महाराजांनी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले. त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले

ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर म्हणून कल्याणची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात. कल्याणमध्ये शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ल्याची बांधणी केली होती. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम उभा आहे.

सातवाहन काळापासून महत्तावाचं बंदर अशी कल्याणची ओळख आहे. आदिशहाकडं 1657 पर्यंत कल्याणचा ताबा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी या शहराचं महत्त्व ओळखले होते. त्यामुळे त्यांनी आदिलशाहाचा पराभव करत कल्याणचा स्वराज्याचा समावेश केला. महाराजांनीच कल्याणच्या खाडीकिनारी किल्ला बांधण्याचं ठरवलं. या किल्ल्याचे बांधकाम करताना तिथं मोठी संपत्ती सापडली. दुर्गा देवीच्या आशिर्वादानाचं ही संपत्ती सापडली असं समजून महाराजांनी किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर बांधले. त्यामुळेच या किल्ल्याला दुर्गाडी हे नाव पडले.

किल्ल्यावर दुर्गा देवीचे मंदिर आणि तटबंदी आहे. किल्ल्यावरील बरेच अवशेष काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. पण, काही आजही शाबूत असून त्यामधून यापूर्वीच्या काळातील भव्यता लक्षात येते.

मुख्य गडावर जाण्यासाठी असलेलं प्रवेश्वद्वार नष्ट झालं असलं तरी बुरूज शाबूत आहे. प्रवेशद्वारासमोरच गणेशाची मूर्ती आहे. या प्रवेशद्वाराला गणेश दरवाजा असे नाव होते. किल्ल्यावरील दुर्गा देवीच्या मंदिरात नव्याने प्रतिस्थापना केलेली देवीची मूर्ती असून, पुरातन मूर्तीही मंदिरात ठेवण्यात आलेली आहे. मंदिराची बांधणी आज मजबूत


सदर्भ :-
नूज लोकमत 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...