आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १६६५*
मुघल सरदार दाऊदखान सुमारे ७००० घोडदळ घेऊन  किल्ले पुरंदरच्या पायथ्यापासून स्वराज्याच्या नासाडीकरता निघाला. त्याने रोहीड खोरे, हिरडस मावळ आणि गुंजन मावळ मध्ये धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १६७४*
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती.
आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.
त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.
२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला ११.७५ ग्रामचा होता)
१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.
१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.
असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १६७४*
कालिकतहून सूरत येथे एप्रिल २५ चे जें पत्र रवाना झालें, त्यांत कालीकातकरांनी कळविले की ' शिवाजी एक मूल्यवान सिंहासन बनवीत असून येत्या जूनमध्ये तो स्वतःस राज्याभिषेक करून घेणार आहे. शिद्दीच्या आरमारी सत्तेचा उपहास करून रायगडावर शिवाजी महाराजपद स्वीकारण्याच्या तयारीत आहे; आपण इंग्रजांनी आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी वकील धाडला पाहिजे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल  १६८९*
स्वराज्याचे दूसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनाही त्याचप्रमाणे कैद करुन ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसूबा होता. याचीच अंमलबजावणी म्हणुन बेळगावचा मोगल सुभेदार बहादुरखान याने हुकेरीचा देसाई अलगोडा यास अंमलबजावणीसाठी  पाठविलेले पत्र. (दि.२५ एप्रिल  १६८९)
खान बहादुर-हुकेरी परगण्याचा देसाई अलगोंदा-
या वेळी (बादशहाचा) हुकुम झाला आहे की छत्रपती रामराजा महाराज रायरी किल्ल्याहून बाहेर पडून प्रतापगड उर्फ जावळी किल्ल्यावर पोहचला आहे आणि (तेथून) पळून जाऊ इच्छित आहे. त्याला ठार मारणे अथवा कैद करणे जरुर आहे. तो ज्या बाजूने येईल तिथल्या जमीनदारांनी आपल्या हद्दीतील फौजेच्या सरदाराला त्वरीत खबर द्यावी. जर नाही दिली तर ते अपराधी होतील. म्हणुन इथून तुझी सरहद्द पन्हाळ्याला लागून असल्याने तू (रामराजाला) अडवावेस. हेर काढून राजारामाची बातमी सतत कळवीत असावे. जर तो आढळला तर त्वरित रातोरात खबर पोहचवावी म्हणजे हल्ला करुन त्याला कैद केले जाईल.
जर खबर पोहचविण्यात कुचराई करशील व शत्रु तुमच्या हद्दीतुन निघुन जाईल तर ते चांगले नाही. अपराधी व्हाल. या बाबतीत जराही निष्काळजीपणा करु नये व सक्त ताकिद जाणावी. अशा प्रकारे बातमी कळवणे यातच स्वतःची कर्तव्य परायणता जाण. (समासात) दिरंगाई करु  नकोस. 
तारीख १४ रजब, (जुलूस) सन ३२
स्वतःच्या वकीलाला त्वरित पाठवा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १६९०*
सातारला अजिंक्यताराच्या पायथ्याशी सर्जाखान संताजीकडून पराभूत व कैद.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १६९३*
संताजीने अलीमर्दनखानाला कैद करून बदल्यात सुटकेसाठी खंडणीचे एक लाख होन गोळा करण्यासाठी त्याच्या माणसांना भीक मागत फिरायला लावले होते.
२५ एप्रिल १६९३ चे अलीमर्दनखानाच्या लोकांनी औरंगजेब बादशहाला दिलेले एक आर्जव पत्र उपलब्ध आहे. त्या आर्जव पत्रात म्हटलंय कि, " अलीमर्दनखानास मराठ्यांनी पकडून कैदेत टाकले आहे. एक लाख होन खंडणी भरल्याशिवाय मराठे अलीमर्दनखानास सोडायला तयार नाहीत. अलीमर्दनखानाची माणसे हैदराबादेत आलेली आहेत.
अलीमर्दनखानाचे हत्ती आणि इतर जिन्नस विकून खंडणीची भरपाई करण्याचा प्रयत्न त्याचे लोक करीत आहेत. परंतु हैदराबादचे अधिकारी वरील जिन्नस विकण्यास मनाई करत
आहेत." 
ह्यावर औरंगजेब बादशहाने हैदराबादचा सुभेदार जानसिपार खान ह्यास लिहून कळविले कि, "अलीमर्दनखानाच्या लोकांस हत्ती आणि इतर जिन्नस विकण्यास आडकाठी करू नये."
अक्षरशः भीक मागून आणि जवळ आहे ते सर्व विकून शेवटी अलीमर्दनखानाच्या लोकांनी पैसे गोळा केले आणि संताजी घोरपड्यांस आणून दिले. मगच संताजीने अलीमर्दनखानाची सुटका केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १७३९*
 राष्ट्रधर्माचे निर्माते छत्रपती शाहू -
चंबळ च्या उत्तरेस पोचून नादिरशहा ला तिथेच गाठण्याचा बाजीरावांचा मानस होता जेणेकरून नादिरशहा माळव्यात शिरू शकणार नाही. मराठा आणि मोगल हेरांनी उत्तरेत अफ़वा पेरल्या कि शाहूंनी पूर्व,पश्चिम आणि दक्षिणेतून
एकत्रित २ लाखांची फौज बाजीरावांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या रक्षणास पाठवली. या बातमीचा योग्य तो परिणाम होऊन नादिरशहा मराठ्यांच्या भीतीने दिल्ली सोडून इराण ला ५ मे  १७३९ ला निघाला. जाण्यापूर्वी २५ एप्रिल ला त्याने दिल्लीहून शाहू छत्रपती आणि बाजीराव यांना पत्रे लिहिली ज्यात "हिंदुस्थान चा कारभार चालवण्यास हिंदुपती शाहूच योग्य व्यक्ती आहेत,मोहम्मद शाह याला पुन्हा बादशाह नेमले आहे त्यांचे साथीने कारभार चालवावा" असे नमूद केले.
अहमदशाह अब्दालीचा गुरु असलेला नादिरशहा हा अब्दाली पेक्षा क्रूर, विक्षिप्त आणि जिहादी प्रेरणेने भारलेला कडवा राजा होता. जर नादिरशहा बादशाह म्हणून हिंदुस्थानात स्थिरावला असता आणि दक्खनेत जाऊन त्याने मराठ्यांचा पराभव केला असता तर नादिरशहा च्या कडव्या विचारसरणीने हिंदुस्थानचे इस्लामीकरण नक्कीच झाले असते. मराठे जर उत्तरेत गेले नसते, तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान नादिरशहा किंवा अबदाली अशा धर्मवेड्या
प्रवृत्तींच्या हाती गेला असता.
छत्रपती शाहू यांनी नुसता देशच नव्हे तर धर्म सुद्धा वाचवला, भारतातल्या मुघल सत्तेचे संरक्षक बनून त्यांनी 'राष्ट्रधर्मा' ची हि निर्मिती केली. छत्रपती शाहू म्हणजे दुर्दम्य आशावादाचे प्रतीक होते, वडिलांचे लढवय्ये गुण आणि आजोबांचा दूरदर्शीपणा याची सांगड घालून त्यांनी भगवा
महाराष्ट्रातून भारतभर नेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १८०९*
कुप्रसिद्ध “अमृतसर संधी”
१८०७ मध्ये त्यांनी सतलज पार केले. पंजाबमधील पतियाळा, लुधियाना ही महत्वाची शहरे देखील याच काळात जिंकून घेतली. रणजितसिंग यांची ही विजयपताका बाकीच्या लहान शीख संस्थानिकांना पाहवेना.
त्यांच्याबद्दल जबरदस्त दहशत निर्माण झाली आणि म्हणूनच सतलज पार करून तेथील गावे जिंकल्यानंतर तिथल्या स्थानिक शीख संस्थानिकांनी रणजितसिंग विरुद्ध इंग्रजांकडे मदत मागितली. त्यानुसार इंग्रजांनी रणजितसिंग यांच्याकडे संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला होता.
महाराजाला हा प्रस्ताव अर्थात मान्य नव्हता मात्र इंग्रजांचा दबाव वाढत चालल्याने २५ एप्रिल १८०९ ची कुप्रसिद्ध “ अमृतसर संधी” झाली पण जरी संधी झाली तरी रणजितसिंग यांचा विजय वारू रोखण्यास त्यावेळी कोणीही समर्थ नव्हते. १८०९ साली जेव्हा “कांगडा” प्रांतावर अमरसिंह थापा या शीख संस्थानिकाने हल्ला केला तेव्हा तेथील शासक संसारचंद्र याने रणजितसिंग याची मदत घेतली.
परिणामस्वरूप कांगडा शत्रूमुक्त झाला आणि त्यावर रणजितसिंग याचं वर्चस्व देखील प्रस्थापित झालं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२५ एप्रिल १८१८*
इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला  डागले तोफगोळे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...