मराठा साम्राज्याचा विस्तार या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती

*गोवळकोंड्याच्या कुतूबशहाचे भेटीला येण्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण आणि मराठा साम्राज्याचा विस्तार या दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम हाती घेतली होती.या मोहिमेत महाराजांनी आपल्यासोबत सरनौबत येसाजी कंक,बाजी सर्जेरावजेधे,सोनाजी नाईक दौलतबंकी,बाबाजी ढमढेरे,आनंदराव मोरे,मानाजी मोरे,सूर्याजी मालुसरे,सेखोजी गायकवाड,धनाजी जाधवराव या शूर सरदारांच्या बरोबरच 20 हजार घोडदळ व 40 हजार पायदळ घेतले होते.मार्च महिन्याच्या मध्यावर छत्रपती  शिवाजी महाराज गोवळकोंड्याला पोहोचले.कुतुबशहाने अतिशय सन्मानाने महाराजांची भेट घेतली व वस्त्रे,अलंकार,हत्ती -घोडे देऊन त्यांचा गौरव केला.तिथे एक महिनाभर मुक्काम करून महाराज दक्षिण दिग्विजयार्थ पुढे निघाले.वाटेत त्यांनी श्रीशैलम येथे मल्लिकार्जुनाचे दर्शन घेऊन तिथे 9 दिवस मुक्काम केला.श्रीशैलमहून महाराज कडप्पा मार्गे तिरुपती येथे आले.तिथे त्यांनी भगवान व्यंकटेशाचे दर्शन घेऊन तिथल्या पूजेसाठी व अन्नछत्रासाठी प्रतिवर्षी 420 होन देण्याची सनद  पुरोषोत्तम भट बुरडी यांना करून  दिली.या सनदेची तारिख होती शके १५९९,वैशाख शुद्ध १२ म्हणजे 4 मे 1677.*

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४