आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ मे १६४२*
"शिवा जंगम'' या सद्गृहस्थास छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे-अर्चेसाठी नेमले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ मे १६७४*
छत्रपती शिवराय व हेन्री ऑक्झन्डेन यांची रायगडावर भेट
आजच्याच दिवशी २६ मे १६७४ रोजी हेन्री ऑक्झन्डेन हा शिवरायांना रायगडावर भेटला होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झन्डेन हा ह्या भव्य सोहळ्यासाठी आमंत्रित दहा हजार पाहुण्यांपैकी एक होता. इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेन्डन हा राज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्यासाठी १९ मे ला पाचाडला पोहोचला होता. शिवाजी महाराजांच्या मंचकारोहणा नंतर रायगडावर उपस्थित असलेला इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन ह्याने शिवाजी महाराजांना भेटवस्तू दिल्या. त्यामधे एक मुल्यवान अंगठी, एक हजार सहाशे रुपये व एक खुर्ची हे होते. त्याने शंभू बाळाला व काही मंत्र्यांना मिळून ३०६५ रुपयांची भेट दिली. हेन्रीने त्याच्या रोजनिशीत राज्याभिषेकाचा वृतांत दिला आहे. ह्या समारंभात तो काही दिवस रायगडावरच भवानी टोकाजवळ राहिला होता. इंग्रज किंवा इतर पाश्चात्य सत्तांनी राज्याभिषेकाची नोंद घेतल्याचे दिसले तरी मुघल साधनांत ह्याची साधी नोंदही आढळत नाही. त्यावेळी औरंगजेब पंजाबातील उठाव शमवण्याच्या मागे होता पण तो इतकाही दुदखुळा नव्हता की शिवाजीचा राज्याभिषेक त्याला कळलाच नसावा. त्याचा चरीत्रकार मुस्तैदखान व इतिहासकार खफीखान ह्या बाबतीत काही लिहीत नाहीत. दख्खनमधील बहादुरखानाचा इतिहासकार भीमसेन सक्सेनाही ह्या बाबतीत पूर्ण मौन बाळगतो..

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ मे १७२७*
टिपू सुलतान हा रॉकेटचा शोध लावणारा भारतातला पहिला माणूस होता वगैरे आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. वास्तवामध्ये टिपूच्या जन्माच्या कितीतरी आधीपासून हिंदुस्थानात दारूचे बाण ( रॉकेट्स ) वापरात होती. याचं एक ठळक उदाहरणे म्हणजे १६५८ साली औरंगजेब आणि दारा-शुकोह यांच्यामध्ये झालेल्या युद्धात अशा दारूच्या बाणांचा वापर झाला होता. मराठेशाहीत देखील दारूच्या बाणांचा वापर होत असे आणि यातली काही उदाहरणे टिपूच्या जन्माच्या आधीची आहेत. 
सातारच्या शाहू छत्रपतींच्या २६ मे १७२७ च्या पत्राचे. या पत्राद्वारे शाहू छत्रपतींनी नागपूरकर भोसल्यांकडून काही शस्त्र सामग्री मागवली होती, त्यात दारूच्या बाणांचा उल्लेख आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ मे १७३३*
पेशवे थोरले बाजीराव यांनी आबाजीपंत पुरंदरे यांना सिद्दी संदर्भात पत्र लिहिले. पत्रात ते म्हणतात,"-
सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत. एक अंजनवेल आणि दूसरा उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर उत्तम आहे. 
सरखेल उंदेरिस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आलीयावर याची किंमत कमी होइल आणि आसराही तूटेल."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२६ मे १८१७*
ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे दुसरे बाजीराव ह्यांच्याकडून त्रिंबकजीच्या निषेधाचा जाहीरनामा काढून घेतला. कंपनीने रायगड, सिंहगड, आणि पुरंदरचा ताबापण घेतला. (हा नावापुरताच ताबा ठरला कारण पुढे पुन्हा इंग्रजांना हे किल्ले जिंकून घ्यावे लागले!)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४