होळकर वाडा : खडकी-पिंपळगाव ता . आंबेगाव जि . पुणे (महाराष्ट्र)

होळकर वाडा : खडकी-पिंपळगाव ता . आंबेगाव जि . पुणे (महाराष्ट्र)
हा वाडा पाहिल्यानंतर काय बोलावे अन काय नाही हे कळणारच नाही कारण या वाड्याचे फक्त प्रवेशद्वारच स्थित आहे . या वाड्याच्या सर्व भिंती या पडलेल्या आहेत . हा किल्लेसदृश वाडा श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांनी आपल्या राज्यकाळात बांधला ( ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही गावकरयाकडून सांगितले जाते ). श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांची मुलगी श्रीमंत उदाबाई होळकर - वाघमारे यांचा विवाह बाबुराव मानाजी वाघमारे - पाटील यांच्याशी झाल्यानंतर हे खडकी गाव श्रीमंत उदाबाई यांना चोळीबांगडी म्हणून होळकर कुटुंबियांनी बक्षीस स्वरुपात दिले.
श्रीमंत उदाबाई या श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) व श्रीमंत गौतमाबाई होळकर यांच्या कन्या होत्या.
येथे पाहण्यासाठी काही होळकर कालीन वास्तू स्थित आहेत त्यामध्ये महादेव मंदिर व त्यामधील नंदी ,लक्ष्मी नारायण मंदिर ,काळ भेरनाथ मंदिर ,बिरोबा मंदिर ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला नदी घाट,तसेच श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर( प्रथम ) यांचे नातू अवचितराव वाघमारे - पाटील( श्रीमंत उदाबाई आणि बाबुराव मानाजी वाघमारे - पाटील यांचे पुत्र ) यांनी पितृ उध्दर्तीर्थ बांधलेली समाधी . हि समाधी होळकर कालीन स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे .या समाधी नक्षी कामामध्ये मध्ये मराठा व राजपूत कलाकृती दिसून येते व तसेच या समाधी गर्भगृहा मध्ये एक महादेव पिंड असून होळकर कालीन शिलालेख नजरेस पडतो. येथील प्रवेशद्वार वरील व बिरोबा मंदिरावरील होळकर कालीन दगडी नक्षीकाम आज हि पाहण्यासारखे आहे. येथील होळकर कालीन नदीघाट हा गावाची शोभा वाढवताना दिसतो . नदीघाट पाहण्यासाठी जाताना येणाऱ्या वेशीवर होळकर कालीन भव्य शिलालेख आढळतो . हा नदीघाट खूपच भव्य दिव्य आहे. येथील समाधीवर झाडे झुडपे येताना दिसतात ते वेळेत साफ केले नाहीतर येणाऱ्या काळात त्याचा समाधी मंदिरावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही . येथील असलेल्या या होळकर कालीन वास्तूमुळे या गावास पर्यटनाचा दर्जा प्राप्त झालेला आहे . त्यामुळे येथील असलेल्या या वास्तूची लवकरात लवकर डागडुजी होणे आवश्यक आहे . येथे येण्याचा पुण्यावरून मार्ग :- पुणे - राजगुरुनगर - मंचर - पिंपळगाव (महाळूगे) - खडकी .
तेथील समाधीमधील असलेल्या शिलालेखावरील उल्लेख पुढील प्रमाणे :-
श्री गणेशाय नम : प्रतापि महाराज मळहारराजा जसि लक्षुमिगौतमा नाम तया उदरी रत्नकन्या विराजे उदाबाई हे नाम पृथ्वीत गाजे . सके १७११ सौम्य नाम संवत्सरे चौत्र शुद्ध ९ नवमी मंदवासरे ते दीवसी बाबूरावा वल्द ( वडील ) मानाजी पाटील वाघमारे मोकदम तक्षिम दिड मौजे खडकी तर्फे महाळुंगे तस्ये भार्या उदाईवा पुत्र अवचितराव पाटील वाघमारे याणी पित्रु उद्धारार्थ परलोकसाधनार्थ छत्रीचे काम केले असे .

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४