राम नवमी निमित्त राम नामाचे महत्व सांगनारा अभंग आज मिळाला तो खालील प्रमाणे दिला आहे.

राम म्हणता तरे जाणता नेणता ।
हो का यातीभलता कुळहीन ।।१।।

राम म्हणता न लगे आणिक सायास ।
केले महादोष तेही जळती ।।२।।

राम म्हणे तया न ये जवळी भूत ।
कैचा यमदूत म्हणता राम ।।३।।

राम म्हणता तरे भवसिंधुपार ।
चुके येरझार म्हणता राम ।।४।।

तुका म्हणे हेचि सुखाचे साधन ।
सेवी अमृतपान एका भावें ।।५।।

अर्थ -

राम असे उच्चारताच मनुष्य सांसारीक दुःखे तरून जातो. मग तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी. तो कोणत्याही कुळातील किंवा जातीतील असला तरी तो उद्धरून जातो. ।।१।।

राम म्हटल्यावर इतर साधनांची आवश्यकता पडत नाही. रामनामामुळे महादोष जळून जातात. ।।२।।

जो राम असे म्हणतो त्याच्याजवळ भूत येत नाही. रामनामाचे स्मरण करणाऱ्याजवळ यमदूतही कसे थांबतील ? ।।३।।

राम असे म्हटल्यावर मनुष्य संसाररुपी सागर तरून जातो आणि त्याची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. ।।४।।

तुकोबा म्हणतात, रामनामाचे उच्चारण हेच एक सुखाचे साधन आहे. ह्या रामरुपी अमृताचे तुम्ही एका भावाने सेवन करा. ।।५।।

।राम कृष्ण हरि।


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...