१९ मे १६७३*छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रजांनी ‘थोमास निकल्स’ याला योग्य त्या सुचना देऊन व सोबत मोठ्या नजराण्याशी मुंबईहून रायगडावर रवाना केले

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१९ मे १५२०*
रायचूरची लढाई
विजयनगर सम्राट कृष्णदेवराय आणि विजापूरचा इस्माईल आदिलशाह यांच्यात रायचूर येथे युद्ध, यात आदिलशहाचा सपाटून पराभव.
विजयनगर साम्राज्याचे प्रचंड लष्करी सामर्थ्य आणि उत्कृष्ट नेतृत्व याचे प्रतीक म्हणजे रायचूरची लढाई. शत्रूचेही डोळे दिपावेत इतके प्रचंड लष्कर राजधानीतून लढाईसाठी बाहेर पडले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१९ मे १६७३*
छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या स्वतःवर कृपादृष्टी व्हावी म्हणून इंग्रजांनी ‘थोमास निकल्स’ याला योग्य त्या सुचना देऊन व सोबत मोठ्या नजराण्याशी मुंबईहून रायगडावर रवाना केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*१९ मे १६७३*
शिवाजी महाराजांनी चिपळूण येथील आपल्या जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना एक पत्र लिहिलेले आहे. यातून शिवरायांना शेतकऱ्यांबद्दल किती कळवळा होता, हे स्पष्टपणे लक्षात येते. लष्कराची छावणी चिपळूण येथे पडलेली असताना आपल्या अधिकाऱ्यांनी कशी काळजी घ्यावी, याबाबत लिहिलेल्या पत्रातील काही भाग
 ""पागेस अधिक बैठी पडली; परंतु जरूर जालें त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास, तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंढी करून चाराल.
नाहीसें जालें म्हणजे मग काही पडल्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व विलायतीस तसवीस देऊ लागाल. ऐशास, लोक जातील कोण्ही कुणब्याचे थील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोण्ही भाजी, कोण्ही पाले. ऐसे करू लागलेत म्हणजे जी कुणबी घर धरून जीवमात्र घेऊन राहिले आहेत, तेहि जाऊ लागतील. कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल, की मोगल मुलकांत आले त्याहुनहि अधिक तुम्ही! ऐसा तळतळाट होईल! रयतेस काडीचा अजार द्यावया गरज नाही. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हासी कलागती करावयाची गरज नाही. हाली उनाळ्याला आहे . कोण्ही आगट्या करितील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील. आगट्या जाळीता, अगर रात्रीस दिवा घरांत असेल, अविस्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. '' 
शिवरायांचे हे पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. लष्करातील लोकांनी काटकसरीने वागावे. स्थानिक रयतेला त्रास देऊ नये.
शेतकऱ्यांच्या काडीलादेखील हात लावू नये; अन्यथा रयत म्हणेल की मोगलापेक्षा तुम्ही वाईट आहात. आगीपासून धोका होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना शिवरायांनी आपल्या सैनिकांना दिलेल्या आहेत. यातून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
शिवरायांनी शेतकरी कष्टकरी, श्रमकरी वर्गाचे हित जोपासले. आपल्या सैनिकांवर सहकाऱ्यांवर जिवापाड प्रेम केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१९ मे १६७४*
छत्रपती शिवाजी महाराज रायगडहून प्रतापगडास १६ मे आले. प्रतापगड येथे ते ३ दिवस राहिले आणि त्या दरम्यान त्यांनी तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस सव्वा मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले आणि मातेसमोर मंगलकलश प्रस्थापित करून राजाभिषेकाआधी देवीचा आशीर्वाद घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१९ मे १८२४*
धोंडोपंत बाजीराव पेशवे ऊर्फ क्रांतिकारी नानासाहेब पेशवे
यांचा जन्म बिठूर येथे झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩 🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४