मराठासमाजातील प्रथमच व भारतातून व्हिक्टोरिया काँस संपादन करण्याचा बहुमान मिळविणारे विर पुरूष कै.यंशवतराव बाळाजी घाडगे.



👉व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे

👉 यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो.

🙏शहीद यशवंत घाडगे 🙏

   येथे व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचा दरवर्षी ९ जानेवारी रोजी स्मृतिदिन साजरा केला जातो.

👉मराठा समाजातील प्रथमच व्हिक्टोरिया काँस संपादन करण्याचा बहुमान मिळविणारे विर पुरूष कै.यंशवतराव बाळाजी घाडगे



    शौर्याचा अतुलनीय पराक्रम करीत शत्रूंची धूळधाण उडविणाऱ्या माणगाव तालुक्यातील आंब्रेवाडी पळसगाव येथील शूरवीर व्हिक्टोरिया क्रॉस पदक विजेते शहीद वीर यशवंतराव बाळाजी घाडगे यांना पाचव्या मराठा लाइट इन्फ्रंट्रीमध्ये असताना वीरमरण आले होते.


👉यशवंतराव घाडगे याचा कालखंड

 त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२१ साली झाला होता. तर त्यांना वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १० जुलै १९४४ रोजी वीरमरण आले.

 👉बालपण:-

     यशवंत बाळाजी घाडगे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात पळसगाव-आंब्रेची वाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई होते. वडील बाळाजीराव हे शेतकरी होते. या जोडप्याला दोन मुले व चार मुली अशी सहा अपत्ये होती.

यशवंत अवघ्या तीन महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले.

👉 त्यांचे निधन होण्यापूर्वी यशवंतचा मोठा भाऊ वामन हा सैन्यात भरती झाला होता. त्यामुळे त्याचा तुटपुंजा पगार हाच या कुटुंबाचा आधार होता.


     कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी विठाबाईंना शेतात काम  करावी लागली. यशवंतने शिकून पुढे चांगले नाव कमवावे असे त्यांना वाटत होते. त्यामुळे यशवंतला त्यांनी पळसगावच्या मराठी शाळेत घातले. वयाच्या अकराव्या वर्षी यशवंत मराठी चौथीची परीक्षा उत्तीर्ण झाला. उच्च शिक्षणासाठी शहरात जाणे हे त्याकाळी  अशक्य होते. त्यामुळे यशवंत शेतां मध्येच काम करू लागले .

👉भावाप्रमाणे सैन्यात जावे असे यशवंत यांनासुद्धा वाटू लागले.  शिवाय घाडगे घराण्याची लष्करी परंपरा अनादी काळापासून चालू आहे.


     सहा वर्षांनंतर थोरला भाऊ वामन निवृत्त होऊन गावी परतला, तेव्हा आपणही भावाप्रमाणे सैन्यात जावे असे यशवंतला वाटू लागले. तसा त्यांना  लाठी, बोथाटी व दांडपट्टा फिरवणे व कसरत करण्याची आवड होती. त्याची शरीरयष्टी सडपातळ, काटक आणि मजबूत होती.

 👉मात्र यशवंतने सैन्यात जावे असे विठाबाईला वाटत नव्हते.

पण वामनचा आग्रह व यशवंतचा निग्रह यांमुळे विठाबाईचा नाइलाज झाला. यशवंतने लग्न केल्यास आपण त्याला सैन्यात जाण्यास परवानगी देऊ अशी अट विठाबाईने घातल्यामुळे यशवंतला लग्न करावे लागले.

👉विवाह 

 पाटणूसच्या पांडुरंग महामुणकरांची कन्या लक्ष्मीबाई हिच्याशी त्याचा विवाह झाला.याच काळात दुसर्‍या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते.

👉 सैन्यात भरती झाले 

तेव्हा १९३८ साली यशवंत घाडगे पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये साधे शिपाई म्हणून  भरती होऊन दाखल झाले. त्यांनी कडक सैनिकी प्रशिक्षण घेऊन आपल्यावर सोपविलेल्या लहानमोठ्या कामगिर्‍या व विशेष अवघड जबाबदाऱ्याअतिशय कौशल्याने व तत्परतेने पार पाडल्या.

👉नाईक पदावर बढती मिळाल

त्याच्या अंगभूत गुणांमुळे त्यांना लवकरच नाईक पदावर बढती मिळाली.


👉 हिटलर व मुसोलिनीच्या सैन्याला धूळ चारणारे महाराष्ट्राच्या मातीतले यशवंतराव घाडगे.

     दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश फौजांसोबत लढण्यासाठी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीला इटलीत पाठविण्यात आले. तेथे ब्रिटिश फौजेला इटली व जर्मनीच्या फौजेशी लढायचे होते. १० जुलै १९४४ रोजी जर्मन सैन्याच्या एका तुकडीसोबत नाईक यशवंतरावांच्या सैन्याची गाठ पडली. दोन्ही बाजूंनी बंदुका, टॉमीगन्स, तोफा धडधडू लागल्या होत्या.

👉  शत्रूच्या ताब्यात असलेले ठाणे जिंकून घेण्याच्या ईर्ष्येने मराठा पलटण पुढे सरकत होती.

  यशवंत घाडगे यांनी हातबाँब फेकून शत्रूची मशीनगन बंद पाडली. ठाण्याचे रक्षण करणारे अनेक जर्मन सैनिक त्यांनी यमसदनी पाठविले. आपल्याच कैफात घाडगे पुढे सरकत चालले होते.

👉 शत्रु सैन्याचे ठाणे काबीज केले

     अचानक आपल्याकडील काडतुसे व हातबाँब यांचा साठा संपल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता ते ठाण्याच्या अगदी जवळ आले होते. त्यांनी मग मागचापुढचा विचार न करता आपली बंदूक उलट धरून शत्रूच्या सैनिकांवर झेप घेतली. बंदुकीच्या दस्त्याने हाणामारी करून ते शत्रुसैनिकांना लोळवू लागले. त्यांचा त्वेष पाहून शत्रुसैनिक माघारी पळू लागले. त्यांच्या पलटणीने शर्थ करून ते ठाणे काबीज केले.


👉त्यांनी सुमारे १५० ते २०० शत्रूंचा खात्मा केला होता.


👉 यशवंतराव घाडगे यांना वीरमरण आले.

     आपला विजय झाल्याचे लक्षात आल्यावर घाडगे यांनी क्षणभर थांबून मोकळा श्वास घेतला. त्यांचा संपूर्ण देह रक्ताने न्हाला होता. ते शांतपणे उभे राहिल्याचे पाहून जवळच्याच खंदकात लपलेल्या एका जर्मन सैनिकाने संधी साधून त्यांच्यावर गोळी झाडली. या गोळीने अचूक वेध घेतला व घाडगे खाली कोसळले. क्षणार्धात त्यांची प्राणज्योत मावळली.

👉ब्रिटिश सरकारला त्यांच्या या पराक्रमाची दखल घ्यावी लागली त्या शूरवीराचे स्मारक इंग्रजांनी जुन्या माणगाव तहसील मैदानात बांधले आहे.

      लाल किल्ल्यासमोरील मैदानात भरलेल्या दरबारात त्यांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा सर्वोच्च सन्मान मरणोत्तर प्रदान करण्यात आला. व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते घाडगे यांच्या वीरपत्नी लक्ष्मीबाईंना हे मानाचे पदक प्रदान करण्यात आले.






👉 हिटलर व मुसोलिनीच्या सैन्याला धूळ चारणारे महाराष्ट्राच्या मातीतले यशवंतराव घाडगे यांची पराक्रमाची माहिती आपण विसरत चाललो होतो. परंतु परदेशामध्ये त्यांच्या नावाने वर्तमानपत्र मधील लेख दरवर्षीच्या छापून येतात.





👉   अशोक साबळे यांच्या प्रयत्नातून वीर घाडगे यांच्या पुतळ्यावर कायमस्वरूपी छत्री बांधण्यात आली होती, ती आजही आहे. यापूर्वी वीर घाडगे यांचा स्मृतिदिन १७ जानेवारी होत असे. आता तो ९ जानेवारीला होत आहे. कारण त्यांची जन्मतारीखच कुणाला माहिती नव्हती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर खरी तारीख मिळाल्यावर हे शासकीय अधिकारी ९ जानेवारीला घाडगे उत्सव दरवर्षाप्रमाणे साजरा करीत आहेत.






👉जयंतीनिमित्त मिलिटरी भरती होत असे.

  पुतळ्याला त्यांच्या जयंती उत्सवात वीरपत्नी लक्ष्मीबाई घाडगे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येतो. यापूर्वी त्यांच्या जयंतीनिमित्त मिलिटरी भरती होत असे. त्या वेळी अनेक तरुण भरतीसाठी येत असत. आता ती आर्मी भरतीसुद्धा बंद करण्यात आली आहे.


  👉  वीरपत्नीच्या पदरी उपेक्षा

  शहीद यशवंत घाडगे यांचे मोठे स्मारक, संग्रहालय आणि सैनिक विश्रांतिगृह बांधणे तसेच इतर अनेक आश्वासने दिली गेली होती, ती अद्यापही पूर्ण झाली नाहीत.

👉वीर यशवंतराव घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई घाडगे आज ९० पेक्षा जास्त वयाच्या आहेत.

माणगाव शहराचे नाव जेव्हा घेतले जाते तेव्हा शहीद वीर यशवंतराव घाडगे यांचे नाव आवर्जून घेतले जाते त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अतुलनीय असे शौर्य गाजविले होते.


©®लेखक :-नितीन घाडगे

8888494588


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४