हंसाजी_ऊर्फ_हंबिररावांना_सरसेनापती_पद_मिळाले तो दिवस ८ एप्रिल १६७४, पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापती ची तलवार दिली.

#हंसाजी_ऊर्फ_हंबिररावांना_सरसेनापती_पद_मिळाले 
    ८ एप्रिल १६७४, पूर्वीचे नाव हंसाजी मोहिते यांना हंबीरराव किताब देऊन सेनापती ची तलवार दिली.
त्यांना लहानपणा पासुन हंसाजी च म्हटले जायचे जसे कुडतोजी गुजर यांना सेनापती करताना प्रतापराव किताब दिला तसाच हंसाजी यांना ८ एप्रिल १६७४ रोजी हंबीरराव हा किताब दिला यापूर्वी त्यांना हंबीरराव कधीच नाव नव्हते ते सरसेनापती बनवताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिले आहे.
...स्वराज्याच सेनापतीपद मिळणं हे पद तलवार गाजऊन मिळाले.हंबिररावांनी त्यांच्या बुद्धी,तलवार, गनिमी कावा आणि भारदस्त ताकदीने दाखवून दिल.
 का . ना . साने लिखित सभासद बखरीत  प्रतापराव गुजरांच्या बरोबर हंसाजी मोहिते पंचहजारी सरदार होता . त्याने प्रतापरावाचा मोड झालेला पाहून विजापूरकरांवर निकराने हल्ला केला . 
  प्रतापराव गुजर पडले त्यावेळेस हंसाजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली संताजी व धनाजी हो मोजकी काही सैन्याची तुकडी यांना सोबत घेऊन लढाई केली. सेनापती प्रतापराव यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हंसाजी सैनिक घेऊन बहलोलखानावर चालून गेले त्यावेळेच्या संघर्षाचे वर्णन "ग्रँड डफ " ने" मराठ्यांची बखर" मध्ये पान क्रमांक ७७ वर केले आहे.
हंसाजी मोहिते च्या सैन्याने अतुलनीय पराक्रम गाजवल्या ने मोठी फौज घेऊन आलेला बहलोलखान सैन्याला घेऊन पळ काढून निघून गेला. हंसाजी यांनी त्याला विजापूर पर्यंत पिटाळले व बहलोलखानाच्या जहागीरीची नासधूस केली कित्येक आदिलशाही सरदारांना व त्यांच्या सैनिकांना यमसदनी धाडले ,फार मोठी लूट करून हंसाजी स्वराज्यात आले. असा हा अतुलनीय पराक्रम पाहुन शिवरायांनी त्यांना "हंबीरराव " किताब दिला मानाची वस्त्रे देऊन अनेक प्रकारची भूषणे देऊन गौरव केला येथून पुढे हंसाजी "हंबीराव" झाले
     उंबराणी ची लढाई १५.०४.१६७३, नेसरीची लढाई २४.०४.१६७४, अफजल खान लढाई, १६६६ नंतर पुरंदर च्या तहात मध्ये गेलेले २३ किल्ले जिंकून आणण्यात केलेल्या मोहिमा आणि अशा अनेक रणांगणात शत्रूला पाणी पाजून हंबीरराव आपल्या सहकार्या सोबत या स्वराज्याला एकेक विजय मिळवत होते या मुळेच त्यांना सरसेनापती पद मिळालं आहे ..

सरनौबत हंबीरराव मोहिते...!!
    बरा शहाणा,मर्दाना,सबुरीचा,चौकस
शिपाई मोठा धारकरी गडी...!!
 " सरनौबत कोण करावा.प्रतापराव पडले ही खबर
    राजियांनी एकूण बहुत कष्टी झाले आणि बोलिले की,
    आज एक बाजू पडली.प्रतापराव यासी आपण लेहून
    पाठीविले की,फत्ते न करिता तोंड न दखवीने.
    त्यासरिखे करून बरे म्हणविले.आता लष्कराचा बंद 
    कैसा होतो ? सरनौबत कोण करावा ? अयसा      
    रणमार्तंड पुन्हा न होणे.आता आपण खासा-लष्करात
    येऊन लष्कर घेऊन कोकणात चिपळूण जागा
   परशुरामाचे क्षेत्र आहे तेथे येऊन राहिले.मग लष्करची
   पाहाणी करून लहानथोर लष्करास व पायदळ लोकांस
   खजिना फोडून वाटणी केली आणि सरनौबतीस माणूस
   पाहता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता.
   बरा शहाणा,मर्दना,सबुरीचा,चौकस शिपाई मोठा 
   धारकरी पाहून त्यास " हंबीरराव " नाव किताबती देऊन
   सरनौबती सांगितली.कुल लष्करचा गाहा करून    
   हंबीरराव यांचे ताबीज दिधले आणि फौज वरघटी 
   रवाना केला....!!"
  #संदर्भ :- #९१ कलमी बखर
  #राजवाडे लिखित कलम ७१ वे
  #मरट्यांची बखर
  #ग्रँट डफ़
  #सरसेनापती हंबिरराव चरित्र
#का.#ना #साने लिखित बखर

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४