शहिद पैलवान अशोक मारूतीराव कामटे साहेब (भारतीय पोलीस सेवा) यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन"🙏🏻

अशोक कामटे
फेब्रुवारी २३, इ.स. १९६५ - नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई हे मुंबईचे अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर होते.

 त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी, १९६५ रोजी झाला.त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज येथे झाले.

पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सन मधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले.

त्यांनी १९८५मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली .त्यांनी त्यांचे पद्विउत्तर शिक्षण सेंट स्तीफंस महाविद्यालयातून १९८७ साली पूर्ण केले.

त्यांनी भारताचे पेरू मध्ये झालेल्या junior power lifting championship मध्ये प्रतिनिधित्व केले.

 अशोक कामते यांना पत्नी विनिता पासून दोन मुले राहुल व अर्जुन झाली. त्यांचे वडील एम.आर. कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते.

#शहिद_पैलवान_अशोक_कामटे (पोलीस कमिशनर) 
२६- ११ चे हिरो, मुंबईच्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलिस कमिशनर #पैलवान अशोक कामटे यांची आज जयंती. 
सर्व जगाला माहिती आहे अशोक सर एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी होते ,
#सातारा_येथेही_ते_जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होते. 
#पण_बऱ्याच_जणांना_माहित_नाही ते एक नावाजलेले ''#पैलवान'' होते.
त्यांचे मुळ गाव पुण्याजवळचे चांबळी,तालुका पुरंदर.त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५.
ज्या पुरंदर ने शिवरायांना हजार हातांचे बळ देवून स्वराज्य वाचवले ,मुरारपंतासारखा एक वाघ दिला ,त्याच खोर्यात याही वाघाचा जन्म झाला.शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील गाव न गाव त्यावेळी पैलवान होते ,त्यातलेच हे गाव चांबळी.गावाला कुस्तीची परंपरा हि वारसा हक्कातच मिळाली होती.
त्यांचे वडील भारतीय सैन्यात कुस्तीगीर होते,त्यांची नेमणूकच कुस्ती या खेळातून होती.जेव्हा ते सैन्यदलातून निवृत्त झाले तेव्हा ते कर्नल होते..कर्नल एम.आर.कामटे.
तर अश्या कुस्तीच्या समृध्द परंपरेत जन्मलेले अशोक कामटे लहान पनापासूनच तालमीत कुस्तीचे धडे गिरवत मोठे झाले,तरुण वयातच त्यांनी बर्याच नामांकित मल्लांना चित केले होते.
ज्या तांबड्या मातीत ते लहानाचे मोठे झाले ,ज्या पुरांदाराकडे पाहत लहानपण संपून तारुण्य आले हे सर्व त्यांना सांगत होते..कि आपल्याला काहीतर विलक्षण मोठे करून दाखवायचे आहे.
याच एका जिद्दीने त्यांनी १९८९ सालच्या भारतीय पोलिस दल (IPS) वर्गामध्ये अधिकारी पद प्राप्त केले.
त्यानंतरचा त्यांचा प्रवास म्हणजे एका चित्रपटातील नायकाप्रमाणे आहे..
त्यांची कारकीर्द पुढील प्रमाण...
1989: भारतीय पोलिस अधिकारी 
1991: भंडारा जिल्ह्याचे सहायक पोलिस अधिक्षक 
1994: सातारा चे पोलिस अधीक्षक 
1997–1999: ठाणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक 
1999–2000: यु.एन.मिशन बोस्निया.
2000–2002: डेपुटी कमिशनर पोलिस मुंबई 
2002–2004: सांगली चे जिल्हा पोलिस प्रमुख 
2004–2005: कोल्हापूर चे जिल्हा पोलिस प्रमुख 
2006–2008: पोलिस कमिश्नर सोलापूर 
June 2008 – November 2008: अतिरिक्त कमिश्नर ऑफ पोलिस मुंबई
1995: विशेष सेवा पदक -नक्ष्लिते विभाग 
1999: यु.एन.पदक 
1999: वेदेष सेवा पदक यु.एन.विभाग 
2004: Awarded Director General's insignia
2005: आंतरिक सुरक्षा पदक 
2006: Police medal
इ पदे आणि विजय चाशाके मिळवलेले हे गृहस्थ अक्षरश एक कुस्तीगीर होते याचा विसर आज महाराष्ट्राला पडला आहे.
अहो हि तांबडी माती फार विलक्षण असते..हिला अन्यायाची प्रचंड चीड येते..आणि यातूनच एक विलक्षण इतिहास घडतो...त्यातील एक सुवर्ण इतिहास म्हणजे ...स्व.पैलवान.अशोक कामटे.
ज्या अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घातल्या मी सांगतो नक्कीच ते सुध्दा क्षणभर स्तब्ध झाले असतील अशी शरीर यष्टी होती त्यांची.
त्यांच्या पोलिसी कारकिर्दीत कित्येक भार्ष्ट राज्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भांडायला सुध्दा ते मागे हटले नाहीत...याची माहिती प्रत्येक जिल्ह्यातील लोकांना असेलच...त्यातल्या त्यात सोलापुराकाराना .
कित्येक माजलेल्या गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या राजकर्त्यांचा विरोध डावलून त्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
२००८ च्या हाल्ल्यात भलेही पोलिस दलाने एक कुशल अधिकारी गमावळ असेल ..पण आम्हा पैलवानांनी आमच्या स्फूर्तीचा एक जिवंत झरा गमावला आहे...,
माझे सर्व पैलवानांना आवाहन आहे ..अशोक सरांचे स्वप्न पूर्ण करा.पोलिस हवालदार या पदाची भारती होण्यापेक्षा अधिकारी व्हा.आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करा.स्वताला कमी समजू नका..!!
धन्यवाद..!!




🙏🏻"शहिद पैलवान अशोक मारूतीराव कामटे साहेब (भारतीय पोलीस सेवा) यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन"🙏🏻
सदर्भ :-
(कुस्ती-मल्लविद्या फेस बुक ब्लॉग मधून )

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४