भावकी अशी पाहिजे...! दहा गुंठे शेती असलेल्या पुतण्याच्या लग्नासाठी वर्गणी जमविली. हेरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

भावकी अशी पाहिजे...! दहा गुंठे शेती असलेल्या पुतण्याच्या लग्नासाठी वर्गणी जमविली.
 आमची भावकी चांगली आहे असे म्हणणारे फार दुर्मिळ आहेत, आमच्यासारखी नालायक भावकी कोणाचीच नाही, असे म्हणणारे  पावलो पावली खूप आहेत.

खरेच आपल्याच रक्ता मासाची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत? हे एक कोणालाच न सुटलेले कोडे आहे. अनेक पिढ्या, घरेदारे, मोठमोठी घराणी यात भूईसपाट झाल्याचा इतिहास आहे,
 उदाहरण पाहू.

दुर्योधना कडे सगळं आहे..  त्याचा बाप राजा आहे.काहीच करायचं नाही फक्त सुख भोगायच, पण....!
 त्याच तो युवराज आहे,सर्व प्रकारच्या शक्ती त्याच्याकड आहे, पत्नी आहे. सगळी सुख आहेत .

पण त्याच "ध्यान" हे पाडवाना सुख मिळू नये याकडे आहे..


म्हूणन दुःख आहे..मग बुद्धी सुचली 
कट करुन 
पाडवाना मग जुगार खेळायला भाग पडणं...
त्याना वनवासाला पाठवण,
 त्याना गळीत ठेवणं,
त्याना विष घालन,
त्याच्या पत्नीचा अपमान करणं  हित  दुर्योधनाच  दुर्बुद्धी  सुचली आणि तेथून महाभारताला सुरवात झाली आहे

त्याच ध्यन हे सुखावर नाही तर पाडवाना सुख मिळू नये हिते असल्यामुळे महाभारत घडलं...
आज ही प्रत्येक गावात घराघरात महाभारत घडताना दिसत आहे

बरीचशीच लोक श्रीमंत आहेत. सर्व सुख त्यांच्या पायाशी आहेत.... पण त्यांचं धन भावकीवर आहे...

शहाजीराजे, शिवराय, शंभूराय यांनाही याच्या झळा लागलेल्या आहेत, पुण्यातील पेशव्यांनी तर यात कळस गाठला आहे, 

ती इतिहासाची पाने तर रक्तरंजीत आहेत, थोडक्यात यातून कोणाचीच सुटका होत नाही, कारण तसा कोणी प्रयत्न केला तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो, कारण भावकीतील व्यक्तीला नमवीण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व दडलेला असतो, त्याचा मद व्यक्त करण्यात एक असूरी आनंद असतो. 

आज दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणाचा क्रमांक नेहमी पहीला राहीला आहे.

भावकीला बदलवणे सर्व धर्मातील रती महारती, सत्ताधीश यांना जमले नाही, आपल्यालाही ते जमणार नाही.

भावकीच्या भांडणात देवही हरले असं म्हणावे लागेल.जर तेव्हाच तो देव जिंकला असता तर महाभारत घडलेच नसत.रामा ला वानवास नसता भेटला.... पण 


   गावा गावात अनेक अनुभव प्रत्येकास जीवनात कधी तरी आले असतीलच.... अन भावकी म्हणजे जणू विकृत मनोवृत्तीत वावरणारी तोळी वाटली..

भावकी बांद कोरणारी असते.

भावकी ठरलेले लग्न मोडणारी असते .

भावकी शुभ कार्यात, लग्नातसुद्धा कुरळीक काढून तमाशा घालणारी असते.

भावकी अशी पण असते आख्खा देश पुढे गेला तरी चालेल पण भावकीतील कुणी पुढे गेलेला सहन नाही होणार अशी पण असते.
एकाद्याची प्रगती न बघवणारी भावकी असते.

भावकी राहिलेली पण 10 गुंठे जमीन कधी विकलं यांची वाट बघणारी पण असते...

भावकी आपली पोर शाबूत ठेऊन दुऱ्याची तरुण पोर व्यसनी करून सोडणारी पण असते..

भावकी जाणून बुजून अडचणीत आणून घर जमीन विकायला लावतील अशी पण असते..

कुणी काही चागलं जमीन घर घेतली तर जाळणारी पण असते.

भावकी घरा घरात वाद लावनारी पण असते....

भावकी भावा भावात आग लावनारी असते अन त्याच आगीत शेकतबसणारी पण असते ...

भावकी दोन्ही कडून बोलून स्वार्थ साधनारी पण असते .

अशी शेकडो उदारण आहेत.सांगता येथील 

रामायण, महाभारता पासून..आद्य, मध्य इतिहासात..अनेक उदाहरण पाहायला मिळतील...

गावात भावकी असते असे प्रत्येक जण बोलत असतो सगळेच असं असतील असं पण नाही...

आत्ताची भावकी जळणारी आहे पण जरूर एकदा अफ़वाद आसू शकतो..अन तो का असू नये ...आणि असाच भावकी कशी असावी याचं मूर्तिमंत आदर्श उदाहरण म्हणजे  आणि असच दुर्मिळ अपवाद हेरेवाड या गावी ता. शिरोळ जि. कोल्हापूर या गावात घडला .

भावकी अशी पाहिजे...! दुर्मिळ उदारहण.. आहे..दहा गुंठे शेती असलेल्या पुतण्याच्या लग्नासाठी वर्गणी जमविली. 


लेखन :-नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...