आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* 18मे

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १६६६*
शिवाजीराजांनी एक वेगळीच चाल
आदल्या दिवशी महाराजांना समजले की, जाफरखानाने बादशहाला 'दगाबाज सीवाला भेटु नये' असा सल्ला दिला. मग काय, महाराजांनी जाफरखानालाच त्याच्या घरी भेटायचे ठरवले. तस आधी रघनाथपंतांबरोबर निरोप पाठवून 'भेटायला येऊ का?' विचारले. मात्र आश्चर्य म्हणजे यावेळी जाफरखानाने त्याला स्वतः ला भेटायची परवानगी दिली. त्याप्रमाणे महाराज मौल्यवान नजराणे घेऊन त्याच्या घरी गेले व त्याचा गौरव केला. आपला अर्ज बादशहाकडे करावा असे त्याला महाराज समजावत होते. महाराज आणखीनही बोलले असते पण, तेवढ्यात आतल्या खोलीतुन जाफरखानाची पत्नी फर्जनाह बेगम हिने त्याला निरोप पाठवला की, 'शाइस्ताखानाची बोटे तुटली, अफझलखान मारिला तसे तुम्हासही शिवाजी मारील. त्यास लवकर निरोप देणे.'
ही फर्जनाह बेगम, मुमताज महल व शाहिस्तेखान हे तिघे सख्खी भावंडे होती. तीन वर्षांपूर्वी शाहिस्तेखानावर लाल महालात काय प्रसंग ओढवला हे फर्जनाहला आठवले म्हणुनच तिने घाबरून जाफरखानाला हे सांगितले. गंमत म्हणजे आदल्याच दिवशी स्वतः जाफरखानाने हाच सल्ला बादशहाला दिला होता.
जाफरखानही या अनपेक्षित भेटीमुळे आधीच गांगरला होता. त्याने 'बादशहाकडे तुमचा अर्ज करतो' असे उत्तर महाराजांना देऊन त्यांना मानाची वस्त्रे दिली व त्यांचा निरोप घेतला.
महाराज त्यांच्या डेऱ्यात परत आले व त्यांच्या मुत्सद्यांना म्हणाले 'जाफरखानही दिलखुलाश्याने बोलला नाही बरे, श्री करेल ते खरे'
महाराज काही मारामारी करायला किंवा दगाफटका करायला जाफरखानाला भेटायला गेले नव्हते. पण महाराजांच्या पराक्रमाचा हा करिष्मा होता की, त्यांच्याविषयी शत्रूपक्षाकडीलही लोकांचे काही समज झाले होते जसे की, शिवाजीला चेटूक येते, तो जमिनीवरून १०-१५ हात उंच उडी मारू शकतो, त्याला पंख आहेत, त्याला सैतान प्रसन्न आहे, तो भिंतीतुन प्रकट होतो वगैरे वगैरे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १६७५*
मराठ्यांनी अंकोला, कारवार जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १६८२*
छत्रपती शाहू महाराज जयंती
(मृत्यू १५ डिसेंबर १७४९)
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे वा स्वराज्यसंकल्पीका आऊसाहेब यांच्या प्रेरणेने स्वराज्यनिर्माते शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्माण करण्याचा पाया रचला, स्वराज्य निर्माण केले, ते निर्माण केलेले स्वराज्य रक्षीण्याचे शिवकार्य स्वराज्यरक्षक शिवपुत्र शंभूराजांनी, येसूबाईसाहेबांनी, छत्रपती राजाराम महाराजांनी केले.
पुढे या स्वराज्याचा विस्तार संताजी धनाजी सारख्या मातब्बर सरदारांच्या मदतीने ज्यांनी उत्तर भारत, मध्यभारत, गुजरात , माळवा पर्यंत केला ते स्वराज्यविस्तारक म्हणजे शंभुपुत्र छत्रपती शाहु महाराज.
यांचा जन्म १८ मे १६८२ झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १६८२*
म्हैसुरच्या "चिकदेवराय"कडून मराठे पराभूत झाले पण 'मुदेरच्या नायकावर' मराठ्यांनी विजय मिळवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ मे १६८४*
शहजादा रामघाटाने वर येऊ लागला तेव्हा 'मरीचा रोग' उत्पन्न होऊन त्याच्या सैन्यातील बरेचसे लोक मृत्युमुखी पडले, घोडे, हत्ती, उंट इतके मेले कि त्यांची दुर्गंधीने सारा प्रदेश दुषित होऊ लागला. जनावारे मेल्याने सर्वांवर पायी चालण्याची पाळी आली. आपल्या पुत्राची बातमी ऐकून बादशहाने त्यास नवीन सरंजाम पाठवला. व आजच्या दिवशी होते नव्हते सर्व गमावून शहजादा 'अहमदनगर' येथे आपल्या पित्याजवळ पोहचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १७२४*
नालछा येथे बाजीरावाची आणि निजामाची यशस्वी भेट.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १७७४*
बारभाई कारस्थान : माधवरावांना पेशवाईची वस्त्रे
१८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१८ मे १७७५*
राघोबा व इंग्रज यांचीं सैन्ये गुजराथेंत असतांना त्यांच्या लोकांच्या व हरिपंताच्या लहान लहान चकमकीं होतच होत्या (एप्रिल व मे १७७५). १८ मे सन १७७५ रोजीं कर्नल कीटिंग राघोबासह पुण्यावर चालून येत असतां त्यांच्यां सैन्याशीं हरिपंतांनी आराम येथें लढाई दिली. इंग्रजांच्या तोफखान्याच्या माऱ्यामुळें अखेर जरी मराठयांचा पराभव झाला तरी या लढाईत इंग्रजाचें बरेंच नुकसान झालें.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४