वेडात वीर मराठे दौडले सात

वेडात वीर मराठे दौडले सात 🚩⚔️

वेडात मराठे वीर दौडले सात... हे लता मंगेशकरांनी गायलेलं गीत ऐकलं की, प्रत्येकात स्फुरण येतं अन् मराठ्यांचा ज्वलंत इतिहास डोळयासमोर उभा राहतो.

 सेनापती प्रतापराव गुजर आणि सहा सरदारांनी शौर्य गाजवलेला तो दिवस होता ०३ मार्च १६७४.

अंगावर शहारे आणणारे हा इतिहास याच दिवशी स्फूर्ती गीतातून कविवर्य कुसुमाग्रजांनी जिवंत केला.पूर्वीच्या अभ्यास क्रमात सुद्धा त्याची ही कविता छापली होती.



साल्हेर ची लढाई असो , सुरत ची लढाई , शिवाजी महाराज आग्रा मध्ये अडकले असताना स्वराज्याचे रक्षण प्रतापराव यांनी केले. संभाजी महाराजांना मुज्जम कडे औरंगाबाद ला पंच हजारी म्हणून ठेवले त्यावेळी त्यांची रक्षणाची जबाबदारी प्रतापराव कडेच होती. पुरंदर तह मध्ये अनेक किल्ले परत मिळवून देण्याची जबाबदारी प्रतापराव यांनीच पार पाडली.अश्या अनेक महत्वाच्या प्रसंगी प्रतापराव स्वराज्याचे उपयोगी पडले होते.

आदिलशाहीने मराठ्यांना रोखण्यासाठी बहलोल खान ,सर्जा खान ,सिद्दी मसूद ,खिदीर खान दिलेर खान संगनमत करून हिंदवी स्वराज्यावर चढाई करण्याचे मनुसूबा रचला होता , पण शिवाजी महाराजांना गुप्तहेर द्वारे आधीच कळला . म्हणून त्यांनी प्रतापराव आणि आनंदराव याना एकत्र येऊन स्वराज्याच्या द्वाराजवळ म्हणजे जत मध्ये बहलोल खानाला मारावा असा आदेश दिला .या दरम्यान महाराज पन्हाळ्याला असावेत असा निष्कर्ष आहे.

खानाचा मुक्काम उमराणी तालुका जत जिल्हा सांगली (विजापूर जवळ नजीक)असताना गाठ पडली . पण प्रतापरावानी त्याचा पराभव शिपाईगिरीचा स्वभाव असलेल्या प्रतापरावानी त्यास जिवंत सोडून दिला. ,शिवाजी महाराजांनी त्यावर प्रतापरावास खडसावले आणि लिहिले "सला काय निमित्त केला "आणि बहलोल खानास मारून शिवाय तोंड दाखवू नका असे पत्र धाडले.


बहलोल खानने उपकार विसरून पुन्हा बेळगाव मार्गे हल्ला योजला. नेसरी नावाचे गडहिंग्लज शेजारी गाव आहे.तिथेच जवळ असलेल्या डोंगर मुळे गनिमी कवचे उत्तम ठिकाण आहे.

प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दिपोजी राउतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्दी हिलाल व विठोजी होय.या सात वीरांनी सुमारे बारा हजारच्या बेलोलखानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला.
वरील सात नावे आहेत या मध्ये मत मत्तातरे असू शकतात.

ही लढाई कोल्हापूरजवळच्या नेसरी येथे झाली. शिवाजी महाराज चे पात्र मुळे प्रतापराव दुःखी झाले होते त्यानी चिडून आणि त्यांनी हा निर्णय घेतला.


मराठा साम्राज्य मधली दुरवस्था म्हणाजे उपलब्ध असलेले पत्र हे खुप कमी आणि तारीख नसल्यामुळे गोंधळ वाढतो.पण या प्रसंगाला काही पत्र उपलब्ध आहे,पण शिवाजी महाराजांनी लिहलेले मूळ पत्र (प्रतापराव नावाचे) उपलब्ध नाही.

१. प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या नेसरी युद्धाचे वर्णन नारायण शेणवी हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.

The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat).

म्हणजे प्रतापराव गुर्जर आणि सहा घोडेस्वारांची मृत्यू शंका नसावी .

२) यात विठोजी शिंदे चे नाव चुकीचे आहे . कारण त्यानंतर म्हणजे उमराणी युद्धात महत्वाची भूमिका बजावलेले विठोजी शिंदे हे नेसरी युद्ध च्या आधीच सर्जा खान युद्धात मारले गेले होते . नागज घाट , घटनांद्रे तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथे मृत्यू झाला.त्यानंतर त्याच्या पत्नी सती गेल्या. आज सुद्ध यांचा समाधी बांधण्याचा वाद सांगली जिल्ह्यात चालू आहे. मग यांचे नाव त्या सात विरा मध्ये कसे ? कदाचित नंतर नजर चुकीने बखर मध्ये हे नाव सामील झले असले पाहिजे कारण त्याचा मृत्यू आदिलशाहीचा लढत असताना झाला होतं. सिद्दी हिलाल चे नाव असले तरी समकालीन पुरावा नाही. सिद्दी हिलाल खेलिजी भोसले यांचा क्रीत पुत्र. कधी अडी

३)सभासद बखर सांगते की

त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदेश होता की " विजापुरचा बेलोलखान येवढा वळवळ बहूत करीत आहे. त्यास मारुन फते करणे." त्यानुसार प्रतापरावांनी उमरणी (जत तालुका जिल्हा सांगली, विजापूर जवळ) येथे विजय मिळवला.

प्रतापराव गुजरांनी बहलोल खानास माफ केले हे शिवाजी महाराजांस आवडले नाही. उमराणीच्या लढाईत प्रतापरावांनी केलेल्या उपकारांची जाण न ठेवता, बहलोलखान पन्हाळा किल्ल्यावर चाल करुन आला. महाराज प्रतापरावांवर नाराज झाले. त्यासाठी महाराजांनी प्रतापरावांस सांगितले , "बहलोल खान येतो यासी गाठ घालून बुडवून फते करणे नाहीतर तोंड न दाखविणे." अशा कठोर शब्दात महाराजांनी प्रतापरावांस सुनावले.

राजियास कळले की, बेहेलोल खान मागती आला आहे. मग राजे म्हणू लागले कीं," हा घडोघडी येत." या करिता मागती प्रतापराव यास पाठविले की, " तुम्ही लश्कर घेऊन जाऊन बेलोलखान येतो. यांसी गाठी घालून, बुडवून फते करणे. नाहीतर तोंड न दाखविणे." ऐसे प्रतापराव यास निक्षुन सांगून पाठविले. त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानासी गाठीले. जेसरीवरी नेसरीवरी नवाब आला. त्यांनी गाठिले. मोंठे युद्ध जाले. अवकाश होऊन प्रतापराव सरनोबत तलवारीचे वाराने ठार जाले. रण बहुत पडिले. रक्ताच्या नद्या चालिल्या. त्याजवरी बेलोलखान विजापूरास गेला.

नुसार लढाई झाली . आणि बहलोल खानाला माघार घ्यावी लागली .

४)जेधे शकावली नुसार

शके १५९५ मध्ये शिवाजी महाराज पन्हाळयावर गेले तेंव्हा बहलोल खान यांची प्रतापराव व आनंद राव यांची लढाई विजापूर जवळ लढाई झाली आणि विजय मिळवला.

शके १५९५ , माघ वद्य १४, सिवरात्रीस बहलोलखानात व प्रतापराव सरनोबत यांचा झगडा निवटियास जाला. प्रतापराव पडिले. (जेधे शकावली)

प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.

५) कवी परमानंद आपल्या पर्णालपर्वतग्रहणाख्या मध्ये खूप जास्त वर्णन करून सांगतात की

विजापुरी सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर धावून आला. ही बातमी महाराज्यांस समजताच महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बहालोल खान शी युद्ध करण्यास रवाना केले. बहलोल खान सैन्य व प्रतापराव यांच्या सैन्याची भेट उमारणी इथे झाली. मराठ्यांनी बेलोलखानाच्या सैन्याची केलेली वाताहात कथन करताना, ह्या काव्यात सांगतात,

उमरानी गावाजवळ येताच बाहलोल खान स पत्र आले की, सर्जाखाना सोबत मुजाफर मलीक हा सैन्यासह रांगणा किल्ल्याच्या आसपास आहे. त्याला आपल्या बाजूला घेऊन तसेच सिद्धी मसूद, कर्नेलचा अब्दुलअजीज, नळदुर्गाच्या अलिकडील खिदिरखान हे तिन सेनापती आहेत. इतर सैन्य मदतीला मिळविण्यासाठी ह्या तीन सेनापतींनी दिलेरखानास भेटून सैन्य मागावे. अशाप्रकारे सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी याला युक्तीने जिंकावे.

वरील सर्व बातमी छत्रपती शिवाजी महाराज्यांस समजताच, शिवरायांनी आपल्या प्रतापराव, आनंदराव मकाजी या सेनापतिंना बोलावून त्यांना सर्व डाव समजाविला. जो पर्यंत बहलोलखान जो आता स्वतः थोड्याफार सैन्यासह जवळच आहे तोपर्यंत त्याला एकट्याला गाठावे व जोरदार हल्ला करावा. महाराजांची आज्ञा घेऊन सेनापती निघाले.

रातोरात सर्वजण शत्रूच्या तलाव जवळ आले. नंतर योग्य संधी पाहून शत्रूच्या चहू बाजूंस पसरले. दुरून चहू दिशांस खूप सैन्य दिसू लागले. मग सर्वांनी तलावस वेढा घातला. सिद्धी हिलाल हे तेथे अघाडीवर होते. तेथून जवळपास एक कोसावर विठोजी शिंदे होते. कृष्णाजी भास्कर आणि विठ्ठल पिलदेव हे शत्रूच्या दोन्हीही बाजूला नजर रोखून होते. विसो बल्लाळ मात्र घिरट्या घालत होते. आत्ता पर्यंत आपण मराठ्यांच्या चक्रव्यूहात आडकल्याची शंका देखिल बेलोलखानाच्या फौजेस आलेली न्हवती.

रात्रीच्या वेळी हत्तींना पाणी पिण्यासाठी माहूत व इतर सैन्य जलाशया जवळ जावयास निघाले तेव्हा त्यांना कळून चुकले की आपण पुर्णपणे अडकले गेलो आहोत. याच वेळी घुळीचा लोट आसमंतात उधळीत प्रतापराव आपल्या हजार घोडेस्वारांनीशी शत्रूवर तुटून पडले. ह्या अकस्मात झालेल्या हल्याने बहलोल खानाचा सैन्य गोंधळून गेले. मात्र काहीच वेळात बेहलोल खान व त्याचे सैन्य देखील युद्धास सज्ज झाले. तुंबळ युद्ध सुरु झाले. चार तास युद्धाचा खणखणाट चालू राहिला.

मराठ्यांचा आवेश पाहून शत्रू सैन्य आता माघार घेऊ लागले. पराक्रमाची नशा चढलेल्या आनंदरावांनी काही मावळ्यांचे मदतिने शत्रू वर परत हाल्ला चढविला. मात्र यात आनंदराव जखमी झाले परंतु मागे हाटले नाहीत. तब्बल दोन तसमध्ये आनंदरावांनी शत्रू सैन्याची धुळधाण उडाविली.

बहलोल खानाचा मुख्य सरदार बर्कीच्या मृत्युची वार्ता ऐकून बहलोल खान जाणून चुकला की, त्याचा खेळ संपला आला आहे. मृत्यूच्या भितीने बहलोल खान प्रतापरावांना शरण आला. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. कृष्णाजी भास्कर यांनी शत्रूच्या सैन्याची लूट केली. कित्येक हत्ती, घोडे पाडाव झाले.

शरण आलेला बहलोलखान प्रतापरावांनी दाखविलेल्या मार्गाने मराठ्यांसमोर हार खाऊन मागे निघून गेला.

प्रतापराव माघारी फिरले. येताना वाटेत मोघलाईत असलेले सौदत्ती, , रामगीरी ह्या प्रदेशांची लूट करुन प्रतापराव स्वराज्यात परतले.

त्यानंतर विठोजी शिंदे यांचे सर्जा खानाशी लढताना त्यांचा मृत्यू झाला. नागज घाट , घटनांद्रे तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथे मृत्यू झाला.

याच पत्राचे भाषांतर शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २ पत्र क्र. १६२५ मद्ये देखिल पहायला मिळते.


प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारां बरोबर लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता.

वरील इंग्रजी पत्र व त्याचे मराठी भाषांतर पाहून लक्षात येते की, प्रतापरावां सामवेत आणखी सहा योद्धे नेसरीच्या खिंडीत मारले गेले. मात्र त्या सहा जणांची नावे कुठे च प्रमाणित पद्धतीने सांगता येत नाही . तसेच केवळ सहा योद्धे मारले गेले हे इंग्रजी पत्राखेरीज कोणालाच माहित नाही. काहींच्या मते प्रतापराव आणि सहाजण गस्ती साठी गेले होते जे पटत नाही कारण स्वराज्याचा सेनापती गस्ती घालत नाही .

प्रतापराव आणि आनंदराव मकाजी हे दोघे चांगले मित्र होते . क्वचितच एक्मेकेला सोडून राहत असत . यावेळेस ते बाहेर गेले असावे. नंतर आनंदराव मकाजी आणि हंसाजी मोहिते यांनी बहलोल खानाच्या सैन्याचा पाडाव केला . हंसाजी मोहिते ना नंतर हंबीरराव पदवी दिली गेली .

याच प्रसंगावर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी लिहलेले हे गीत…जे लतादीदींनी स्वरबद्ध केले.

“.श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥

संदर्भ

1) शिवकालीन पत्र सार संग्रह खंड २

2) सभासद बखर/जेधे शकावली

3)पर्णालपर्वतग्रहणाख्यान




Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...