८ मे १७०७*औरंगजेबाच्या मृत्युनंतर “छत्रपती शाहूंची” सुटका झाली. तब्बल १७ वर्षे ६ महिन्यांच्या कैदेतून मुक्त झाले.

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १६६३*
शाहिस्तेखानवरती महाराजांचा छापा पडला. दि. ६ एप्रिल १६६३. यावेळी औरंगजेब बादशाह काश्मिरात श्रीनगर येथे होता. त्याला या मराठी छाप्याची बातमी दि. ८ मे १६६३ या दिवशी कळली. तो चकीतच झाला. चिडलाही. तो त्वरित दिल्लीस परतला. शाहिस्तेखानाची ही तीन वर्षांची मोहिम पूर्ण वाया गेली होती. तो विचार करीत होता. आता या शिवाचा बंदोबस्त कसा करावा ? प्रथम त्याने शाहिस्तेखान मामांना पत्र पाठविले की, ‘तुमची बदली आसाम-बंगाल सरहद्दीवर ढाका या ठिकाणी करण्यात येत आहे. तरी ताबडतोब ढाक्याकडे रवाना व्हावे‘ त्या काळी या भागात कोणाची बदली वा नेमणूक केली गेली तर ती एकप्रकारे बादशाहांची नाराजी आणि शिक्षाही समजली जात असे. हा बदलीचा हुकूम मिळाल्यावर खानाने औरंगजेबास एक नम्र पश्चातापाचे पत्र पाठवून विनंती केली की, मला एकवार पुन्हा संधी द्या. मी शिवाचा बिमोड करतो. (पण माझी ढाक्यास बदली करू नका.) पण बादशाहने पुन्हा जरा कडक शब्दांत खानास हुकूमावले की, ताबडतोब ढाक्यास रवाना व्हा.
आता निरुपाय होता. दु:खी खान ढाक्याकडे रवाना झाला.
याच काळात आसामच्या राज्यात लछित बडफुकन या नावाचा एक जबरदस्त सेनापती आसामच्या ओहोम राजघराण्याच्या पदरी होता. हा लछित आपल्या संताजी वा धनाजीसारखाच अचाट कर्तृत्त्वाचा सेनापती होता. आसामच्या या स्वतंत्र राज्याचे मोगलांशी सततच युद्ध चालू होते. लछितने तर दिल्लीला अगदी हैराण केले होते. या लछित बडफुकनला शाहिस्तेखान आता आसामवरती येणार असल्याच्या बातम्या मिळाल्या. दक्षिणेतील शिवाजीराजाने या खानाला फजित करून पिटाळला आहे हे लछितला तपशीलवार कळले असावे; असे दिसते. ‘बडफुकन‘ या शब्दाचा अर्थ ‘ बडा सेनापती ‘ मुख्य सेनापती असा आहे. या लछितने शाहिस्तेखानाला एक पत्र पाठविल्याची नोंद, ‘शाहिस्तेखानकी बुरंजी‘ या नावाच्या एका आसामी बखरीत आहे. लछित या खानाला लिहितो आहे.
‘अरे, तू दक्षिणेस गेला होतास. तेथे असलेल्या शिवाजीराजाने तुझी पार फजिती केली. तुझी बोटेच तोडली म्हणे! आता तू आमच्यावर चालून येतो आहेस. आता तुझे डोके सांभाळा ?
शिवाजीमहाराजांची करामत पार आसामपर्यंत त्याकाळी कशी पोहोचली होती याचे हे उदाहरण आहे.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १६८२*
मराठ्यांच्या फौजेने छत्रपती शंभूराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांच्या सैन्यावर हल्ले सुरु केले अशातच शुभकरण बुन्देलाचा मुलगा दलपत बुन्देलाच्या मोर्चावर मराठ्यांनी हल्ला केला, त्यामुळे बुन्देल्याकडील अनेक माणसे मेली. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १६९६*
सेनापती संताजी आपल्या फौजेनिशी जिंजीत दाखल.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १७०७*
औरंगजेबाच्या मृत्युनंतर “छत्रपती शाहूंची” सुटका झाली. तब्बल १७ वर्षे ६ महिन्यांच्या कैदेतून मुक्त झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १७५८*
रघुनाथराव आणि मल्हारराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पेशावरचे युद्ध जिंकून पाकिस्तान प्रांतात भगवा फडकवला होता.
पेशावर जिंकून मराठा साम्राज्य अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचले होते.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १८९९*
क्रांतीकारक वासुदेव चाफेकरांना ८ मे १८९९  रोजी रँडच्या हत्येसंदर्भात फासावर चढवण्यात आले. तीनही चाफेकर बंधू शहीद झाले.
 
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*८ मे १९१५*
लॉर्ड हार्डिंग्जच्या हत्तीवर बॉम्बस्फोट करणाऱ्या मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी या शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिवस ! 
डिसेंबर १९१२ दिनी लॉर्ड हार्डिंग्ज आपल्या लव्याजम्यासह कलकत्त्याहून निघून दिल्लीत प्रथमच पोचणार होता. एखाद्या राजासारखी हत्तीवरील हौद्यात बसून त्याची लेडीसह मिरवणूक निघणार होती. अन्य मांडलिक राजांचे हत्ती, घोडे, उंट त्याच्यापुढे असणार होते. इंग्रजांशी एकनिष्ठता दाखवण्याची उत्तम संधी! रासबिहारी बोस आणि त्यांचे सहकारी यांनी या हत्तीवरच बॉम्ब फेकायचा  निर्धार केला. जुन्या किल्ल्यापासून लाहोर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तीन मजली इमारत त्यांनी हेरली. मिरवणुकीच्या वेळी इथे महिला घराच्या माड्यांवर बसून गम्मत पाहणार हे उघड होते. इमारतीत महिलेच्या वेशात जाऊन बसायचे आणि वरून बॉम्ब टाकायचा हे ठरले. मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी, वसंतकुमार विश्वास आणि स्वतः रासबिहारी यामध्ये सहभागी होते. हा बॉम्ब रासबिहारींनी स्वतः निर्माण केला होता. त्याचे नाव होते लिबेर्टो. हा सुरक्षिततेसाठी दोन भागात बनवलेला बॉम्ब होता.
लॉर्ड हार्डिंग्ज पत्नीसह हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या हौद्यात बसला, त्याच्या मागे जमादार बसला आणि राजाच्या ऐटीत मिरवणूक सुरु झाली. क्रान्तिकारकांनी ठरविलेल्या ठिकाणी हत्ती आला. बसंत कुमार बिस्वास बुरखाधारी स्त्रीचा वेष घालून वरच्या मजल्याच्या गच्चीत बसले होते. योग्य ठिकाणी हत्ती येताच त्यांनी बॉम्बचे दोन सुटे भाग जुळवले आणि नेम धरून बॉम्ब हौद्यावर फेकला. जमादार खलास झाला. पाठीकडच्या  चांदीच्या जाड पत्र्यामुळे हार्डिंग्ज वाचला परंतु जखमी झाला , त्याचा अंगरखा फाटला, पुढच्या सत्कार कार्यक्रमातून माघार घेण्याइतकी त्याची तब्येत बिघडली. मिरवणुकीचा त्याने इतका धसका घेतला, की पुढे कपूरथळामध्ये अशी मिरवणूक निघाली तेव्हा त्याने तेथील राजाला स्वतःच्या शेजारी बसवूनच मिरवणुकीत भाग घेतला!
बॉम्बस्फोट करून पाचहीजण यशस्वीरीत्या गायब झाले. या स्फोटाच्या तपासात इंग्रजांना थेट यश कधीच मिळाले नाही. पण पुढे फितुरीमुळे राशबिहारी सोडून अन्य चौघे पकड़ले गेले. राशबिहारी जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिन्द सेना उभारली. 
मास्टर अमीरचंद न्यायालयात बेडरपणे उद्गारले,'तुम्ही ब्रिटिश संख्येने आहात कितीसे? सर्व भारतीय तुमच्याकड़े पाहुन थुंकले तरी त्या लोटात तुम्ही वाहून जाल, दुर्दैवी आम्ही आहोत,आधी कोण थुंकणार यावर भांडत बसू.'
प्रत्यक्ष कोणताही पुरावा नसुनही इंग्रजांनी दिल्ली कारागृहात अवध बिहारी,भाई बालमुकुंद आणि मास्टर अमीरचंद यांना आजच्याच दिवशी फासावर चढवले तर बसंतकुमार बिस्वास या तरुणाला अम्बाला कारागृहात ११ मे दिनी फाशी देण्यात आले...शतशत प्रणाम..!!

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...