आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻*६ मे १६३६*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*६ मे १६३६*
शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे तह झाला
इ.स. १६३६ मध्ये बादशहा शाहजहान याने दक्षिण काबीज करण्याच्या हेतूने निजामशाहीवर स्वारी केली आणि राज्य जिंकून घेतले परंतु मोगलांच्या राजधानीपासून दूर असलेला हा प्रांत ताब्यात ठेवणे अवघड असल्याने ६ मे १६३६ या दिवशी त्याने आदिलशहाबरोबर तह केला. त्यात असे ठरले की,' मामले रायगड व निजामशाही कोकण विजापूरच्या आदिशाहास द्यावेत त्याबद्दल आदिलशाहाने वीस लक्ष होन किंवा ऐंशी लक्ष रुपये शहाजहानला द्यावेत. या तहामुळे आदिलशाही सत्ता रायगड आणि निजामशाही कोकणावर प्रस्थापित झाली.
हा "तह" दक्षिणेतील राजकारणाला कलाटणी देणारा होता व यामध्ये २ "कलम" होते.
एका कलमाप्रमाणे 'अदिलशहा हा 'शहाजहानचा' मांडलीक झाला.
दुसर्या कलमाप्रमाणे 'निजामशाही' संपवून ते राज्य 'मुघल' व 'अदिलशहा' यांनी वाटून घेण्याचे ठरले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*६ मे १६५६*
रायरी हा किल्ला छत्रपती शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले.
रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी त्याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*६ मे १६६५*
जयसिंगाने आणि दिलेरखानाची तुंग परीसरात हल्ले
१६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत तुंग किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*६ मे १६७५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी "फोंडा किल्ला" जिंकला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*६ मे १८१८*
राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*६ मे १९२२*
राजातील माणुस आणी माणसातील राजा लोकराजा "राजश्री छत्रपती शाहू महाराज" यांचे निधन झाले.
महाराजांनी बहूजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यास भर दिला, कोल्हापुर संस्थानात "प्राथमिक शिक्षण" सक्तीचे व मोफत केले, "स्त्री शिक्षणाचा" प्रसार व्हावा म्हणुन "राजज्ञा काढली व बहूजनंना "राजकिय निर्णय प्रक्रियेत" सामावुन घेण्यासाठी 'डेक्कन रयत असोशियन' संस्था स्थापन केली.
इ.स.१९१७ मध्ये विधवांसाठी 'पुर्नविवाहाचा' कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अशाप्रकारे "शाहूंनी" समाजात महत्वाचे अनेक बदल घडवून आणले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment