शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*५ एप्रिल इ.स.१६६०*
*(वैशाख शुद्ध षष्टी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, गुरुवार)*
शाहिस्ते खान बारामतीला दाखल :-
           शाइस्ताखान बारामतीला पोहचला. अन् मे १६६० ला तो पुण्यात पोचला. तो लाल महलात घुसल. आणि सुमारे ३ वर्ष ठाण मांडून बसला. सिद्दीच्या मगोमाग आलेला हा दुसरा गनीम लाल महलात ठाण मांडून बसला होता. तो होता औरंगजेबाचा सख्खा मामा, अमीर-उल्-उमराव नवाब-बहादुर मिर्झा अबूतालीब उर्फ शाइस्ताखान. ७७ हजार घोडदळ, ३० हजार पायदळ, हत्ती, घोडे, उंटांवरचा तोफखाना (शुत्तरनाळा), हत्तीवरचा तोफखाना (फिलनाळा), बारूद वगैरे सर्व साधने घेऊन हजारोंच्या सैन्यासह, सोबत शम्स खान पठाण, नामदार खान, गयासुद्दीन, हसन मुनीम, सुल्तान मिर्झा, मनचेहर, तुरुकताज, कुबाहत खान, हौद खान, सिद्दी फत्ते, कारतलब खान, शामसिंह, राजसिंह गौड, रामसिंह, रायसिंह सिसोदिया, दत्ताजी खंडागळे, दत्ताजी व रुस्तमराव जाधव, रंभाजी पवार, माहुरची रायबाघन व तिचे कृष्णराज, प्रचंडराज ई. भाऊ, सर्जेराव घाटगे यांसह सुमारे ५६ सरदार या मोहिमेत होते.

*५ एप्रिल इ.स.१६६३*
*(चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८५, संवत्सर शोभन, रविवार)*
शाहिस्तखानावर_सर्जिकल_स्ट्राईक
शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती.५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले.
तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापुजी मुदगल, चिमणाजी बापुजी मुदगल, बाजी सर्जेराव जेधे, चान्दाजी कान्होजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तान्हाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरले महाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धा असेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned.
ऐन मध्यरात्र सारी छावणी सुस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले. या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता. दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले...

*५ एप्रिल इ.स.१६८९*
*(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)*
छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले रायगड सोडला.
             दुर्गराज रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तक्ताची जागा. गडांचा राजा व राजांचा गड, परंतु नियतीची चक्रे अकस्मात फिरली व इ.स.१६८९ पर्यंत अभेद्य व अप्राप्य वाटणारा हा हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रृत्यूनंतर मात्र हतबळ झाला. शत्रूसुद्धा जो सहजी कधी प्राप्त होईल असे वाटले नव्हते तो गड २५ मार्च इ.स.१६८९ पासून मोगली विळख्यात सापडला. रायगडचे फास आवळले जाऊ लागले. समय बाका होता, महाराणी येसुबाईसाहेब यांनी आपल्या पुत्रास मंचकारोहण करण्याचा मोह टाळून आपल्या दिरास वारसदार म्हणून मंचकारोहण करण्याच्या निःस्वार्थी व उदार निर्णयाने स्वराज्याचा वारसा हक्काचा धोका मागे पडून मोगली आक्रमणास का, कसे, कुठे व कोणी व कोणती उपाय योजना करावी यावर विचारमंथन झाले. प्राप्त परिस्थितीत रायगडावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व युवराज राजाराम महाराजांनी बाहेर पडून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला सर्व जेष्ठ की श्रेष्ठ मुत्सद्यांना व सेनांनींना पटला. त्यानुसार युवराज राजाराम महाराजांनी ताराराणीसाहेब, राजसबाईसाहेब, प्रल्हाद निराजी आदींसह गुप्तपणे रायगडाच्या वाघ दरवाज्यातून जिंजीकरीता प्रयाण केले.

*५ एप्रिल इ.स.१७१८*
मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र  पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होऊन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."

*५ एप्रिल इ.स.१७४०*
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. इतर प्रांतांची व्यवस्था लावून पूर्ण झालेली होती. परंतु, तरीही बाजीराव पेशवे पुण्याला न राहता रावेरखेडीलाच राहिले. वास्तविक पुणे हे बाजीरावांचे अत्यंत प्रिय. शनिवारवाड्यासारखा बळकट महाल त्यांनी उभा केला, पुण्याची पुनर्बाधणी केली. परंतु, मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या घरातल्यांनीही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते. सतत मस्तानीच्या असण्यावरून घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले. चिमाजीआप्पांनी राधाबाईंना पत्राद्वारे रावांची प्रकृती कळवली.

*५ एप्रिल इ.स.१७७०*
मराठ्यांनी आग्रा व मथुरा जिंकले
तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांची  जबरदस्त हानी झाली होती. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेब पेशवा लवकरच निधन पावला. त्यामुळे उत्तरेत लक्ष देता आले नाही. 
१७६८ नंतर माधवरवाना उत्तरेकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली. १७६९ च्या शेवटी माधवरावांनी एक जंगी मराठा सैन्य रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडे रवाना केले.पानिपत युद्धातील कलंक धुवून काढणे,विश्वासघातकी नजीबला शासन करणे व उत्तरेत पुन्हा मराठ्यांचे अधिपत्य निर्माण करायचे,असे माधवराव नि ठरवले होते.त्याचा भाग म्हणून मराठ्यांनी पुन्हा उत्तरेत आपला जम बसविण्यास सुरुवात केली.महादजी शिंदे सुद्धा मोठ्या जोमाने ह्या कार्यात आघाडीवर होते.
मराठी फौजांच्या मार्गात जाट मंडळींचा अडथळा होता.पण ५ एप्रिल १७७० ह्या दिवशी मराठ्यांनी जाट सैन्याचा पराभव करून आग्रा व मथुरा हि दोन ठिकाणे काबीज करून दिल्लीकडे आगेकूच चालू ठेवली.

*५ एप्रिल इ.स.१७७८*
महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण आणि तह कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. ५ एप्रिल १७७८ रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस वीस लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.

*५ एप्रिल इ.स.१८२२*
सातारा राज्याचे छत्रपती प्रतापसिंह 
एप्रिल १८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा बरोबर तह २५  सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांटने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२  महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले. ५ एप्रिल १८४८ ला आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.

*५ एप्रिल इ.स.१८४८*
छत्रपती आप्पासाहेब यांचा मृत्यू (सातारा गादी)
धाकटे शाहूमहाराज उर्फ आबासाहेब ह्यांना तीन मुलगे होते. सर्वात वडील प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब, द्वितीय रामचंद्र उर्फ भाऊसाहेब आणि तृतीय अप्पासाहेब उर्फ शहाजी.
धाकटे शाहूमहाराज इ.स.१८०८ मध्ये मृत्यू पावल्या नंतर त्यांचा वडील मुलगा प्रतापसिंह छत्रपती बनला. ते इंग्रजांनी पदच्युत करेपर्यंत म्हणजे ५ सप्टेंबर १८३९ पर्यंत छत्रपतीपदी विराजमान राहिले. त्यांच्या नंतर अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांना इंग्रजांनी १८ नोवेंबर १८३९ ला सातारा गादीवर बसवले. अप्पासाहेब ५ एप्रिल १८४८ रोजी मरण पावले. मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.

*५ एप्रिल इ.स.१८६३*
छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थान यांचा जन्म (करवीर राज्य)
दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे नारायण दिनकरराव भोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले. चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला. (सावर्डेकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले) महाराज उंचपुरे रुबाबद व्यक्तीमहत्व होते.

  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !!

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...