मोकदम जगतापमौजे पणदरे
मोकदम जगताप
मौजे पणदरे
कागदी पाटील अन मुलकी पाटील हा फरक असतोच की लखोबा..
गावाचे नाव :पणदरे ता.बारामती, जि. पुणे.
शिलालेखाचे वाचन :
१ श्री सोमेश्वर चरणी महा
२ दजी त्याचा पुत्र गीरजोजी त्या
३ चा पुत्र जानराव पाटील ज
४ गथाप मौजे पणदरे प्रा
५ सुपे शके १६९६ जयनाम
६ सवंत्सरे चैत्र शुध पाडवा
७ जानरावाचा घुमठ आसे
अर्थ :- शालिवाहन शकाच्या १६९६ व्या वर्षी जय नाम संवत्सरातील चैत्र शुद्ध पाड्वा ( प्रतिपदा ) गुढीपाडवा म्हणजेच रविवार १३ मार्च १७७४ या दिवशी श्री सोमेश्वर महादेव चरणी तत्पर असलेल्या सुपे परगण्यातील मौजे पणदरे येथील गावाचे पाटील महादजीचा त्याचा पुत्र गिरजोजी पाटील त्याचा पुत्र जानराव पाटील जगताप यांचा गुमठ बांधला . जानराव पाटील यांचा हा गुमठ (समाधी) आहे.पण हा समाधी गुमठ नक्की कोणी बांधला याची माहिती शिलालेखात नाही दिली
शिलालेख वाचन :- श्री Anil Dudhane सर.
Comments
Post a Comment