आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻*१२ मे १६६६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१२ मे १६६६*
छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक आग्रा भेट
स्वतः रामसिंग महाराजांकडे गेला व स्वागत करून बादशहाच्या भेटीसाठी 'दिवाण-ए-आम' या दरबारात नेण्याचे ठरवले परंतु महाराज पोहोचण्या अगोदर 'दिवाण-ए-आम' मधील औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस संपला होता. 

छत्रपती शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोहोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची 'ऐतिहासीक भेट'. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर होते.

औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बाल शंभूराजे यांनी औरंगजेबास सडेतोड उत्तर देऊन त्याची खिल्लत उडवून देऊन त्याचाच जबरदस्त पानउतारा केला.
औरंगजेबसमोर येताना चेहर्‍यावर फडके (रुमाल) धरून येण्याची आणि जाताना तसेच मागे फिरत पाठ न दाखवता जाण्याची प्रथा होती...
अशा वेळी क्रूर औरंगजेबच्या दरबारात त्याचाच अपमान करून हिंदुस्थानचे दोन छत्रपती कडाडले...

खामोश.. कुंवर रामसिंह.. खामोश... सांगा तुमच्या ह्या गाझी आलमगिराना... या उपरी आमच्या रक्ताने न्हाऊ घातलेल्या स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहाल तर तुमच्या मुघल सल्तनतीवर गाढवाचा नांगर फिरवण्यास हा शिवाजी राजे तसूभर हि कसूर करणार नाहीत..

साक्षात मृत्यूच्या दरबारात निशस्त्र उभे राहून आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने मृत्युलाच ललकारनारा असा अद्वितीय सम्राट जगाच्या इतिहासाने या आधी कधी पाहिला नव्हता आणि या पुढे ही पाहणार नाही..

शेरास सव्वा शेर छत्रपती नडले
औरंगजेब स्वत:ला आलमगीर आणि शेर म्हणवून घेत असे.

त्याला त्याच्याच दरबारात सव्वाशेरानी मात दिली तो सुवर्ण दिन...

महाराजांच वय त्यावेळी ३६ वर्ष होतं आणि शंभूराजे त्यावेळी ९ वर्षाचे होते ...

म्हणजे १ पूर्णशेर ३६ वर्षे..
व् दूसरा शेर १/४ म्हणजेच ९ वर्षे..

अशा प्रकारे स्वत:ला हिन्दुस्तान चा शेर म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्राचे सव्वा शेर नडले..

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१२ मे १६७४*
छत्रपती शिवाजी महाराजांनी चिपळूणला परशुराम यांचे दर्शन घेतले पूजा केली आणि ते रायगडाला १२ मे १६७४ ला परत आले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४