आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२७ मे १६६५*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १६६५*
छत्रपती शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंग यांच्याशी पत्राद्वारे बोलणी सुरू केली आणि दुसरीकडे विजापूरच्या आदीलशहाशी बोलणी करूण त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १६७२*
छत्रपती शिवरायांनी स्वतः जातीने मे च्या शेवटच्या आठवड्यात मराठा फौजेसह हरीश्चंद्रगड, चावंडगड, किल्ले हडसर, किल्ले जीवधन आदी गड-किल्ल्यांवर हल्ले केले.
शिवकाळात या गडाचे फारसे उल्लेख नसले तरी जयराम पिंडे यांच्या पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात या किल्ल्यांचा उल्लेख येतो. तो असा- तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैवच। महिषोप्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।। चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे किल्ले शिवाजीमहाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. बहुधा गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरणही याच काळात झालेले असावे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १६७४*
हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेले पत्र
राजाभिषेक समयी महाराजांची पाडलेली स्वभाषेतील (लिपीतील) नाणी तसेच प्रचलित पर्शियन / उर्दू शब्दांना पर्याय म्हणून संस्कृत / नागरी प्रतिशब्दांचा (राज्यव्यवहार कोश) वापर या क्रांतिकारक व स्वधर्मावरील, स्वभाषेवरील असलेल्या ज्वलंत निष्ठेची उदाहरणे आहेत. राजाभिषेक समयी इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर उपस्थित होता. त्याने कंपनीतर्फे जी कलमे मंजुरीसाठी महाराजांकडे आणली होती त्यातील महत्त्वाचे कलम म्हणजे इंग्रजी नाणी स्वराज्यात चालावी. मात्र महाराजांनी परकीय चलनाचा स्वराज्याला निर्माण होणारा संभाव्य धोका ओळखून इतर कलमे मंजूर करताना ही मागणी साफ नाकारली तसेच ग्रँट डफ तेव्हा दि. २७ मे १६७४ला हेन्री ऑक्झिंडेन रायगडावरुन लिहिलेल्या पत्रात असे म्हणतो, ‘and especially against that wherein it incerted that Bombay money shall go current in the Rajas (शिवाजी महाराज) dominions, which will never be granted for after his coronation he intends to setup a mint, and proposes to himself great advantage thereby.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १७०२*
'दख्खन स्वारीवर' असलेल्या औरंगजेबाने अखेर "किल्ले विशाळगड" ताब्यात घेतला.
पन्हाळा, पावनगड जिंकून विशाळगड ताब्यात घेण्यास औरंगजेबास बरोबर १ वर्ष लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १७३९*
तारापुरचा रणसंग्राम
मराठ्यांनी तारापुर किल्ला २४ जानेवारी १७३९ रोजी जिंकला. पाठोपाठ सर्व वसई प्रांत आणि साष्टि प्रांत मराठ्यांचे ताब्यात आला. दि. २७ मे १७३९ रोजी तारापूर किल्ल्याची हवालदारी मोरो नारोसिंह यांस तर फडनिशी महादजी दत्ताजी यांस सोपवण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १८१८*
परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेविषयी तह
दुसऱ्या राघोजीराजांच्या मृत्यूनंतर (२२ मार्च १८१६) त्यांचा मुलगा परसोजी यांच्या अपंगत्वामुळे भोसले दरबारात वाद निर्माण झाला. कार्यकारी शासक (रिजंट) कोण असावा म्हणून बाकाबाईसाहेब व दुसऱ्या रघुजीराजांचा पुतण्या आप्पासाहेब यांच्यात स्पर्धा सुरू झाली. बाकाबाईसाहेब या दुसऱ्या रघुजीराज्यांच्या तिसऱ्या पत्नी होय. परसोजी यांना १४ एप्रिल १८१८ रोजी समारंभपूर्वक सिहासनावर बसवण्यात आले. परंतु, २७ मे १८१८ रोजी परसोजींनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला आणि नागपूर राज्याचे स्वतंत्र गमावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मे १८२५*
'डॉ. बरनाडी पेरेस डिसोल्वा' या गोमंतकाला पोर्तुगीजांनी "गव्हर्नर" बनवले, ह्यानेच "तेरेखोलच्या किल्ल्यातुन" पोर्तुगीज सत्तेविरुध्द उठाव केला पण हा उठाव जास्त टिकला नाही. २७ मे रोजी प्रचंड "हत्याकांड" करुन पोर्तुगीजांनी हा उठाव हानून पाडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment