आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳📜 २९ मे इ.स.१६६६....

⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष  ⛳

📜 २९ मे इ.स.१६६६....

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे कैदेत असताना, मोगल सरदार रामसिंग यांची महाराजांवर देखरेख होती रामसिंगाचा कारभारी परकालदास यांनी इ.स २९ मे १६६६ ला डिंगल भाषेत लिहले आहे...,

अर सेवोजी डील तो हकीर छेटोसो ही देखता दीस जी।
अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपूछो राजवी दिसौजी।
हिम्मती मरदानगी ने देखतां असौ दिसौजी बहुत मरदानो
हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी दाढी छै ।।

शिवाजी महाराज मध्यम उंचीचे आहेत त्यांच्या वर्ण आश्चर्यकारक गोरा आहे हिंमत व वीरवृत्तीने युक्त असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांना दाढी आहे...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मे इ.स.१६७१
पानोली येथे व्हिसेरेई आणि हिंदुस्थानचे कॅप्टन जनरल कौंट द लाउरादीव यांनी राज्य सल्लागार मंडळाची बैठक पाचारण केली. त्यांनी राज्य सचिव डॉ. आंद्रे फ्रेअरी द आताईद यांना बैठकीसमोर ठरावाचे वाचन खड्या आवाज करण्यास सांगितलेल्या सूचनेनुसार त्यांनी ठरावाचे वाचन करण्यास प्रारंभ केला: "दांड्याच्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा घालून पुष्कळ दिवस झाले आहेत. आमच्या चौल येथील किल्ल्याचे कॅप्टन नुनू द मेलू द सिल्व यांनी वारंवार पत्रे पाठवून दांड्याच्या वेढ्याचा वृत्तांत आम्हाला कळविला आहे. आम्ही त्यांना मागे सुचना केली होती की, सिद्दीस शक्य ती मदत करावी. त्या सूचनेनुसार ते सिद्दीला मदत करीत आहेत. या मदतीमागील आपला उद्देश उघड आहे. दांड्याचा किल्ला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज वरचढ झालेले आम्हाला नको आहे. या वेढ्यापायी सिद्दी इतका डबघाईस आला आहे की, सैन्याचा पगार घालण्यास त्याच्यापाशी पैसा नाही. या अडचणीतून निभावणी व्हावी म्हणून त्यानी आमच्यापाशी मदतीची याचना केली. आम्ही त्याला मदत केली तर त्याच्या बदली तो आमचे मांडलिकत्व पत्करण्यास तयार आहे". राज्य सल्लागार मंडळाने सिद्दीस मदत पाठविण्याचा निर्णय एकमताने घेतला. महाराजांचा व पोर्तुगिजांचा मैत्रीचा आणि शांततेचा करार झाला परंतु पोर्तुगिजांकडून त्या कराराचे कटाक्षाने पालन होत नव्हते. त्यांच्या हितसंबंधांच्या आड तो करार येत असल्यास त्याचा भंग करावयास ते मागे पुढे पहात नसत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मे इ.स.१६७४
(श्रीनृपशालिवाहन शके १५९६, आनंद नाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध ४, चतुर्थी, वार शुक्रवार)

महाराजांची समंत्रक मुंज!
              "राजश्रींची मुंज झाली". उपनयन संस्कारामुळे महाराज आता "द्विज" झाले होते. "उत्तरेस क्षत्रियांचे व्रतबंध होतात त्याप्रमाणे व्रतबंध करावा हा विचार आधी करून भट गोसावी यांनी राजियाचा क्षेत्री व्रतबंध केला. शुद्ध क्षत्रिय आधी केला. मौजीबंधनानंतर त्याच दिवशी दुपारी म्हणजेच (यावेळी पंचमी सुरू झालेली होती.) तुलादान व तुलापुरुषदान विधी करून महाराजांनी उशीरा मुंज झाल्याबद्दल व आजवर कळत-नकळत घडलेल्या हत्यांबद्दल प्रायश्चित्त घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मे इ.स.१६८०
(ज्येष्ठ शुद्ध द्वादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शनिवार)

पोर्तुगीज आधिकारी व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद !
             तो म्हणतो की, "आपले पिताश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाची वार्ता कळली. आम्हास फार दुःख झाले. मृत्यू कोणालाच चुकत नाही. दैवी इच्छेसमोर कुणाचीच मात्रा चालत नाही". आपणासारखा शांततेने राज्य करणारा राजा प्रजेस लाभला याबद्दल आपली प्रजा आभिनंदनास पात्र आहे. गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांच्या निधनाबद्दल शोकसंदेश पाठवला

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मे इ.स.१६८७
(ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, शके १६०९, प्रभव संवत्सर, वार रविवार)

शेखनिजाम हैद्राबादी उर्फ मुकर्रबखान (तकरीबखान) कुतुबशाहीतून फितूर !
          कुतुबशाहीवर जेव्हा औरंगजेब बादशहाचे आक्रमण झाले, त्यावेळी खरे तर याने औरंगजेब बादशहा विरुद्ध पराक्रमाची शर्थ केली. जेव्हा एखादा शूर सरदार युद्धात पराजित होत नसतो. तेव्हा त्याला बुद्धिबळाच्या पटावर पराजित करण्यात औरंगजेब बादशहा माहीर होता! साम-दाम-दंड-भेद वापरून शेख निजाम यांस औरंगजेब बादशहाने प्रलोभने दाखवून अखेर फितूर केलेच.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २९ मे इ‌.स.१७३७
मनोरवर विजय...
तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

☀🚩⚔️|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी.||⚔️🚩☀

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४