जागतिक दर्जाची कोकणातील कातळ शिल्प

रिफायनरी म्हजे काय?
 म्हणजे काय  याचा अर्थ खनिज तेल शुद्धीकरण असं होतो. रिफायनरी  प्रकल्पाद्वारे हे बाहेरच्या देशातील खनिज तेल आपल्या देशात आणली जातात आणि  कच्च्या खनिज तेलाचे शुद्धीकरण करून व प्रक्रिया करून  ते पण पेट्रोल डिझेल इत्यादी असे केमिकल बाहेर पडतात. 


या रिफायनरी प्रकल्पामध्ये कोकणातील अनेक कथा शिल्पे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याचं कारण म्हणजे? फायनली साठी गेलेल्या जमिनीमध्ये कथा शिल्प मोठ्या प्रमाणात आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव साहेबानी प्रकल्प मध्ये गेलेल्या  कापड शिल्पाची पाहणी केली त्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरली. परंतु कातळ शिल्पे  ते आपण पाहूया.

 कातळ शिल्प म्हणजे काय?

 प्राचीन ऐतिहासिक हजारो काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळ शिल्पाकडे आपण पाहतो. ती मानवाने विविध दगडे शोधून  ही विशिष्ट प्रकारच्या दगडावरतीच सांस्कृतिक संदर्भ करून ठेवलेले आहेत.

 अशा प्रकारच्या कातळ शिल्पांचा अभ्यास करत असताना ती विशिष्ट प्रकारच्या दगडामध्ये कोरलेली विविध चित्रे काय व्यक्त होतात. व पुढील पिढ्यांसाठी काय संदेश दिला जातोय. हे निश्चित सांगणं त त्यामध्ये अभ्यास केलेल्या संशोधकांना माहिती असावी.

 विविध प्रकारचे प्राणी पक्षी अथवा अगम्य असे खोद चित्रे गूध रहस्य आहेत.

जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art)किंवा पेट्रोग्लिफ्स(petroglyphs)या नावाने ओळखले जाते.

 विविध लेण्यांमध्ये दगडामध्ये कोरलेली भिंतीवरील कोरीव काम सर्वत्र पाहायला मिळत असलं तरी. संपूर्णपणे उघड्यावर आणि कातळावर कोरलेली ही चित्रे विशिष्ट करून महाराष्ट्र मध्ये कोकणपट्ट्यामध्ये जास्त पाहायला मिळतात.


 कोकणपट्ट्यामध्ये येणारी विविध गाव रत्नागिरी लाजा राजापूर तसेच देवगड सिंधुदुर्ग तालुक्यातील 50 गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.
 रत्नागिरी जिल्ह्यामधील  विशेष करून जयगड, चवे,रामरोड, मासेबाव,करबुडे, निवळी, गोपाळ, निवळी गावंडे वाडी, कापडगाव, उमरे कुरतडे, कोळंबे,गणेशगुळे,मेर्वी,गावखडी, डोर्ले इ.
  राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे, गोठणे, बरसु, पन्हाळे, शेंडे,कोतापुर, देवी हसोळ इत्यादी गावामध्ये कातळ शिल्प पाहायला मिळतात.
 लांजा तालुका :-
 भडे, हरचे, रुण, खाणावली, रावरी, लावगड इत्यादी  देवगड आणि सिंधुदुर्ग येथील शोध मोहीम अजून चालूच आहे.
 आता देवगड तालुक्यामध्ये पाहू 
वाघोटन, बापर्डे गावात मोठ्या प्रमाणात आहेत .

 काताळ शिल्पाचे  भौगोलिक संशोधन 
 कोकणामध्ये  प्रामुख्याने कातळ सड्यावर हे काम सुरू आहे. रत्नागिरी राजापूर लांजा येथील समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व दिशेला 25 किलोमीटर पर्यंत आणि दक्षिणेला सुमारे दीडशे किलोमीटरच्या अंतरावर 37 चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील काताळ खोदशिल्पाचे संशोधन कार्य चालू आहे  

 काताळ शिल्प किती जुनी आहेत?

 संशोधकांच्या म्हणण्यानुसार कातळ शिल्पांचे वयोमान सुमारे  मध्य अश्मयुगीन असावे. म्हणजेच इसवी सन पूर्व  10000 वर्ष असावा असे संशोधक मत नोंदवत असतात.

 कोकणातील कातळ शिल्प विषयी वैशिष्ट्य काय आहेत पाहू

1) कोकणातील कातळ शिल्प साधारणपणे जमिनीवरती खडकामध्ये आडव्या पद्धतीमध्ये  कोरलेली आहेत.

3) दगडांमध्ये विविध प्रकारचे प्राणी कोरले असले तरी या प्राण्यांचे आकार आत्ताच्या प्राण्यांच्या मिळते जुळते आढळतात.
3) परंतु पक्षाच्या कोरलेल्या आकृत्या ह्या प्रत्यक्ष पक्ष पेक्षा मोठ्या आढळून येतात.

4) कोकणातील कातळ शिल्प हे अन्य भारतामधील कातळ शिल्पा पेक्षा आकाराने मोठी आढळतात. प्राणी, पक्षी, विविध सांस्कृतिक खुणा  इत्यादी.
5) काही अशुभ प्राणी आहेत त्याच्या अस्तित्वाच्या खुणाव कोकणामध्ये उपस्थित नाहीत व आढळत नाहीत. परंतु कोकणामध्ये अशा स्वरूपाच्या प्राणी कातळ शिल्पा मध्ये कोरले आहेत चा अर्थ  काय आहे.
उदा :- उदाहरणार्थ एक शिंगी गेंडा, पाणघोडा .
6) कोकणातील चित्रशैली  कातळा मध्ये असणारी. याची तुलना आपण ऑस्ट्रेलियातील कातळ शिल्पा शी करू शकतो एक सारखी दिसायला आहेत.

एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत.

दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे व मासा, कासव, असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात.देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे.

प्राणी- चिह्न स्वरूपात प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते.
पक्षी- शिल्परचनेत पक्षी असण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मूळ पक्ष्यांच्या आकारात आणि शिल्पातील पक्ष्यांच्या आकारात फरक दिसून येतो.
जलचर आणि उभयचर प्राणी- प्रतिमा व मूळ आकार यांच्यात या शिल्पाकृतीत सारखेपणा दिसून येतो. समुद्री कासव, मगर, विविध प्रकारचे मासे यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात.
मनुष्याकृती- या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या नसल्या तरी हे चित्रण सादृश्य (?) आहे असे दिसून येते. या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुणा आढळत नाहीत.
गोपद्म/भौमितिक रचना- यांच्या आकारात विविधता असून या चिह्नांकित रेखाकृती या स्वरूपात कोरलेल्या दिसतात.
मातृदेवता- गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेली अशा प्रकारची शिल्पे काही चित्रे आहेत. या रचना पाहता त्या मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत

एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत.

दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे वमासा, कासव असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात.देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे.

  • प्राणी- चिह्न स्वरूपात प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते.
  • पक्षी- शिल्परचनेत पक्षी असण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मूळ पक्ष्यांच्या आकारात आणि शिल्पातील पक्ष्यांच्या आकारात फरक दिसून येतो.
  • जलचर आणि उभयचर प्राणी- प्रतिमा व मूळ आकार यांच्यात या शिल्पाकृतीत सारखेपणा दिसून येतो. समुद्री कासव, मगर, विविध प्रकारचे मासे यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात.
  • मनुष्याकृती- या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या नसल्या तरी हे चित्रण सादृश्य (?) आहे असे दिसून येते. या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुणा आढळत नाहीत.
  • गोपद्म/भौमितिक रचना- यांच्या आकारात विविधता असून या चिह्नांकित रेखाकृती या स्वरूपात कोरलेल्या दिसतात.
  • मातृदेवता- गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेली अशा प्रकारची शिल्पे काही चित्रे आहेत. या रचना पाहता त्या मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत.

या शिल्पाकृती समाजाला माहिती व्हाव्यात पण त्याच जोडीने त्यांचे रक्षणही व्हावे यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये यांच्या सहली किंवा विविध दूरचित्रवणी माध्यमातून या ऐतिहासिक वारशाची माहिती पोचविले जात आहे. यासाठी पुरातत्त्व खात्यालाही सहकार्य करण्यात येते आहे.

जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. जगात ‘रॉक आर्ट’ म्हणून ती ओळखली जातात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हा ‘रॉक आर्ट’चाच प्रकार आहे.


संशोधनाचे महत्त्व

कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या १७व्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी कुडोपी येथील कातळशिल्पांबाबतचा शोधनिबंध सादर केला. त्यात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली. कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्माण झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही. . तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेतूने निर्माण झाली आणि कोणी केली , याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. त्यातून कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारख्या पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी या भागातील आदिम मानवी समूहाची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यासाठी या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षण होणे, हाती येणाऱ्या माहितीचा सयुक्तिक अर्थ लावणे, या कातळशिल्पांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.[६] कातळशिल्पांचा अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणे पुरेसे नसते.त्या संशोधनासाठी पूरक म्हणून भौगोलिक बदल,पर्यावरणीय बदल,जैवविविधता यांचाही अभ्यास करणे आवश्यक असते.

लेखन &संकलन :-नितिन घाडगे.
सदर्भ 
रिसबुड, ठाकुरदेसाई, मराठे, अशमयुगीन मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणांचा शोध, कातळ-खोद-शिल्प (हा संदर्भ मुक्त असून कुणालाही पाहण्यास उपलब्ध आहे. अभ्यासकाचा इ पत्ता- surendratd@gmail.com / bhairisbud@gmail.com/ manojmarathe4@gmail.com)






 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४