आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष *१३ मे १६४८*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१३ मे १६४८*
दिल्लीतील लाल किल्ल्याचे काम पूर्ण झाले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१३ मे १६५६*
छत्रपती शिवरायांच्या आदेशाने कोकण किनाऱ्यावर "किल्ले प्रबळगड" हिशोब तपासणीचे काम चालू.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१३ मे १६५६*
छत्रपती शिवरायांनी बाजीप्रभू देशपांडे यांना "हिरडस मावळ" मधील किल्ले जासलोडगड उर्फ मोहनगडची दुरुस्ती करण्याचे काम दिले. 

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१३ मे १६६६*
औरंगजेबाने दरबारात शंभुराजांचा सन्मान करून वस्त्रे, कट्यार आणि मोत्याची माळ भेट दिली.
यावेळी औरंगजेबने शंभुराजांना विचारले, "तुम्हे किसीका डर नही लगता?"
यावर शंभुराजे बोलले,
हमे किसीका डर नही लगता, मगर हमारी वजहसे सबको डर लगता है.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*१३ मे १६७०*
मराठ्यांनी मावळ प्रांतातील "लोहगड" व "विसापुर" हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

*१३ मे १६७१*
महाराजांचे एक पत्र :
"चिपळूणी सैन्याचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुभ्यास पावसाळाकारणे पागेस सामा, दाणा व वरकड केला होता तो कितेक खर्च होउन गेला. त्याकरिता कारकुनाकडुन व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास वातेल ऐसा दाणा, रतीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंद करुन चाराल नाहीसे झाले म्हनजे मग काही पडत्या पावसाळ्यात मिळणार नाही, उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व मुलुखास तजबीज देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोण्ही कुणव्याचे दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करु लागले म्हण्जे जे कुणबी घर धरुन जीव मात्र घेउन राहिले आहेत, तेही जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्यास ऐसे होईल की मोगल मुलकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची बदनामी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावलोक हो, बहुत यादी धरोन वर्तणूक करणे. कोणी पागेस अगर मुलखात गावोगांव राहिले असाल त्याणी रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजिन्यातुन वाटनिया पदरी घातलीया आहेती ज्याला जे पाहीजे ते विकत आणावे. कोणावरी जुलुम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे. तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजविजेने दाणा, रतीब कारकून देत जातील तेणेप्रमनेच घेत जावे, की उपास न पडता रोज्बरोज खायला सापडेल आणि होत होत घोडी तबाना होत ऐसे करणे. धुंदी करुन खासदार कोठीत कोठारात शिरुन लूटाया गरज नाही. खण धरुन राहिले असतील व राहतील. कोणी आगट्ये करतील, कोणी भलते जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाखुला अग्नी घेतील, गवत पडले आहे. असे मनात न आणता म्हणजे अविसाच दग होईल. ऐका खणास आगी लागली, म्हणजे सारे खण जळून जातील; हे तो अवघीयास कळते; या करणे बरी ताकीद करुन खासे असाल ते हमेसा फिरुन जावून रंधनेकरिता आगट्या जाळिता अगर रात्री दिवा घरात असेल, अविस्ताच उदिंर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वाचेल ते करणे; म्हणजे पावसाळा घोडी वाचतील. जितके खासे खासे, जुमलेदार, हवालदार, कारकून आहे, तितके हा रोखा तपशिले ऐकने आणि हुशार राहणे. येणेप्रमाने वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल त्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल, त्यास मराठियांची तो इज्जत वाचवणार नाही, मग रोजगार कैसा."

वरील पत्रावरून दिसून येईल की शिवाजी महाराजांचे किती बारीक लक्ष सैन्यावर होते. अगदी उंदीर रात्री वात पळवून नेईल इतके व्यवधान ते बाळगायला सांगत. प्रजेच्या व लष्कराच्या सांभाळाची तळमळच या पत्रातून दिसून येते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

*१३ मे १६७४*
इंग्रजांचा वकिल "हेन्री अॉक्झिंडेन" मुंबईहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या "राज्याभिषेकासाठी" रायगडास येण्यास निघाला व तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या "आगरकोट" या पीर्तुगीज ठाण्यात येऊन पोहचला तेव्हा त्याच्यासोबत एकुण ८ माणसे होती व त्यात एक श्यामजी नावाचा "गुजराथी व्यापारी" होता. आगरकोट हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील "रेवदांडा" येथे आहे. "राज्याभिषेकाचा" मुहूर्त होता दि. ६ जुन १६७४ मग "हेन्री अॉक्झिंडेन" लवकर निघाला होता का ? नाही तर त्याला "ईस्ट इंडिया कंपनीच्या" व्यापार हिताच्या काही कामांची मंजुरी "महाराजांकडून" करवुन घ्यायची होती. "हेन्री" आगरकोटला आला तेव्हा दिवस मावळला होता व 'प्रवेशद्वार' बंद झाले होते. त्याने 'पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला' सहज विचारले कि, "अजुन दिवस पूर्ण मावळला नाही तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ?" त्यावर गव्हर्नरने उत्तर दिले "अहो तशी काळजी आम्हाला घ्यावी लागते कारण ते "छत्रपती शिवाजी" केव्हा आमच्यावर झडप घालील अन आमच्या आगरकोटात शिरेल याचा नेम नाही म्हणून आम्ही हि दक्षता घेत आहोत". यातच "छत्रपती शिवाजी महाराजांचा" दरारा आणी दहशत केवढी होती हे दिसून येते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१३ मे १६७५*
भूमीपुत्रांबद्दल १६७५ च्या एका पत्रात इंग्रज काय म्हणतात...
१३ मे १६७५ ला मुंबईहुन एका इंग्रज अधिकाऱ्याकडुन राजापुरच्या अधिकाऱ्याला एक पत्र गेलं. हे पत्र जाण्यामागील पार्श्वभुमी अशी होती की अण्णाजी पंडिताद्वारे इंग्रजांना ५००० होन किंमतीचा माल विकला जाणार होता. या मालात नारळ आणि सुपारीचा समावेश होता. त्याकाळी नारळाचा दर अडिच लारी खंडी तर सुपारीचा दर ८० लारी खंडी असा होता. छत्रपती शिवाजी महाराज फक्त उत्तम प्रशासक नाही तर ते एक अत्यंत कुशल व्यापारी देखील होते. वेळेचा फायदा घेणे शिवरायांना चांगलेच ठाऊक होते. इ.स. १६६१ ला राजापुर लुटल्यानंतर महाराजांनी त्याची भरपाई देण्यास कबुल केले खरे पण त्यातील कीती पैसे वास्तविक इंग्रजांना मिळाले हा प्रश्नच आहे. त्यावर कधितरी सविस्तर लिहीला येइल. माझा हे सांगण्याचा उद्देश हा की होइल तेवढा नफा इंग्रजांकडुन महाराज कमवत होते. पैशाच्या बाबतीत तर महाराज अत्यंत दक्ष होते. वर सांगितल्या प्रमाणे ५००० होनाचा माल इंग्रज घेणार होते पण महाराजांनी त्या मालाची किंमत नारळाला ५ लारी खंडी तर सुपारीला १०० लारी खंडी लाउन त्यांना माल विकला. खरं तर हे लोक आपल्याला फ़सवत आहेत याची इंग्रजांना कल्पना आलीच असेल पण इंग्रज त्यावर फार काही बोलु शकत नव्हते. कारण पुढे महाराजांना भेटुन काही मागण्या त्यांना पुर्ण करुन घ्यायच्या होत्या. हि सर्व हकिकत १६७५ च्या एप्रिल महिन्यात घडली. राजापुरहुन ‘शिवाजी महाराज आम्हाला फसवत आहेत’ हि वार्ता मुंबई ला पोहोचली. मुंबई ला पत्र अधिकाऱ्याने वाचले. विचार करुन अधिकाऱ्याने राजापुर ला पुन्हा एक पत्र लिहिले त्या पत्रात अधिकारी लिहीतो, 
‘महाग दरात नारळ आणि सुपारी देउन अण्णाजी आपल्यावर अन्याय करीत आहेत हे खरे आहे, पण इतरही व्यापाऱ्यांना हा माल अशाच किमतीत विकल्या जातो का हे आपल्याला तपासायला पाहिजे, शिवाजी राजांचा असा प्रघात असेल तर आपल्याला तक्रारीला जागा राहत नाही. पण तुम्ही अण्णाजीचा योग्य मान ठेवा.’ यापुढे अधिकारी जे लिहीतो ते या भुमिपुत्रांचे यश आहे. तो लिहीतो ‘ज्यांच्याशी तुम्हाला वागायचे आहे ते मराठे लोक चतुर आणि चौकस आहेत. त्यांच्याशी व्यवहार करतांना विचाराने करावा. भावनाप्रधान किंवा फाजील घमेंडखोर लोकांची केवळ कुचेष्ठा करुनच न थांबता ते त्यांच्यापासुन शक्य तितका आपला फायदा करुन घेतात’.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

*१३ मे १६७७*
छत्रपती शिवाजी महाराजांनी "जिंजी किल्ला" जिंकला. महाराजांनी किल्ला जिंकण्यासाठी "सैन्याची" १ तुकडी पाठवली परंतू किल्लेदार "मुहम्मदखान" याने ५०,००० रुपयांच्या "जहागिरीच्या" मोबदल्यात किल्ला "मराठ्यांना" दिला व गडावर "भगवे निशान" फडकले. 🚩🚩🚩

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१३ मे १८०३*
सेनापती वेल्स्ली पुण्यास आल्यावर त्याने क्लोझला निरोप पाठवून बाजीरावास घेऊन पुण्यास येण्याची सूचना केली. त्यानुसार क्लोझ पेशव्याला घेऊन ता. १३ मे १८०३ रोजी पुण्यात आला व शनिवारवाड्यात मोठ्या समारंभाने इंग्रजांनी ‘ हिज हायनेस बाजीराव पंडित प्रधान बहादूर ‘ यांची मसनदीवर स्थापना केली. यानिमित्ताने पेशव्याने अधिकार धारण केल्याचा जाहीरनामा काढण्यात आला. खेरीज इंग्रजांनी पुण्यातील आपल्या तळावर तसेच मुंबई, कलकत्ता, मद्रास, सुरत व श्रीरंगपट्टण येथे खुशालीच्या तोफांची सरबत्ती करून हिंदुस्थानची अप्रत्यक्ष मालकी आपणांकडे आल्याचे सर्वांना जाहीर केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 

*१३ मे १८१८*
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी 'मॅन्रो' ने वसंतगड जिंकला.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४