विश्वेश्वराचे मंदिर आणि मथुरा येथील केशवराजाचे मंदिर ही हिंदुंची श्रद्धास्थाने औरंग्याला नजरेसमोर नकोशी वाटू लागली. सूर्यग्रहण आले. या सूर्यग्रहणाच्या मुहुर्तावरच काशी विश्वेश्वराचे देवालय जमीनदोस्त करण्याचा हुकुम औरंगजेब बादशहाने सोडला. या पाशवी हुकुमाने निसर्गही थरारला.


*९ एप्रिल इ.स.१६७४*
इंग्रजांच्या नुकसान भरपाई मागणीस यश
ब्रिटिश सल्लागार मंडळाच्या सभेंत ठरले की, हेन्री ऑक्झेंडनने रायगडावर जाण्याची तयारी करावी. ऑक्झेंडन व उष्टीक यांनी विचार करून तहनाम्यांवर अधिक काही गोष्टी घालावयाच्या असल्यास सुचवाव्यात. ता. ९ एप्रिल रोजी मुंबईहून सुरतेस पत्र रवाना झाले; त्यात ३/४ हजार रुपयांची रत्ने खरेदी करण्याची जबाबदार अधिकाऱ्यांस विनंती करण्यात आली. मुंबईकरांचे पत्र सुरतेस पोहोचल्यावर तेथील कौन्सिलच्या सभासदांचे मत झालें की नारायण शेणवी यास अपेक्षेबाहेर यश आलें आहे; तेव्हा शिवाजीस प्रसन्न करण्यासाठी राज्याभिषेकाच्यावेळी भरीव नजराणा द्यावा, म्हणून ६ मोत्ये, ३ अंगठ्या, १ शिरपेच, २ सलकडी अशा सुमारे ३३१४ रुपये किंमतीच्या वस्तु खरेदी करून मुंबईस धाडण्यात आल्या.

*ৎ एप्रिल इ.स.१६८२*
मुघल सरदार शहाबुद्दीनचा 'किल्ले रामशेज' ला पुन्हा वेढा टाकण्याचा प्रयत्न. पण किल्लेदार माजी पवार व इतर मावळ्यांचा त्यांच्यावर जोरदार हल्ला.

*ৎ एप्रिल इ.स.१६९५*
शके १६१७ च्या वैशाख शु. ६ रोजी प्रसिद्ध पंडितकवि वामनपंडित यांनी भोगांव येथे समाधि घेतली.
वामनपंडित हे ऋग्वेदी, वसिष्ठ' गोत्री ब्राह्मण असून विजापूरचे राहणारे. विजापूरचा बादशहा आपणांस बाटविणार ही बातमी कळताच त्यांनी विजापूर सोडले व काशी येथे संस्कृत भाषेचा व तत्कालीन शास्त्रांचा अभ्यास केला. विद्वत्ता मिळाली तरी चित्तास समाधान लाभले नाही म्हणून त्यांनी ' मलया- चला 'वर तपश्चर्या केली. तेथे ध्यानमग्न असता कोणा यतीने जो उपदेश दिला तो वामनपंडितांनी निगमसार' ग्रंथात साठविला आहे. यानंतरहि ‘कर्मतत्त्व', 'समश्लोकी', 'सिद्धांतविजय', 'अनुभूतिलेश', इत्यादि लहान लहान अध्यात्म प्रकरण पंडितांनी लिहिली. परंतु, वामनपंडितांचे सर्व बुद्धिवैभव त्यांच्या 'यथार्थ दीपिके 'त दिसून येते. सामान्य जनांना वामनपंडित प्रिय वाटतात ते त्यांच्या आख्यानक कवितेमुळे. सुश्लोक वामनाचा' म्हणून यांची प्रसिद्धि आहे. ' गजेन्द्र- मोक्ष', 'सीतास्वयंवर', 'कात्यायनी व्रत', 'वनसुधा', 'वेणुसुधा', इत्यादि सुंदर प्रकरणे रसिकांना आजहि रिझवितात. कित्येक ठिकाणी बीभत्स व शृंगार रस हे आपली पायरी ओलांडून जातात हैहि खरेंच आहे. जगन्नाथ पंडितांची गंगालहरी' व भर्तृहरीची नीतिशतके' यांचा उत्कृष्ट मराठी अनुवाद वामनांनीं केला आहे. वामनपंडित हे कोरेगांव ( शिगांव ) येथून कृष्णाकाठाने तीर्थकषेत्र पाहत पाहत महाबळेश्वर येथे जात असतांना मार्गात गुन्हेघर येथे समाधिस्थ झाले. पण भोगांवच्या हद्दीत कृष्णेच्या काठी यांचे दहन झाले. बरोबर असलेल्या शिष्याने-महादेवाने तेथे त्यांची समाधि बांधली. “वामनपंडिताप्रमाणे भक्तीने ईश्वरपर्दी लीन होऊन अद्वैतविचारावर मोठमोठाले ग्रंथ लिहिणारा, अक्षर गणांच्या वृत्तांनी सोपी, मधुर व पुष्कळ कविता रचणारा आणि निःस्पृहतेने केवळ ईश्वरपर वर्णन करणारा ग्रंथकार, कवि आणि साधु त्याच्यामागे आज- पर्यंत झाला नाही. वामनपंडिताने महाराष्ट्र भाषेवर व लोकांवर फार उपकार केले आहेत.” असा अभिप्राय कै. बा. म. हंस यांनी दिला आहे.

  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४