आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १६६१*
इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली. पोर्तुगीझांनी त्यावेळी साल्सेट, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, आणि वडाळा स्वतःकडे ठेवून उरलीसुरली मुंबई इंग्रजांना देऊन टाकली होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १६६६*
आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज ११ मे रोजी 'मालुकचंद सराय' येथे येऊन पोहचले. येथुन आग्रा शहर खुपच जवळ होते.
छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर.
मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १६७०*
औरंगजेबाने स्वराज्याच्या विरोधात १० तोफांचे गाडे व दारुगोळा पाठवला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १६७८*
सातारा प्रतापगडमार्गे "छत्रपती शिवराय" रायगडावर दाखल.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १६८१*
बादशहाच्या फौजा पाठीवर असल्यामुळे छत्रपती संभाजीराजांना पाठवलेल्या पत्राची वाट न पाहता 'शहजादा अकबर' तसाच खानदेश बागलानातून महाराष्ट्रात आला. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १६८६*
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील लहान तारवास समुद्रात फिरण्याची प्रत्येकी चार आण्यापेक्षा जास्त पैसा न देता दस्तक द्यावा अशी विजरईने कॅप्टनला आजच्या दिवशी आज्ञा दिली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १७३९*
मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होऊन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १८५७*
पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*११ मे १८८८*
ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४