चांगल्या सवयी जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनात खालील गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्या जरूर फॉलो केल्या तर जीवनात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.
1)प्रत्येक व्यक्तीने रोज वाचन करायला पाहिजे. वाचणाने मनुष्य समृद्ध होतो. ज्ञानात भर पडते.
2)बिजनेस किंवा कमातून, जॉब मधून वेळ भेटलं असे भटकंती करावी.फिरायला गेल्यास विचाराच्या सीमा वाढत जातात.
3)वेगवेगळ्या सिनेमा, नाटकें,पाहावीत.त्यामुळे नवीन विषय माहिती होतं जातात.
4)वेळ मिळेल तसा नवीन लोकांशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस स्वतः बद्दलचे आत्मपरीक्षन करता येते.
5)रोज वेळात वेळ काढून कोणताही खेळ जरूर खेळावा. त्यामुळे शरीर व मन सुदृढ होत जाते.नवीन मित्र होतात.
6)रोज सकाळ किंवा संध्यकाळी मादिरात किंवा घरात आरती, ध्यान, पार्थना, किंवा आध्यत्मिक ग्रन्थ वाचण केले पाहिजे. त्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होऊन चैतन्य निर्माण होते.
7)रोज मेडिटेशन करावे, नामस्मरण करावे. बरेचसे रोग, आदी व्याधी मीडिटेशन ने नष्ट करता येतात. अशक्य ही गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य मेडिटेशन ध्यानामध्ये आहे.
10)रोज वेळात वेळ व्यायाम ,काढून चालणे फिरणं पळणे किंवा सूर्यनमस्कार बैठका काढणे.योगा करणे किंवा शिकणे.
11)रोज नित्य नियमित डेली डायरी लिहणे.यामध्ये दिवस भर आपले रुटींग लिहावे. वेळेचे नियोजन करावे.
12)पडलेली स्वप्न लिहून ठेवणे.
13)कोणत्याही प्रकारचे व्यसनापासून दूर राहावे.
14)पुढील दिवसाचे आदल्या दिवशी नियोजन करावे.
15)आपल्यातील कमतरता व चागल्या गोष्टी याचा समतोल साधण्यासाठी नियोजन करावे.
16)कोणत्याही एकाच आर्थिक उत्पन्नावर अवलंबून न राहता. मिळाल्या वेळेमध्ये नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावेत.
17)वेळेच नियोजन.
18)चागलं विचार, चागल्या गोष्टी, कथा कादंबऱ्या, इतिहास, विविध विषयावरती लेखन जसं सुचलं तसं. वहीमध्ये लिहावं किंवा सोशल मीडियावर लिहावे.
19)जीवनात सेफ्टी फस्ट. उदा.कंपनीत काम करताना विविध सेफ्टी साधनाचा वापर करावा. सेफ्टीचे नियम तंतोतंत पाळावे. कारण जीवन अनमोल आहे.गाडीवर सुद्धा हेल्मेट वापवे. चार चाकीत सुद्धा बेल्ट चा वापर करावा.
20) जीवन अनमोल आहे. त्यासाठी बचत करून इन्शुरन्स काढावा. यामध्ये गाडीचा इन्शुरन्स असेल. मालमत्तेचा इन्शुरन्स असेल. किंवा गोल्ड इन्शुरन्स असेल. हेल्थ इन्शुरन्स असेल. किंवा लाइफ इन्शुरन्स असेल. मेडी क्लेम इन्शुरन्स असेल. तो जरूर काढून ठेवावा.यामुळे आपत्ती काळामध्ये परिस्थिती हँडल करण्यासाठी उपयोगी आहे.
21) आपत्ती जनक काळामध्ये वापरण्यासाठी राखीव आर्थिक गोष्टी साठी नियोजन करून ठेवणे.
22)
लेखक :-नितीन घाडगे
Comments
Post a Comment