शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष*
**********************************
*२३ फेब्रुवारी इ.स.१६२३*
राजे लखुजीराव जाधवराव यांचे ज्येष्ठपुत्र दत्ताजीराव जाधवराव व शहाजीराजे यांचे चुलत बंधु संभाजी भोसले यांचा स्मृती दिन. राजे दत्ताजीराव जाधवराव व संभाजी भोसले  यांचा मृत्यु २३ फेब्रुवारी १६२३ रोजी खंडागळे हत्तीप्रकरणात देवगिरीवर झाला. निजामशाही दरबारामध्ये  खंडागळे नावाचा एक सरदार होता .दरबाराचे काम संपवून सर्व सरदार मंडळी आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता  खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला व वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून तुडवू लागला. हत्तीवरती माहुत होता. तो हत्तीला आवरण्यासाठी प्रयत्न करत होता. पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावत होता. त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना ; त्या  पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजे जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना.कारण हत्तीने जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून उडवून दणादणा भुईवर  आदळले व पायाखाली चिरडून मारले. दत्ताजीं जाधवरावांचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले .हा पराभव दत्ताजी जाधवराव यांना  खुप झोंबला .दत्ताजी जाधवराव हत्तीहून जास्त पिसाळले व हत्तीवरच धावून गेले. स्वतः दत्ताजी जाधवराव हत्तीशी सामना करू लागले. त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड धडावेगळे केली. खूप गर्दी व गोंधळ, धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली. आपल्या हत्तीला  वाचवण्यासाठी खंडागळे  सरदार मध्ये पडले.  यावेळी मालोजीराजांचे बंधू विठोजी भोसले  व त्यांची दोन मुले संभाजी भोसले  व खेळोजी भोसले खंडागळे यांच्या मदतीला धावून आले.
खंडागळे हत्ती प्रकरण अनपेक्षितपणे घडलेली घटना होती. या प्रकरणामुळे जाधव-भोसले कुटुंबात तणावाचे वातावरण तयार झाले पण ते फार काळ टिकले नाही. मलिक अंबरने मात्र वरील प्रकरणाचा फायदा घेऊन लखुजी जाधवरावांना मात्र  कायमचे दूर केले .मलिक अंबर लखुजीराजे यांचा  कायमचा द्वेष करत होता. शहाजीराजे व लखुजीराजे यांच्यामध्ये कायमचे वितुष्ट निर्माण करण्याचे निजामाचे प्रयत्न होते; पण त्यात  त्याला फारसे यश आले नाही.आता काय म्हणायचे या दैवगतीला ? काय नाव द्यायचे ह्या यादवीला ? दत्ताजींच्या आणि  संभाजीराजांच्या राण्यांचे ! दोघींच्याही भाळी वैधव्य आले.बांगड्या फुटल्या... कशासाठी ?  काय कारण ?.. काही नाही ! काय तर म्हणे एक हत्ती बिथरला. पण म्हणून काय माणसाने एवढे बिथरायचे ?
जाधवरावांच्या सिंदखेडराजा परिसरात मुख्य व स्वतंत्र विद्यमान वंशजशाखा जवळखेड , उमरद , रुसुमचे या असुन सिंदखेडराजा परिसरा व्यतिरिक्त यांच्या विद्यमान वंशजशाखा भुईंज (सातारा), करवंड,कन्हेरखेड,वडाळी व सारवडी या होत...

*२३ फेब्रुवारी इ.स.१६६५*
(फाल्गुन वद्य ४, चतुर्थी शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार गुरुवार)
छत्रपती शिवाजी महाराजांचा कारवारच्या बाहेर खाडीच्या तोंडाशी मुक्काम होता येथे त्या शेरखानाने इंग्रज व तेथील सर्व व्यापार्‍यांकडून मोठी रक्कम जमवून ती नजराण्याच्या स्वरूपात शिवाजी महाराजांकडे रूजू केली...छत्रपती शिवाजी महाराजांना काळी नदीच्या जवळच इंग्रजांची व कंगोदेशाची अशी दोन गलबते नांगरून पडलेली दिसली, ही गलबते आपल्या ताब्यात द्यावीत असा निरोप महाराजांनी शेरखान यास पाठवला. शेरखानाने महाराजांचा गलबत ताब्यात देण्याचा निरोप इंग्रजांकडे पाठवला असता इंग्रजांनी उद्दामपणे निरोप पाठवुन गलबते देण्यास नकार कळवला. इंग्रजांचा उर्मट निरोप पोहचात, त्यांनी कारवार भाग सोडण्यापूर्वी या इंग्रजांची गुर्मी उतरवण्याची ठरवले, महाराज आपले पुढे गेलेले आरमार बोलवतात की काय अशी भीती इंग्रज आणि शेरखानास वाटू लागली. शेरखानाने इंग्रजांची समजुत घातली आणि कारवारच्या व्यापाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नजराणा अर्पण करत १२२ पौंड खर्च म्हणून महाराजांकडे पाठवण्यात आला. या सगळ्या घटना घडलेल्या इतिहासात नोंद असलेल्या तारीख आहेत २१ आणि २२ फेब्रुवारी १६६५...
स्वराज्यावर मिर्जाराजे जयसिंग हा चालून येत आहे हे समजतास छत्रपती शिवाजी महाराजांनी २३ फेब्रुवारी १६६५ रोजी कारवार सोडले आणि भिवगडाच्या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज काळी नदी (गोवा) ओलांडून रवाना झाले.
संदर्भ :- प.सा.स.१०४४

*२३ फेब्रुवारी इ.स.१६८१*
(फाल्गुन शुद्ध चतुर्दशी, शके १६०२, दुर्मती संवत्सर, वार शनिवार)
सरकारी खजिण्यातून मदतीचे औरंगजेबाचे आदेश!  मराठ्यांनी केलेल्या लुटीमुळे शहरात प्रचंड भितीचे वातावरण होते! जवळ जवळ महीना होत आला होता तरी नागरिक भयभीत होते. अशातच बु-हाणपुरच्या प्रतिष्ठित नागरिक, मुल्ला मौलवी, विद्वान मंडळीनी बादशहाकडे अर्ज केला की, "असाच काफरांचा जोर राहिला तर आमची वाताहत होईल. अब्रू व संपत्ती नष्ट झाली आहे." या अर्जाने औरंगजेब आपल्या नाका सरदारांवर अजुनच चिडला. त्याने खानजहानला कळविले की, दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः येत आहे. त्यानंतर औरंगजेबाने खानजहानची मनसब वाढविली होती ती कमी करून टाकली. औरंगजेबाने ज्यांची लुट झाली आहे त्यांना सरकारकडून खैरात म्हणून १० हजार रुपयांची मदत करण्याचे फर्मान सोडले. यावरून बुन्हाणपुरची काय अवस्था केली असेल महाराजांनी याची कल्पना येते.

*२३ फेब्रुवारी इ.स.१६८५*
मराठ्यांनी बारदेशवर हल्ला चढविला! 
त्यामुळे चिडून जाऊन दोन्ही वकिलांना नजरकैदेत ठेवले. मराठ्यांचे वकिल नाराज झाले व किल्ले रायगडला आलेल्या, पोर्तुगीज वकिल फ्रें. आंतोवियूद सांवजुसेफ यास त्याने या बाबतीत मध्यस्थी करणे किती गरजेचे आहे हे खडसावून सांगितले.

*२३ फेब्रुवारी इ.स.१७१९*
हुसेनअलिची बादशहाशी भेट ठरविण्यात आली! 
मराठ्यांची फौज आणि हुसेनअली औरंगजेबाच्या तोतया नातवाला घेऊन दिल्लीला निघाली. एक हत्ती सजविण्यात आला होता. त्यावर एक आंबारी कसण्यात आली होती. सकाळपासूनच लोक, "औरंगजेबाच्या नातवाच्या" पाया पडले. यावेळी बादशहा फर्रखसियरचे धाबे दणाणले होते. हुसेनअली कोणता डाव खेळतो आहे याचा अंदाज काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण त्याला धड कोणतीही बातमी मिळत नव्हती. हुसेनअली दरबारात आला. बादशहाच्या कदमबोसीसाठी तो वाकला असता बादशहाने स्वहस्ते त्याला खांदे धरून वर उठविले आणि त्याला आलिंगण दिले. इतर बोलणी झाल्यावर बादशहाने मुइनुद्दीन हुसेनचा प्रश्न काढला. "मराठ्यांचे सर्व लोक कैदेतून सोडल्यावर मुइनूद्दीनला तुमच्या हवाली करण्यात येईल असे हुसेनअलीने सांगितले". बादशहा आणि हुसेनअली यांची ही बैठक ३, तीन तास चालली. मग हुसेनअली परत आला. हुसेनअलिची बादशहाशी भेट ठरविण्यात आली.

*२३ फेब्रुवारी इ.स.१८७६*
संत गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले.

*२३ फेब्रुवारी इ.स.१८७९*
हुतात्मा हरी मकाजी नाईक, म्हणजे इतिहासातील एक दडलेलं कर्तत्ववान व्यक्तीमत्व, क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जीवन चरित्रावरून प्रेरणा घेऊन अनेक शूर लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी तयार झाले, त्यापैकी एक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी १८५७ च्या उठवानंतर इंग्रजांविरुद्ध गनिमी काव्याने लढण्याचा निश्चय करून बंड उभे केले. ब्रिटीश प्रशासनाला मदत करणाऱ्या धनदांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये फौज निर्माण करण्याचा मनसुबा आखला आणि सर्व जाती धर्म समावेशक अशी फौज निर्माण करण्यासाठी त्यांनी रामोशी महार, मातंग, कोळी, कुणबी, मराठा, चांभार न्हावी आणि मुसलमान अशा विविध जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून बंड उभे केले. यातील सर्वात मोठा सिंहाचा वाटा होता तो रामोशी समाजाचा.
 इसवी सन १८७७ च्या सुमारास फडकेंनी पुणे, सातारा, सांगली. सोलापूर परिसरातील रामोशी समाजाची चाचपणी करण्यास सुरवात केली व एक बंड उभे केले. या बंडाची दिशा क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रमाणेच होती. ब्रिटीश प्रशासनाला हादरविण्यासाठी धनदांडग्यांच्या घरावर दरोडे घालायचे आणि त्या पैशाचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करायचा. या कार्यातील त्यांचे प्रमुख शिलेदार होते दौलतराव नाईक आणि हरि मकाजी नाईक.त्याच्यातील धाडसी वृत्ती आणि नेतृत्व गुण लक्षात घेऊन वासुदेव बळवंत फडकेंनी त्याचे कर्तुत्व सन्मार्गी लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले. क्रांतिवीर उमाजी नाईकांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणे किती मोलाचे आहे याचे महत्व पटवून देण्यासाठी फडकेंनी वारंवार हरीच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्याला स्वातंत्र्य संग्रामासाठी कार्य करण्याची गळ घातली. काम दरोडा घालण्याचेच होते परंतु ते देशसेवेसाठी करावयाचे होते व त्याची झळ गोरगरीब जनतेला बसू द्यायची नाही हे उद्दिष्ट समोर ठेऊन फडकेंनी उभ्या केलेल्या बंडात तो सह्भागी झाला. बंडाचे पहिले निशाण उभे केले ते २३ फेब्रुवारी १८७९ शिरूर जवळील धामरी गावातील ब्रिटीश प्रशासनासाठी काम करणा-या मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकून तेथील कर्ज वचनचिठ्ठी आणि खतावण्या जाळून टाकल्या आणि गोरगरीब जनतेला सावकारी जोखडातून मुक्त केले. त्यानंतर दावडी निमगाव, पानमळा असे करीत करीत जेजुरी जवळील वाल्हे गावामध्ये ५ मार्च १८७९ रोजी मारवाड्यांच्या घरावर दरोडा टाकला. या सर्व प्रकाराने भयभीत झालेल्या इंग्रज सरकार कडून  हरीला पकडून देणाऱ्यास अथवा त्याची माहिती माहिती कळविणाऱ्यास एक हजार रुपयाचे इनाम जाहीर करण्यात आले.

  जय जगदंब जय जिजाऊ
  जय शिवराय जय शंभूराजे
           जय गडकोट
       !! हर हर महादेव !

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४