स्वाभिमान म्हणजे काय??

स्वाभिमान' हा एकमेव शब्द असा आहे की जो तुमचे आयुष्य बदलवूही शकतो आणि बिघडवूही शकतो. या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो?

'स्वाभिमान' हा एकमेव शब्द असा आहे की जो तुमचे आयुष्य बदलवूही शकतो आणि बिघडवूही शकतो. या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो?
स्वाभिमान हा एक सकारात्मक गुण आहे. ही तर व्यक्ती जिवंत असल्याचा सबळ पुरावा आहे. स्वाभिमानी व्यक्ती हात पसरणार नाही. स्वतःच आयुष्य स्वतः घडेल. त्याचबरोबर इतर स्वाभिमानी लोकांचीही कदर करेल. अशी व्यक्ती फुकटच्या गोष्टी लागायचा प्रयत्न करत नाही, कुठलही गैर कृत्य करत नाही. कारण त्यांना आपण कोण आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपली मुल्यव्यवस्था काय आहे याची यथार्थ जाणिव असते. ते स्वतः च आयुष्य तर घडवतात पण इतरांना सुद्धा घडवतात वर आणतात, वर काढतात.तुही थोर स्त्री पुरूष जसे शिवाजी महाराज ज्योतिबा फुले, एकनाथ महाराज, व इतर अनेक लोक आहेत ते स्वाभिमानाची ज्वलंत उदाहरण आहेत.

मग आयष्य बिघडतं कसं? स्वाभिमान म्हणजे स्वत चा यथार्थ जाणिव. स्वतःच्या गुणदोषाची यथार्थ कल्पना असणे. यामध्ये आत्मभान, आत्मज्ञान व त्या अनुषंगाने येणारी अतीव नम्रता असते. इथे विकारांना वाव नाही. पण इथे जर अहंकार चा शिरकाव झाला की स्वाभिमान दुराभिमान बनतो. स्वतःचा मर्यादा काय आहेत याची कणभरही कल्पना नसली तर त्याला फाजील आत्मविश्वास म्हणतात. मग इथे दुराग्रह, अंधप्रेम(स्वजन,आप्तमित्र, ) अवाजवी अपेक्षा, हाव, ईर्षा, नार्सिस्टिक प्रेम अशी मंडळी येउन मिळाली तर सगळ्यांचा उद्धार च.

तर स्वाभिमान चा व्याख्या अशी स्वतःला आपण जसे आहोत तसे नम्रपणे स्विकारणे आणि आपल्या वास्तविक स्वप्रतिमेला कोणत्याही परिस्थितीत भंगु न देता तिला उदादत्ता प्राप्त करत स्वमुक्तीच्या मार्गावर नेण्याचा निरंतर प्रयत्न करणे.


एखादी व्यक्ती जर तुम्हाला मुद्दाम दुर्लक्षित करीत असेल तर
1)फार मागे लागू नका..
2)विषय सोडून द्या..तुम्हीही त्या व्यक्तीचा नाद सोडून तिलादुर्लक्षित करणं सुरू करा
3)आपल्या प्रगतीवर व आपल्या मेहनती वेर फोकस करा. आणि त्याच्या पेक्षा पुढ जा…
4)स्वतःहुन त्याना बोलण टाळा.सर्व व्यवहार तोडून टाका…
5)त्याच्या पेक्षा जास्त आनंदी राहा…
6)जे तुम्हाला रिस्पेक्ट करतात फक्त त्याचीच रिस्पेक्ट करा..
7)स्वाभिमान जपा..
8)जे काही करताय ते स्वतःच्या हिमतीवर मेहनतीवर करा.. दुर्लक्ष करणाऱ्यांना पूर्णांता दुर्लक्ष करा

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४