हिंजवडी IT हब लगत असलेल्या मारुंजी गावाच्या डोगरावर सापडलाय आशिया खंडातील सर्वात मोठा पट खेळ, वाघ बकरी पट व याचं पट खेळाच्या जातींचे 41प्रकारच्या हजारो वर्षे इतिहासिक खेळाचे पट..चला तर पाहू...
पटावरील खेळ : आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ.
प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत. प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असे खेळ असतात.
ऐतिहासिक, पौराणिक काळात राजे,महाराजे, व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिक खेळत असलेले खेळ आजही अस्तित्वात आहे.
याचं मारुजी च्या डोगरावर वाघजाई देवीच सुद्धा प्राचीन मंदिर आहे.
वाघ बकरी पट खेळ हा त्याच मंदिर परिसरात सापडला असून याचे व वाघजाई देवीचे मंदिर याचा संबंध जोडण्याचा संशोधक प्रयत्न करत आहेत.
या डोंगरांच्या मधून जाणारा रस्ता लागत हे पट खेळ असून याचा उपयोग मनोरंजन, बुद्धी वाढवणे, आणि रस्त्यावर मुक्कामाल थांबल्यावर येते वेळ घालवता यावा या साठी. किंवा 41 खेळांमध्ये खेळाची शिल्प असे आहेत.
की पूर्वी असे खेळावर जमीन धन दौलत लावली जायची. खेळ जिंकल्यानंतर एवढी जमीन धन जिकणाऱ्या लोकांना दिलं जायचं..
आख महाभारत या खेळामुळे घडलं आहे. याला इतिहास साक्षी आहे.पाषाणा मध्ये हे खेळ कोरले आहेत. चला हजार वर्षांपूर्वीचा इतिहास साक्षी आहे. यांसारख्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे कातळशिल्प प्रकारांमध्ये हे खेळाचे पट कोरलेले आहेत.
कोणतेही खेळ हे केवळ शारीरिक संवर्धनासाठीच खेळले जात नाही तर मनाच्या पोषणासाठी, करमणूक, व्यापार, व्यवहारातील बोलणी करण्यासाठी आणि युध्दातील तहामध्येही खेळत असल्याचे आपल्याला माहित आहे.
ज्याप्रमाणे महाभारतात जे द्युत युध्द खेळले गेले, त्या पच्चिसी खेळाचा पट नाशिकच्या पांडवलेणी अर्थात त्रिरश्मी लेण्यांमधील गुहांमध्ये कोरल्याचा शोध सोज्वल साळीने लावला आहे.
यातील अनेक खेळ आजही महाराष्ट्राच्या घराघरात, दक्षिण भारत तसेच विदेशात खेळले जात असल्याचे त्याने सांगितले. पौराणिक आणि बौध्द ग्रथांमध्येही या पटखेळांचा उल्लेख आढळतो.पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात हे खेळ आढळल्यानंतर राज्यासह देशभरातील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे.
वैशिष्ट
1)समुद्रसपाटीपासून पावणे सातशे मिटर उंची वर हा पट खेळ सापडला आहे...
2) कातळशिल्प मध्ये कोरीव काम करून खेळाचे एक्केचाळीस प्रकार त्या ठिकाणी दगडामध्ये कोरलेली पहायला मिळतील.
3) आशिया खंडातील सर्वात मोठी कातळ शिल्प पट खेळ सापडले आहेत.
👉खेळ शोधून सर्वाँसमोर आणणारे दुर्ग प्रेमी गिर्यारोहक असे कोण आहेत..
नाशिकच्या प्राचीन लिपी अभ्यासक सोज्वल साळी, याने लावला आहे. हिंजवडी परिसरातील मारुंजी (ता. मुळशी) येथील डोंगरावर सोज्वळ साळी, नासिक व ऋषी राणे, मुंबई यांनी तब्बल ४१ खेळांचे पट शोधून त्याचे डॉक्युमेंटेशन केले. (Pune District Historical Places)या अगोदर २०१९ साली आग्रावीर मारुती गोळे यांनी सर्वप्रथम हे कोरीव शिल्प,खेळ डोंगरावर शोधले होते.
त्यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यावर साळी यांनी गोळे यांना संपर्क साधला होता. याबाबत गोळे म्हणाले की, हे खेळ वैभवशाली प्राचीन लिपी ट्रस्ट, नासिक यामार्फत शोध मोहीम चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
जमिनीवर हे खेळ कोरल्याचे अवशेष अजुनही शिल्लक असल्याचे बघायला मिळते.
या ठिकाणा ला कसे भेट देऊ शकता?
पुणे म्हटलं की हिंजवडी आयटी हब कुठे आहे सांगायची काही गरज नाही. याच आयटी हब च्या शेजारी मारुंजी गावालगत जो डोंगर आहे त्या डोंगरावरती कातळशिल्प आपल्याला पाहायला मिळतील.
फोटो व संशोधन माहिती साभार मारुती आबा गोळे
लेखन माहिती संकलन
नितीन घाडगे
Comments
Post a Comment