थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

🚩 थोर स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांना स्मृतिदिनानिमित्त
               विनम्र अभिवादन 🚩
तात्या टोपे जन्म - 1814 AD, येवले गावी ता.पाटोदा जिल्हा नगर , महाराष्ट्र.

मृत्यू - 18 एप्रिल, 1859, शिवपुरी, मध्य प्रदेश) 1857

 च्या 'पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात' अग्रगण्य नायकांमध्ये उच्च स्थान आहे. . अनेक ठिकाणी आपल्या लष्करी मोहिमांद्वारे या वीराने उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात इत्यादी ठिकाणी ब्रिटीश सैन्याशी जोरदार मुकाबला केला आणि त्यांना त्रास देऊन सळो की पळो करून सोडले.

 तात्यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील येवले गावी झाला.
 त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग टोपे. तात्यांना सात भाऊ होते.  त्यापैकी तात्या दोन नंबरचें.
 दुसरा बाजीरावांच्या काळामध्ये पेशव्यांचे विश्वासू त्रिंबकजी डेंगळे यांच्यामार्फत पांडूरंग टोपे बाजीरावांच्या पदरी आल.


एका अधिकृत निवेदनानुसार, तांत्या टोपेचे वडील पांडूरंग हे सध्याच्या महाराष्ट्रातील पाटोदा जिल्हा नगर येथील जोला परगना येथील रहिवासी होते. एका सरकारी पत्रात, ते बडोद्याचे मंत्री असल्याचे म्हटले होते, तर दुसर्‍या संभाषणात ते नाना साहेबांसारखेच होते. त्याच्या खटल्यातील एका साक्षीदाराने तांत्या टोपे यांचे वर्णन "मध्यम उंचीचा, गव्हाचा रंग असलेला आणि नेहमी पांढरा चुकरी-दार पगडी घालणारा" असे केले.
 अठराशे सत्तावनचा उठाव हा सगळ्यांना माहिती आहे.

 भारतभर चाललेल्या इंग्रजांचा दडपशाहीला हिंदी शिपायांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा चालू केला.
 इंग्रजांना विरोध करण्यासाठी 4 जून रोजी कानपूरच्या शिपायाचा प्रमुख टीकासिंग व तात्या टोपे अन नानासाहेब यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला.

 त्या भागामध्ये इंग्रजांचं दोन आठवड्यामध्ये कढाई मध्ये पराभव करून खजिना व शस्त्र ताब्यात घेऊन नानासाहेबांनी स्वतंत्र घोषित करून ते बिठूर ला गेले.
 परंतु कानपूरचे सर्व सूत्रे तात्यानी हाती घेऊन कानपूर मध्ये थांबले.
 परंतु हा इंग्रजांचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्यामुळे  हॅवलाॅक व नील हे इंग्रज अधिकारी मोठे सैन्य घेऊन कानपूर वर हल्ला करण्यासाठी व परत जिंकून घेण्यासाठी आले.

 या बोला इंग्रजांच्या सैन्यांचा मोठा त्यांचा निभाव लागणे शक्य नव्हते त्यामुळे तात्यांनी उरलेल्या सैन्य घेऊन ग्वाल्हेर आले.

 नानासाहेब बिठूरहून निघून लखनौकडे गेले होते.

परंतु कॉलर मध्ये दबा धरून बसलेले तात्यासाहेब टोपे यांनी इंग्रज सैन्याने बिठूर काबीज करून मुख्य सैन्य लखनौकडे रवाना करताच तात्या टोपे यांनी पुन्हा हल्ला करून कानपुर काबीज करून ताब्यामध्ये घेतले.

 परंतु या वेळेस लगेच इंग्रजांनी कानपुर वर चाल करताच तात्यांनी कानपूर सोडावे लागले.

 ह्यावेळी खजिना व शस्त्रे तात्यांनी आपल्या सैन्याबरोबर घेतली होती.यांच्या साह्याने तात्यांना काल्पी काबीज करून सात हजारांची फौज उभी केली.

        १८५७ च्या स्वतंत्र संग्रामामध्ये  गाॅल्हेरहून 
   आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून नानासाहेबांनी तात्यांचीच निवड केली होती.

 त्या वेळी तात्यांच्या कर्तृत्वाचा कस लागला. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले.

१८५७ मधील दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणच्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपे होते.

त्यांचा धाडसी स्वभाव, गनिमी काव्याचे अवगत तंत्र, स्वदेशावरची श्रद्धा आणि स्वामिनिष्ठा यांच्या बळावर त्यांच्या तलवारीला धार आली होती. कानपूर, लखनौ, झाशी असे कूच करताना तात्यांचा पराक्रम पणाला लागला.

कमकुवत सैन्य, नियोजनाचा अभाव पैसा-रसद-तोफा या साधनांची कमतरता असताना त्यांना यशापयशाची चव चाखायला लागत होती, कधीी जीत तर कधी जित तर कधी पराभव पण तात्यांचा आत्मविश्वास प्रचंड होता.

      नानासाहेब पेशवे यांचा अज्ञातवास , गाॅल्हेरच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईचा पराभव या पार्श्वभूमीवर एकच मराठी वाघ शत्रूला तोंड देत शत्रूवर जरब बसवत होता. वेळोवेळी इंग्रजांच्या तावडीतून सुटून पुढचे ध्येय गाठण्याचा त्यांचा प्रयत्न इंग्रजांना मेटाकुटीला आणत होता.

       तात्यांच्या या पराक्रमाची गाथा जगभर पसरली. काही युरोपियन इतिहासकारांनी तात्यांच्या शौर्याचा गौरव त्या काळी केला होता.

तांत्या टोपे हे 27 जून 1857 रोजी झालेल्या काऊनपोरच्या हत्याकांडातील एक नेते होते. त्यानंतर, टोपे यांनी 16 जुलै 1857 रोजी ब्रिटीश सैन्याने त्यांना चांगली बचावात्मक भूमिका घेतली. त्यानंतर त्यांनी जनरल सिरिलचा पराभव केला. काऊनपोरची दुसरी लढाई, जी 19 नोव्हेंबर 1857 रोजी सुरू झाली आणि सतरा दिवस चालली. सर कॉलिन कॅम्पबेलच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी पलटवार केला तेव्हा टोपे आणि त्याच्या सैन्याचा पराभव झाला.टोपे आणि इतर साथीदार घटनास्थळावरून निघून आणि त्यांना झाशीच्या राणीकडे आश्रय घ्यावा लागला आणि तिलाही मदत तात्यानी केली.

पुढे तंट्या आणि राव साहेबांनी ब्रिटिशांच्या हल्ल्यात झाशीला मदत केल्यावर राणी लक्ष्मीबाईला हल्ल्यातून सुटण्यास मदत झाली.राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत मिळून त्यांनी ग्वाल्हेरच्या नाना साहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली आणि छत्रपतींच्या आशीर्वादाने किंवा संमतीने हिंदवी स्वराज्य (स्वतंत्र राज्य) घोषित करून ग्वाल्हेर किल्ल्याचा ताबा घेतला. ग्वाल्हेर इंग्रजांकडून गमावल्यानंतर नाना साहेबांचे पुतणे टोपे आणि रावसाहेब राजपुतानात आले . त्यानी टोंकच्या सैन्याला त्याच्यात सामील होण्यास प्रवृत्त करू घेतले.

१८ जुन या दिवशी राणी लक्ष्मीबाई धारातीर्थी पडल्या आणि गाॅल्हेरही इंग्रजांच्या नियंत्रणात गेले.
यानंतर तात्यांनी गनिमी पद्धतीने झुंजण्याची रणनीती आखली.

तात्यांना नामोहरम करण्यासाठी मग ब्रिटिशांनी त्यांचे वडील, पत्नी आणि मुले यांना अटकेत टाकले .तात्यांना पकडण्यासाठी इंग्रज सेनानी तीन दिशांनी प्रयत्न करत होते; पण तात्या त्यांच्या जाळ्यात येत नव्हते. यातील तीन सेनानींना हुलकावणी देऊन आणि पाठलागावर असणाऱ्या इंग्रज सैन्याची दाणादाण उडवून २६ऑक्टोबर १८५८ या दिवशी तात्या नर्मदा ओलांडुन दक्षिणेत उतरले .

            राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांनी मराठी सैन्याच्या प्रचंड कत्तली करून १८५७ चा उठाव दडपण्याचा प्रयत्न केला 
मात्र तात्या टोपे आपल्याबरोबरच्या सैन्यासह मध्य व उत्तर भारतात कधी इंग्रजांशी लढत तर कधी निसटून जात परंतु ते हार मानावयास तयार नव्हते.

 वेगवान हालचाली करीत तात्यांनी आपल्या पाठलागावर असलेल्या डझनभर इंग्रज अधिकाऱ्यांच्या फौजेच्या तुकड्यांना दमवून बेजार केरून सोडले.

उत्तरेत अलवर ते दक्षिणेत तापी नदी आणि पूर्वेला सागर ते पश्चिमेला छोटा उदयपूर या विस्तीर्ण प्रांतात तात्या टोपे इंग्रजांना हुलकावणी देत पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात जीव आणण्यासाठी अनेक संस्थानिकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत होते. पण तात्यांना कुणाचीही साथ मिळाली नाही. इंग्रजांच्या जबरदस्त सैन्याच्या व त्यांच्या क्रूर कत्तली यांच्या दहशतीने तात्यांना मदत मिळू शकली नाही. तात्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
                 ७ एप्रिल रोजी फितूर मानसिंगाने तात्यांना पकडून इंग्रजांच्या ताब्यात दिले. १४ एप्रिलला तात्यांना क्षिप्री येतील लष्करी न्यायालयापुढे आणण्यात आले. ह्यावेळी न्यायालयात तात्याने स्पष्टपणे सांगितले ." मी जे काही केले ते माझे धनी नानासाहेब यांच्या आज्ञेनुसार केले .कुठलाही साक्षी पुरावा देण्याची माझी इच्छा नाही. मी तुमच्याशी युद्ध केले आहे व आता मी मरणाला सिद्ध आहे.
         या घटनेला इंग्लंडमधील नव्हे, तर युरोपातील वर्तमानपत्रांनीही प्रमुख स्थान दिले.ही बातमी तात्यांच्या रणकुशलतेचे श्रेष्ठत्व पटवून देणारी होती.
तात्यांची एकाकी झुंज थकली, जिंकण्याची आशा लोपली. इंग्रजांपुढे वाकायचे नाही हा निश्चय मात्र कायम होता. तात्या शत्रूपासून बचाव करताना मानसिंग या मित्राच्या आश्रयाला गेले. तात्यांच्या पराक्रमाला थिटी पाडणारी घटना घडली, तात्यांचा मागमूस काढणारी इंग्रजी फौज मानसिंगापर्यंत पोहोचली. मानसिंगाची फितुरी नडली आणि तात्या इंग्रजांचे कैदी झाले.

                 ७ एप्रिल, १८५९ रोजी आरोपांना उत्तर देताना तात्यांच्या चेहेऱ्यावर भीती नव्हती, अपराधीपणा नव्हता, दु:ख तर नव्हतेच, देशाभिमान अन्‌ हौतात्म्याचे समाधान मात्र होते. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धातल्या होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. या ठिकाणीच त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तसे तात्या टोपेंचे पुतळे मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आहेत. भोपाळला तात्या टोपे नगर नावाची पेठ आहे, तात्या टोपे स्टेडियम आहे, शेजारी टोपेंचा भव्य पुतळाही आहे.

           तात्या यांच्या कार्याविषयी जनरल ह्यू लिहितो '१८५७ च्या विद्रोहात जे नेते सामील होते ,त्या सर्वांमध्ये तात्या टोपे हे अप्रतिम साहसी, अति धैर्यवान आणि दृढनिश्चयी होते .त्यांची संघटनशक्ती व प्रतिभा प्रशंसनीय होती.' जॉर्ज फॉरेस्ट ह्याने तात्यांना सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय नेता म्हटले आहे. तर स्टेडिंग या आणखी एका इंग्रजाच्या मते जर १८५७ च्या विद्रोहात तात्यांसारखे अजून दोन नेते जरी असते तर इंग्रजांना हिंदुस्थान तेव्हाच सोडावा लागला असता. प्रत्यक्ष शत्रुपक्षातील इंग्रज अधिकाऱ्यांची ही वक्तव्ये तात्या टोपेंच्या १८५७ च्या युद्धातील श्रेष्ठत्व सांगतात ..
सदर फोटो विकीपीडीया येथून 
तात्या सापडले.
तांत्या टोपे यांनी त्यांच्यासमोर लावलेले आरोप मान्य केले, परंतु त्यांनी नमूद केले की त्यांना फक्त त्यांचे स्वामी, पेशवा यांच्यासमोर जबाबदार धरले जाऊ शकते. 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी येथे त्यांना फाशी देण्यात आली.
 येथे ज्या ठिकाणी तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले तेथे त्यांच्या ह्या हौतात्म्याची आठवण म्हणून केलेली स्मारक शिळा नंतर इंग्रजांनी काढून टाकली. स्वातंत्र्यानंतर पुन्हा ही शिळा बसवून त्या जागी चौथरा बांधून त्यावर तात्या टोपे यांचा तलवारधारी पुतळा बसविण्यात आला.

१८ एप्रिल, १८५९ रोजी त्यांना मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे फाशी देण्यात आली. या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. महाराष्ट्राचे ऊर दु:खाने पण अभिमानाने भरून येतो.

         अशा या थोर स्वातंत्र्य सेनानीला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
👉संदर्भ 
 एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका येथे टँटिया टोपे
 महमूद, सय्यद जाफर (1994). आधुनिक भारताचे स्तंभ, १७५७-१९४७. नवी दिल्ली: आशिष पब. घर. pp. 14-15. ISBN 9788170245865.
 एडवर्डस, मायकेल (1975) रेड इयर. लंडन: स्फेअर बुक्स; pp. 132-34
 पॉल 2011, पी. ५३.
 पॉल 2011, पी. ५४.
 चिशोम, ह्यू, एड. (1911). "तांत्या टोपी". एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. खंड. 26 (11वी आवृत्ती). केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस. pp. ४०१–४०२.
 "तंट्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई". newsstrend.news. न्यूजस्ट्रेंड. 20 एप्रिल 2020 रोजी पुनर्प्राप्त.
 "जॅकेट आणि टाटा टोपेच्या केसांचे लॉक". भारतातील संग्रहालये.
 एडवर्डस, मायकेल (1975) रेड इयर. लंडन: स्फेअर बुक्स; पृ. 129-35
                      

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४