हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे.


हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना इतिहास ओळखतो. आपण आज या रणरागिनी चा इतिहास पाहणार आहोत. उमाबाई चे वडील अभोणेकर देवराम ठोके देशमुख. यांचं गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील अभोणे. हे गाव पूर्वीच्या बागलाण प्रांतात येत असे. ठोके घराने घरंदाज असल्याने उमाबाई वरती चांगले संस्कार लहान वयात झाले घोड्यावर बसणे, तलवार चालवणे, राजकारण, लष्कर, आणि हिशोब तसं चांगलं ज्ञान लहान वयात आत्मसात केलं.
 उमाबाईचा विवाह तळेगाव येथील मातब्बर घराणे दाभाडे घराण्यात खंडेराव दाभाडे यांच्याशी झाला. खंडेराव दाभाडे हिंदवी स्वराज्याचे सेनापती होते. परंतु त्यांना पाटील,सर पाटील, देशमुख सर देशमुख राजे अशी बीरुदे दाभाडे अभिमानाने लावत असत.

 सेनापती खंडेराव दाभाडे व उमाबाई यांना तीन मुली आणि तीन मुलगे असा परिवार होता.


1729साली सरसेनापती खंडेराव यांचा मृत्यू झाल्यामुळे सेनापती पदाची सूत्रे मुलाकडे आली.
 परंतु अल्प काळ मध्येच पेशव्यांच्या बरोबर झालेल्या युद्धामध्ये  त्रिंबकराव यांचा मृत्यू झाला. कर्तुत्वान मुलाच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखी व पेशवे कारण या वरती संतप्त झाल्या. हिंदूंनुपती छत्रपती शाहू महाराज यांना स्वतः मध्यस्थी करावी लागली व बाजीराव पेशवे यांना माफी मागण्यास भाग पाडले. हा वाद तूर्तास मिटवून टाकला.

 या प्रकरणानंतर उमाबाईंनी सर्व सूत्रे हातामध्ये घेतली. आणि सर सेनापती पद स्वीकारून त्या सरसेनापती झाल्या. आणि गुजरात प्रांताचा सर्व कारभार हाती घेतला.

 त्रिंबकराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर गुजरात प्रांताची पकड डिलीट होईल असं मारवाड चा राजा अभयसिंह यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी कारवाया चालू केल्या. त्यांनी बडोदा हस्तगत करून घेतला.डभई प्रांतास  वेडा दिला. परिणामी त्यांच्याशी झालेले युद्धामध्ये उमाबाई दाभाडे यांचे सरदार  पिलाजी गायकवाड यांचा मृत्यू झाल्यामुळे. उमाबाई दाभाडे यांची ताकद कमी होईल असे त्यांना वाटले. परंतु या युद्धामध्ये उमाबाई स्वतः हाती तलवार घेऊन घोड्यावरती स्वार होऊन लढू लागल्या. त्यांनी मारवाडी चा राजा अभय सिन्हा वरती स्वारी केली. उमाबाई दबडे यांचा पराक्रम पाहून. मारवाड चा राजा अभयसिंह युद्ध मधून गुजरात सोडुन पळून गेला.

 पुढे गुजरात संरक्षण करताना  त्यांनी अनेक लढायांमध्ये भाग घेतला. आणि गुजरात सर केला. त्यामुळे खुश होऊन हिंदुनुपती छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचा सन्मानपूर्वक त्याच्या चरणी सोन्याचे वाळे घालाण्याचा मान बहाल केला. तो महाराष्ट्रातील मोजक्या घरण्याला मिळाला होता.
 पेशवे आणि दाभाडे याचे समंध पूर्वीचा पासून चागलं नव्हते या दोन्ही घराण्यात पुढे वाद वाढत गेला.
1750साली दाभाडे याच्या कडून काही खोटे आरोप लावून गुजरात काढून घेतल. त्यामुळे दाभाडे याचे सरदार दमाजी गायकवाड यांना उमा बाईनी पेशवे याच्यावर हल्ल्या साठी पाठवले. या युद्ध मध्ये सरदार गायकवाड यांचा पराभव झाला. 30 एप्रिल 1751वेणेचा साली तह करण्यात आला.गुजरात उमा बाई यांना पेशवे यांना दयावा लागला.

 5 एप्रिल 17 51 ला पुन्हा एकदा अखेर चा तह झाला.आणि पेशवे आणि दाभाडे पुन्हा एकत्र आले.

.17 53 साली उमाबाई यांची तब्येत खालावली त्यामुळे त्याना नदी काठी असलेल्या नडगेमोडी येथे उपचार चालू झाले.
18 नोव्हेंबर 1753साली त्याची प्राण ज्योतमावळली.
 त्यांच्या अस्थी कलशाचे त्यांचे पुत्र यशवंतराव यांनी तळेगाव येथील इंद्रायणी नदीकाठी पूजन केले. त्याच ठिकाणी त्यांनी समाधी उभारली. समाधीजवळ पूर्वी पासून असणारे बनेश्वर हे शिव मंदिर खूप प्रसिद्ध आहे.

 इतिहासिक राजकारणामध्ये एक महिला सरसेनापती होते काय साधी गोष्ट नाही. त्यामुळे इतिहासामध्ये त्यांना सदैव आदराची जागा आहे.
लेखन :-नितीन घाडगे 



Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...