वाडी जहागीर ही कुरुंदवाड च्या वाटणीतून बनलेली अत्यंत लहान जहागीर होती. शिवराव पटवर्धन हे ह्या छोट्या जहागिरीचे संस्थापक
वाडी जहागीर ही कुरुंदवाड च्या वाटणीतून बनलेली अत्यंत लहान जहागीर होती. शिवराव पटवर्धन हे ह्या छोट्या जहागिरीचे संस्थापक. इ. स. १७९२ मध्ये कुरुंदवाड संस्थांनची वाटणी रघुनाथराव आणि शिवराव पटवर्धनात झाली. रघुनाथराव याना कुरुंदवाड तर शिवराव पटवर्धनांना वाडी जहागीर मिळाली. पुढे या जहागिरीचे ३ हिस्से कृष्णराव, निळकंठराव आणि कोन्हेरराव या ३ भावात झाले. पहिले २ हिस्से हे वारस नसल्याने खालसा झाले तर फक्त कोन्हेरराव याना वारस असल्याने वाडी जहागीर टिकून राहिली. जहागीरदाराना २ ऱ्या श्रेणीच्या मॅजिस्ट्रेटचे अधिकार होते.
शेवटचे जहागीरदार : मेहेरबान गणपतराव गंगाधरराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन. १९२४ - १९४८
Comments
Post a Comment