आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२३ मे १६६३*छत्रपती शिवरायांनी कुडाळ हस्तगत केले.
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ मे १६६३*
छत्रपती शिवरायांनी कुडाळ हस्तगत केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ मे १६७३*
थॉमस निकल्स हा इंग्रज रायगडावर आला
इस १६६१ मधे शिवाजीराजांनी स्वतः जाऊन इंग्रजांची राजापूरची वखार (Factory) यथेच्छ लुटली होती. इतकी की तिथला व्यापारच पुढे पार ठप्प झाला. याचे कारण म्हणजे त्या वखारीचा मुख्य हेन्री रेव्हिंग्टन याने महाराज पन्हाळगडावर जौहरच्या वेढ्यात अडकलेले असताना, जौहरला मदत केली होती व पन्हाळ्यावर तोफा डागल्या होत्या. त्याचीच अद्दल महाराजांनी इंग्रजांना घडवली. तसेच, रेव्हिंग्टन व काही इंग्रजांना पकडून कैदेत टाकले.
तसेच त्यानंतरही एकदा सेनापती प्रतापराव गुजरांनी इंग्रजांची हुबळीची वखार लुटली होती.
या दोनही लुटींची भरपाई इंग्रज महाराजांकडे बरेच वर्षे मागत होते. पण महाराज त्यांना टोलवत होते. मध्यंतरी इंग्रजांनी शिवाजीराजांचे एक मालाने भरलेले गलबतही राजापूर बंदरात पकडून ठेवले होते. शेवटी सामोपचाराने बोलणी करण्यासाठी १९ मे १६७३ रोजी एकूण ३७ लोकांसह टॉमस निकल्स याला इंग्रजांनी मुंबईहुन रायगडवर पाठवले. २१ मे रोजी निकल्स रायगडाच्या पायथ्याशी पोहोचला. महराज त्यावेळी रायगडावर नव्हते म्हणुन मग निकल्सने संभाजीराजांना भेटायची परवानगी मागितली, जी त्याला मिळाली. मात्र २२ मे रोजी खुप पाऊस असल्याने तो रायगडवरती जाऊ शकला नाही. २३ मे रोजी सकाळीच तो रायगड चढुन गेला. रायगडचे त्याने केलेल वर्णन त्याच्या डायरीत आहे ते अगदी वाचण्यासारखे आहे. त्यात तो म्हणतो की, रायगडच्या वाटेत पक्क्या पायर्या खोदलेल्या आहेत. काही ठिकाणी २४ फुट उंचीचा तट बांधला आहे. ४० फुटांवर दुसरी भिंत बांधून हा किल्ला इतका अभेद्य बनवला आहे की, अन्नाचा भरपूर पुरवठा झाल्यास हा किल्ला अल्प सैन्याच्या जोरावरही सर्व जगाविरूद्ध लढू शकेल. पाण्याकरिता मोठे तलाव आहेत व ते पावसाळ्यात भरल्यावर पाणी पुरून उरेल. माथ्यावर जणु मोठे शहरच वसवले आहे. तिथली घरे सामान्य प्रतीचीच व खराब आहेत. अत्युच्च भागी शिवाजीचा चौसोपी वाडा आहे. त्याच्यात बसुन तो कारभार पाहतो. तिथे गेल्यावर मला समजले की, संभाजी अजुन तसा लहान व अननुभवी असल्याने तो महत्त्वाच्या गोष्टी पहात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकारी निराजीने माझ्याकडून काही कापड खरेदी केले ज्याची किंमत मला अजुनही मिळाली नाही!
भेटीच्या पहिल्याच दिवशी निकल्सच्या तोंडाला पाने पुसली गेली. महाराजांची माणसेही 'बिलंदर' होती.
शिवाजीराजांनी इंग्रजांना पुरते ओळखले होते. एक दोन अपवाद वगळता इंग्रजांशी लढाई न करता महाराजांनी त्यांना शह दिला. शिवाजीराजांचेच इंग्रजांविषयीचे एक वाक्य आहे
'यांचे खाविंद तर प्रत्यक्ष राज्यकर्तेच आहेत आणि राज्य करणाऱ्यास स्थललोभ नाही ऐसे काय घडो पाहते?... राज्याचा लोभ मेलियाने सोडायचे नाहीत.'
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ मे १६७७*
जिंजीचा बंदोबस्त केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज वायव्येस २३ मे रोजी वेलोरे येथे गेले. त्या किल्ल्यावर अब्दुलाखान म्हणून विजापुरी अधिकारी होता. दक्षिण हिंदुस्तानात अत्यंत मजबूत असा हा किल्ला घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जोराची तयारी केली होती. किल्ल्यास वेढा घातल्यावर किल्लेदाराने आपल्या पराक्रमाची शर्थ करून किल्ला लढविला. तेव्हा किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यासाठी महाराजांनी नजीकच्या दोन टेकड्यांवर नवीन दोन किल्ले बांधिले आणि त्यांस साजरा, गोजरा असे नाव दिले आणि त्यावरून तोफांचा मारा वेलोरेच्या किल्ल्यावर सुरू केला. वेलोरे हा भुईकोट किल्ला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ मे १६९८*
छत्रपती राजाराम महाराज यांची पत्नी "राणी राजसबाई" यांच्या पोटी "संभाजी" (दुसरे) यांचा जन्म.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ मे १७२९*
पेशवे "थोरले बाजीराव" यांनी अलाहबादचा सुभेदार 'मुहम्मदखान बंगश' याचा दारुण पराभव केला.
खान मोठे सैन्य घेऊन 'बुंदेलखंडावर' चालून आला तेव्हा राजा "छत्रसाल" याने "थोरल्या बाजीरावांची" मदत मागितली. पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात, 'जो गति ग्राह गजेंद्रकि सौ भई हे आज..... बाजी जात बुंदेलकी राखो बाजी लाज'.
आपल्या २५,००० घोडदळासकट बाजीराव त्याच्या मदतीस धावून आले, सर्वप्रथम खानची संपुर्ण रसद तोडून त्याला मुघल बादशहाकडून कुठलीच मदत मिळु दिली नाही.
जयपुरकडून खानाचा मुलगा "कैमखान" बापाच्या मदतीस धावून आला पण "थोरल्या बाजीरावांनी" त्याचा पराभव केला. आता 'बंगशखानने' पुर्णपणे शरणागती पत्करली व "राजा छत्रसाल" वर पुन्हा आक्रमण करणार नाही असे कबुल करुन आपली सुटका करुन घेण्यात यशस्वी झाला.
"राजा छत्रसालने" बाजीरावांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांना काल्पि, झांशी, सागर, सिरोंज, हरदेनगर यांचा वार्षिक महसुल " ३३ लक्ष " बहाल केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२३ मे १७३७*
पोर्तुगिझांकडून जिंकल्यानंतर "थोरले बाजीराव" यांनी "अर्नाळा किल्ला" पुनश्च बांधुन घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment