१४ मे १६५७*छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती 🚩छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली....सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१४ मे १६५७*
छत्रपती संभाजी महाराज यांची ३६६ वी जयंती 🚩
छत्रपती संभाजीराजांचा जन्म मे १४, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली....
सर्वांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शिवशुभेच्छा...🚩🚩
जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१४ मे १६६६*
आग्र्याच्या भेटीनंतर महाराजांना कैद करण्यात आले. त्यांना राहअंदाजखानाच्या वाड्यात नेण्यात यावे, अशी आज्ञा बादशहाने शिद्दी फौलादला केली. राहअंदाजखान हा आग्र्याचा किल्लेदार होता.
१४ मे रोजी त्याच्या हवेलीत महाराजांची हत्या करण्यात येणार होती. परंतु रामसिंग त्यांना जामीन राहिला आणि महाराज बचावले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१४ मे १६७७*
९ मे १६७७ ते १४ मे १६७७ दरम्यान छत्रपती शिवराय कर्नाटकातील पेड्डोपोलमला मुक्कामी. राजांना आपल्यावर विषप्रयोग होतोय याची शंका होती, म्हणून छत्रपती शिवरायांनी येथेच इंग्रजांकडून विषावर उतारा होणारी औषधे मागवली.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१४ मे १७५२*
छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा अफझलखानाचा कायमचा काटा काढला किंवा कोणत्याही शत्रूला दयामाया दाखवली नाही तास प्रकार पेशवाईत घडला नाही. निजाम हा थोरल्या बाजीरावांनी सोडून दिलेला सरदार कायम पिढ्यानपिढ्या पेशव्याने डोकेदुखी तर ठरलाच पण पेशवाई बुडल्यावरही त्याच्या वंशजांनी हिंदूंची ससेहोलपट केली.
अहमदिया कराराप्रमाणे बादशहा मराठ्यांना ५० लाख देणे लागत होता. मात्र करार नुसता कागदावर राहीला पैसे महीनाभर न मिळाल्याने मराठ्यांनी दिल्लीच्या आजूबाजूचा परीसर फोडून काढायला सुरुवात केली. आता ही ब्याद कशी घालववी हा प्रश्न बादशहास पडला. मात्र त्याच दरम्यान निजामाच्या गादीवरती गाझीउद्दिनला बसवण्याचा घाट नानासाहेब पेशवे घालत होते. नानांनी तशी पत्रे शिंदे - होळकरांना लिहुन गाझीउद्दीन यांस बरोबर आणावे असा निरोप दिला. त्यावरुन पंजाब प्रांतात आत्ता जायचे नसेल तर ५० ऐवजी ३० लाख द्या आम्ही दख्खनला परततो अशी मागणी शिंदे - होळकरांनी केली. मग निमाजीबद्दल गाझीउद्दीनने ३० लाख बादशहास द्यावेत बादशहाने तेच मराठ्यांस द्यावेत असे ठरले. गाझीउद्दीनला निजाम बनवून आपल्या उपकाराखाली ठेवावे असा पेशव्यांचा सरळ हिशेब होता. जावेदखानने लगोलग १४ मे १७५२ रोजी गाजीउद्दिनच्या नावे निजामीचे फर्मान काढले. बादशाही खजिन्यातून रोख पैसे मल्हाररावांन दिले. मराठे दक्षिणेत परत गेले. पण हा गाझीउद्दीन १६ ऑक्टोबर १७५२ मध्ये विषप्रयोगाने मेला. पेशव्यांचे एक राजकारण उधळले गेले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...