तोफखाना - मालिक-ए-मैदान तोफ वजन 55 टन, लांबी 14.6 फुट आणि डायमिटर 4.9 फुटांचा ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकत लागत होती (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा).
तोफखाना - मालिक-ए-मैदान तोफ वजन 55 टन, लांबी 14.6 फुट आणि डायमिटर 4.9 फुटांचा ओढण्यासाठी 10 हत्ती, 400 बैल आणि शेकडो माणसांची ताकत लागत होती (फारसी शब्द-अर्थ:मैदानाचा राजा). आज जरी ती तोफ आदिलशाहीची म्हणून ओळखली जात असली तरी या तोफेचा जन्म मूळ निजामशाहीमध्ये झाला. १५४९ साली बुर्हान निजामशह याचा तोफखान्यावरील तुर्की अधिकारी चलबी रुमीखान दखनीयाने ही तोफ अहमदनगर येथे बनवली. रुमीखान हा मूळचा तुर्कस्तानचा.मलिक-ए-मैदान तोफेच्या निर्मिती च्या वेळी म्हणजेच सोळाव्या शतकात ती जगातील सगळ्यात मोठे शस्त्र होती.
तोफेचा धमाका एवढा मोठा होता की बत्ती देणारा सैनिक मरण्याची शक्यता असल्याने शेजारीच एक पाण्याचा हौद बांधलेला आहे, जेणेकरून बत्ती दिली रे दिली की हौदात उडी मारुन पाण्यात बुडी मारुन बसायचे! विजय नगरजवळील रक्कस-तंगडि येथे झालेल्या युद्धात या तोफेचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता. या तोफचा आवाज एवढा होता, की विजय नगरच्या राज्याचे सैन्य आवाज ऐकुणच पळून गेले होते.युद्ध संपल्यानंतर या तोफेला तेथून . दुर असलेल्या पंराडा च्या किल्यात ठेवण्यात आले होते. किल्यातुन इ.स. 1632 मध्ये एका मराठा सरदाराने या तोफेला कर्णाटकातील विजापुर येथे स्थापित केले होते..
.
Comments
Post a Comment