नितीमत्ता

नितीमत्ता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे.? नीतिमत्ता म्हणजे नैतिकता - चांगलं वाईट समजून त्याप्रमाणे वर्तन करणे, सचोटी आणि सारासार विवेक बुध्दी ई. ही महत्त्वाची मानवी मूल्यं आहेत.


नीती आपल्याला समाजात कसे वागावे ते सांगते. नीतीचे नियम ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ या विषयी असतात. असे नियम जो पाळतो तो/ती नीतीमान: अशा व्यक्तीची नीतिमत्ता चांगली आहे असे म्हटले जाते. समाजात सर्वांनी नीतीने वागावे अशी अपेक्षा असते. परंतु काय करावे वा करू नये हे ठरवायचे कसें ‘चांगले वागावे, वाईट वागू नये’ हे खरे, पण ‘चांगले’ काय हे नक्की कसे ठरवायचे? एखाद्याला जे चांगले वाटेल ते दुसऱ्याला तसे वाटेलच असे नाही.

नितीमत्तेची तीन अंगे आहेत. ज्याला आपण सर्वमान्य असा ‘सदाचार’ (morals) म्हणतो हे एक अंग; दुसरे अंग आहे ‘सदवृत्त’ (ethics) आणि तिसरे आहे कायदा (laws).

या विचारांवर आपला आचार जो ठेवतो तो आधी निर्भय होतो, !!

हा प्रत्येकां स्वत: चा अनुभव प्रत्येकास येत असतोच !! कर नाही तर डर कसली हे शब्दश: अनुभवता येताना दीसतात !!


कोणीतरी आपल्याला बघत आहे किंवा नजर ठेवून आहे किंवा आपण अनोळखी माणसासोबत आहोत किंवा मग चार चौघात असतो तेव्हा आपण चांगलेच वागतो .

पण आपण जेव्हा एकांतात असतो , एकटेच असतो - कोणी बोलणारा नाही , बघणारा नाही - अश्या वेळी आपण जसे वागतो ते आपले "नीतिमूल्यं" असतात.. हे सत्य आहे.




Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४