आजचे शिवकालीन दिन विशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ मे १६५८*
विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*५ मे १६६१*
एका वलंदेजी पत्रात राजांच्या चपळ हलचालींमुळे आदिलशाही अधिकाऱ्यांची उडालेली तारांबळ दिसून येते राजांनी कोकणात कुडाळपर्यंत सर्व भाग जिंकून घेतला असेही त्यात म्हटले आहे. फेब्रुवारी १६६० ला दाभोळही राजांच्याकडे आले व त्याच सुमारास कुडाळचा किल्लाही त्यांनी जिंकला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*५ मे १६६३*
गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला छत्रपती शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.
१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गाडी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. 
१६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

 *५ मे १६८०*
छत्रपती संभाजी महाराजांनी रामजी नाईक ठाकूर या वकीलाबरोबर गोव्याचा विजरई यास 'सलोख्याचे' पत्र पाठवले. या पत्रात छत्रपती शंभूराजांनी आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले आणि पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यास सुचवले. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*५ मे १६८२*
कारवार जवळील अंजदीव बेटावर छत्रपती संभाजी राजे किल्ला बांधणार यामुळे गोव्यास धोका उत्पन्न होणार कारण अरब व छत्रपती संभाजीराजे यांची मैत्री दिवसेदिवस वाढत होती व अरब हे पोर्तुगीझांचे शत्रू. त्यामुळे अंजदीव बेट छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात जाण्याची भीती विजरईला वाटू लागली व आजच्या दिवशी त्याने अंजदीव बेटाचा ताबा घेतला. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*५ मे १९११*
शहीद प्रीतीलता वड्डेदार यांचा जन्म
(मृत्यू - २३ सप्टेंबर १९३२)
भारतीय स्वतंत्र लढ्यात शहीद होणारी पहिली महिला…
२१ वर्ष वयाच्या मुलीने इंग्रजांविरुद्ध लढतांना आपल्या प्राणाची आहुती दिली तिचं नाव आहे “प्रीतीलता वड्डेदार.” प्रीतीलता वड्डेदार चा जन्म बंगाल मधील चिटगाव येथे ५ मे १९११ रोजी झाला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४