आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १६५६*
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १६६३*
जसवंतसिंहाने सिंहगडावर हल्ला चढविला
शाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषत: जसवंतसिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६३ एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्याशेजाच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. सिंहगडावर मराठी सैन्य किती होते ते नक्की माहिती नाही. पण या मोगली राजपूत सिंहांच्यापेक्षा मराठे नक्कीच, खूपच कमी होते. या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही. त्यांनी गडाला वेढा घातला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १६६५*
इ.स. १६६५ एप्रिल ६ पोर्तूगीज व्हाईसरायचे पत्र - "शिवाजीराजे कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं. त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले. त्यांनी तुमची जहाजें धरुन आणूंन बंदरांत ठेवली. परंतु तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १६६६*
छत्रपती शिवराय आग्रा भेटीसाठी निघाले असता औरंगजेबचे त्यांना स्वागतपर पत्र "हंडीया" या ठिकाणी मिळाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १७५५*
पेशव्यांच्या सांगण्यावरून इंग्रजांनी स्वराज्याचे आरमारप्रमुख "तुळाजी आंग्रे" यांच्याकडून 'किल्ले फत्तेगड' आणि 'किल्ले कनकदुर्ग' हे जिंकून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १८४९*
कोहिनूर आणि दुलीपसिंग यांची इंग्लंडला रवानगी
रणजितसिंग २७ जून १८३९ रोजी लाहोर इथे मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये पण हाणामाऱ्या, कट, कारस्थाने होऊन त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा दुलीपसिंग जो त्यावेळी ( सप्टेंबर १८४३ ) मध्ये अवघ्या पाच वर्षांचा होता, सिंहासनारूढ झाला. मार्च १८३९ मध्ये इंग्रजांनी अन्य भारतीय संस्थानांसारखे शीख साम्राज्य पण खालसा केले. त्यांनी ज्या प्रमाणे पेशवाईचा पाडाव झाल्यांनतर अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना नव्याने निर्माण केलेल्या सातारा राज्यावर बसवून( एप्रिल १८१८ ) त्यांच्या मार्गदर्शनासाठी कॅ.जेम्स ग्रांट ची नियुक्ती केली होती त्या प्रमाणेच दुलीपसिंगसाठी इंग्रजांनी डॉ. लोगिनला लाहोर दरबारी नियुक्त केले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या हुकुमानुसार इंग्रजांनी कोहीनुरसहित रणजितसिंगाचा सर्व शाही खजिना ताब्यात घेतला. कोहिनूर घेऊन दस्तुरखुद्द डलहौसी मुंबईस आला व कोहिनूर आणि दुलीपसिंग ह्या दोघांची ६ एप्रिल १८४९ ला बोटीने इंग्लंडला रवानगी केली. ज्याप्रमाणे पुण्यश्लोक शाहू महाराज औरंगजेबच्या कुटुंबीयात राहिले होते तद्वतच दुलीपसिंग विक्टोरिया राणीच्या सहवासात बराच काळ राहिला. इ.स.१८५१ मध्ये ज्यावेळी त्याने कोहिनूर हिरा प्रथमच पाहिला होता, विक्टोरिया राणीस भेट म्हणून देऊन टाकला. तेहापासून कोहिनूर तेथील राण्यांच्या मुगुटामध्ये विराजमान आहे. कोहिनूर पुरुषांना लाभत नसल्याच्या भीतीने राजघराण्यातील पुरुष मंडळींनी तो कधी परिधान केला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*६ एप्रिल १९२७*
सरफरोशी की तमन्ना
काकोरी दरोडा प्रकरणातील सर्व क्रांतिकारी दोन गाड्यांनी कोर्टात आणले गेले. ते देशभक्तीपर गाणी गात असत. घोषणा देत असत. लोकांची भरपूर गर्दी होत असे. ६ एप्रिल १९२७ रोजी ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गाणे म्हणत सर्वजण कोर्टात शिरले. जस्टिस हॅमिल्टनने शिक्षा सुनावल्या. पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, आणि अश्कफुल्ला खान ह्यांना फाशी झाली. अनेकांना जन्मठेप, १४-१०-७-५-४-३ वर्षांचे सश्रम कारावास झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment