लाल परीचा प्रवास...

 अगदी जसं कळतंय तस लाल परी अर्थात st बस अगदी कमी वयात आकर्षण होत. आमच्या घरा पासून मला कळतंय तस सकाळी 6ची गाडी. नंत्तर 8:30ची गाडी, दुपारी 12:30ची गाडी परत संध्याकाळी 6ची गाडी रात्री 8:30ची गाडी माझ्या घरा पासून होती. त्यामुळे खेडे गावात मोठी ST गाडी पाहणं म्हूणजे आम्हा लहान मुलांना कौतुक वाटे.

आपल्याला गाव खेड्यापर्यंत पोहोचवणारी, मामाच्या गावाची नेहमी आठवण करुण देणारी, तिच्या खिडकीत बसले की झाडे पळत आहेत असा भास होणारी, कॉलेजात जात असताना खिडकीतूनच रुमाल टाकून सीट बूक  करणारी पोर h, हिरव्या रंगाच्या सीट, रंग उडालेले लोखंडी रॉड, धावत असताना खडखड वाजणाऱ्या खिडक्या, पावसाळ्यात टपकणारे छत असणारी लाल परी म्हणजे राज्य परिवहन महामंडळाची बस ७३ वर्षां पेक्षा वयाने मोठी झालीय.

आमच्या लहान पाणी आम्हला वाटे त्या गाडीत बसाव.गाडी आली की त्या गाडी पाहण्यासाठी लांब असलं तरी पोर पारावर बसायची. लाल परी आली की त्यातील बसलेली माणसं बघायची..हात करायचा. परत परत आपल्या खेळात रामायचं... परत दुरुस्या St ची वाट पाहायची...हळू हळू मोठ असताना घरातील माणसं St गावाला घेऊन जात तेव्हा मात्र ह्या लाल परीत बसायची हौस पुरी होत असे..खूप छान वाटायचं.. कधी कधी वडापणे जावं लागायचं तेव्हा मात्र वडापच्या त्यागर्दी पेक्षा लाल परी ST बसच जवळची वाटायची.

बस चा प्रवास तसा दहावी पर्यत कमीच पण इतर कॉलेज ला जाणारी पोर ST प्रवास पाहता आला. दहावी नंतर मात्र ST नें मोठा प्रवास निमसोड ते सातारा ते स्वरगेट सुनील नावाच्या भावा बर केला..तो अनुभव मात्र कायम आठवणीत आहे कधी कधी डोळ्यासमोर येतो.
त्यानतर मात्र गाव सोडुन कराडला ITI ऍडमिशन घेतल्या मुळे महिन्यातुन दोन दा निमसोड पुसेसावळी कराड असा प्रवास अनुभवता आला.अगदी 31रुपयात कराडला जात होतो.आत्ताच्या मनाने तेव्हडी भाडं कमी..
अशा माझा आणि लाल परी च नातं... प्रवासाठी आपलं हक्काच आणि अगदी जवळच कनेक्शन..अश्या परस्थितीत लाल परी पासून झालेला माझा प्रवास AC बस बर्यत येऊन पोहचला पण... आज ही लाल परी डोळ्यासमोर येते आणि मनातून जात नाही...
आजची लाल परीची अवस्था पाहताना मनातून दुःख होत. आणि अस्वस्थ ही...सर्वत्र दिसणाऱ्या लालपरी बस दिसत नाहीत.. तेव्हा मात्र खूप मन गंभीर होत..
आता आपण वयक्तिक व भावनिक लाल परी नातं सांगितलं पण हया लाल परीचा सुद्धा इतिहास आहे. मोबाईलच्या युगात व्हाट्सअप युगात लाल परीची खालील फोटो मिळाला 1जून 1948रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गाने महाराष्ट्रातील ST धावली होती. तीच ही महाराष्ट्रातील पाहिली लाल परी..
साधारण पणे दररोज 70लाख महाराष्ट्रातील लोकं ह्या लाल परीचा प्रवासासाठी आधार घेत होती. आत्ता मात्र याचं लाल परीला अस्तिवाची आधाराची  गरज भासू लागली आहे.

आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असे नाव असले तरी तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली नव्हती. त्यामुळे हे नाव असण्याचा प्रश्न नव्हता. तेव्हा गुजरात, मुंबई आणि महाराष्ट्र मिळून ‘बॉम्बे स्टेट’ होते. त्यामुळे बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन, असे एसटी महामंडळाचे नाव होते पूर्वीच. पुढे संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू झाला.

"गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" अशी हाक देऊन वेळोवेळी या ब्रीदवाक्यनुसार हळूहळू  शहरांपासून ग्रामीण खेडगाव  एसटीचा विस्तार होत गेला आहे..

महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज आहे .  एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. या सेवेचा गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा व गोवा इत्यादी राज्यांत विस्तार झाला आहे.

👉तसेच ३६ बसेसचा ताफा असलेल्या एसटी महामंडळाकडे आज 76वर्षानंतर 18 हजार बसेस पेक्षा जास्त बस आहेत.

👉ST अर्थात लाला परीचे सेवक असणारे एक लाखपेक्षा जास्त कर्मचारी आहेत.

👉 महामंडळाकडे एसटीची साधी बस, एशियाड ,हिरकणी, अश्वमेध, शिवनेरी तसेच आधुनिक विठाई आणि शिवशाहीसारख्या बसेसही आहेत.

👉*सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली*

एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

1)राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला. आपण न्यूज पेपर, टीव्ही वर पाहिल असेल.

2)मात्र, गेल्या दोन वर्षा पासून स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी न करता कोरोनासारख्या महासंकटातही एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बजावत होते आहेत.

3) सेवा बजावत असताना 500पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

4)तसेच कोट्यवधी रुपयांचा चुराडा झालेला आहे.

 सध्याच्या परिस्थितीत एसटी महामंडळाचा संचित तोटा अनेक कोटीने वाढलेला आहे.

तुमच्या-आमच्या सुख-दुःखाला धावून येणाऱ्या या एसटीला संजीवनी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पक्ष भेद विसरून यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये ST राजकारणाचा विषय होत आहे.हे चागलं नाही.आमदार, खासदार, मंत्री यांची पेन्शन बंद करून ती मदत ST ला सजीवनी देण्यासाठी केली पाहिजे..

ग्रामीण भागातील जनतेच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या या एसटीला दीर्घायुष्य लाभले पाहजे. आपण सर्व एक दिवस वृद्ध होऊ पण लाल परी तारुणच राहिली पाहिजे.


ST प्रवास करत ST बसच्या सीट वर बसून हा लेख लिहावा अस वाटलं लेखकांना सुचल तस तो मांडला आहे.

लेखक ©®:-नितीन घाडगे 


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४