आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२ मे १६५६*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मे १६५६*
छत्रपती शिवरायांनी "रायगड किल्ला" ताब्यात घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मे १६६५*
मुघल सरदार दाऊदखान किल्ले सिंहगडाच्या दिशेने नासधूस करीत जावू लागला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*२ मे १६८३*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून राजव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी कारभारी रघुनाथ नारायण हणमंते यांचे निधन. असा कोश तयार करणारे महारक मध्ययुगातील एकमेव राज्यकर्ते
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मे १७३९*
बुधवारी वसईच्या तटाजवळ सुरुंग लावले त्यात डाव्या बाजूचा सुरुंग उडाला आणि उजव्या बाजूचा उडाला नाही. यात अचानक मराठी फौजा धीर न धरता पुढे गेल्याने फौजेचे नुकसान झालं.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मे १८१८*
त्र्यंबकेश्वरची शान असलेला 'नास्सक' हिरा
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर नोव्हेंबर १८१७ पुणे सोडले अन् इंग्रजांपासून बचावासाठी त्यांची पळापळ सुरू झाली. पण ते इंग्रजांच्या तावडीत सापडले अन् पेन्शन घेऊन बिठूर येथे राहणे त्यांनी पसंत केले. १८१८ ला पेशवाईचा अस्थ झाला. त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांची संपत्ती ताब्यात घ्यायला व त्यांचे खजिने लुटायला सुरुवात केली. कॅप्टन ब्रिग्जला नाशिकच्या संपत्तीच्या शोधाची मोहीम हाती देण्यात आली. त्याने २ मे १८१८ च्या रात्री त्र्यंबकेश्वर लुटले. ही लूट डेक्कन प्राईज मनी अॅक्शन नुसार सैन्यांमध्ये वाटली गेली. मात्र, सोने व हिऱ्यांसारख्या वस्तू इंग्लंडला पाठविण्यात आल्या. यात नास्सक हिराही इंग्लंडला गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मे १८४८*
क्रांतीविर राघोजी भांगरेना ठाणे कारागृहात फाशी.
या महान आदिवासी क्रांतिकारकाच्या १७३ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२ मे १९२१*
स्वातंत्र्यवीर सावरकरांची अंदमानच्या अंधार कोठडीतून
दि.२ मे १९२१ रोजी सुटका झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment