कृष्णा खोरे दहशतीच्या विळख्यातून मुक्त करणारे, गाव टग्याचा कर्दनकाळ अन्याया विरुद्ध बंड कारणारे रक्तरजित थरार निर्माण करणारे ते जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना सुद्धा अध्यात्मिक वृत्तीतून प्रवचन करून प्रबोधन करणारे बापू बिरू वाटेगावकर

बापू बिरू ची दहशत संपूर्ण कृष्णाकाठ भागांमध्ये होती.जुने जनते सातारा, सांगली, कोल्हापूर या नावाला चागलेच परिचित आहेत.
पोरींना नादवत नसले की बापू भाऊ म्हूणन उभा राहायचा..!!
 भाऊबंदकी वाढली की घर घर फुटली की सगळ्याना शेवट पर्याय बापू बिरूच असे...!!
 हजारो माणसाच्या एका हाकेवर धावून जाणारा बापुबिरु. सर्वांना आपलासा वाटायचा.
 महिलांवरील अन्याय अत्याचार वाढले कि बापू बिरू आठवायचा..!!
 चोर दरोडेखोरांवर सुधा दहशत बसवणारा.. बापू बिरू.!!
 गाव टाक्यांचा कर्दनकाळ म्हणजे बापू बिरुच बरका..!!
 सावकारांनचा कर्दनकाळ सुद्धा बापू बिरूच..!!
 कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये मुक्त संचार करणारा बापू बिरूवर पोलिसांनी मोठमोठी ईनाम लावली.. पण न्यायासाठी लहान पोरांसाठी आपला वाटणारा बापूसाठी जनतेला कोणीच फुटला नाही..

 तब्बल पंचवीस वर्ष बापू पोलीस यंत्रणेला गुंगारा देत राहिले.

 बापू बिरु हे धनगर समाजातील. पण  त्यांनी सर्वच समाज म्हणजे आपलं कुटुंब असे वर्तन ठेवले.अन्याय विरुद्ध बंड करून हातात कुराड घेऊन संरक्षण केले.


कृष्णा-वारणा खोऱ्यात बंदूक आणि कुऱ्हाडीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या बापूबिरूवाटेगावकरचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे़ एखाद्या गुन्हेगाराला समाजमान्यता मिळण्यामागचे कारण काय असाव.?

कारण अन्याय करणाऱ्या चा बापूनी गावगुंडांचा खातमा केला.


२५ वर्षे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन १२ खून केले. यांपैकी केवळ एका खुनात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.



गावगुंडांवर प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या बापूने शिक्षा भोगल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात ‘अध्यात्मा’त रममाण होण्याचा प्रयत्न केला़ हे ‘अध्यात्म’ बापूच्या गावों गावी प्रवचन होतं होती...

 यात कायद्याच्या दृष्टीने बापू कायमच गुन्हेगार ठरले , तर लोकांच्यादृष्टीने ते रॉबिनहूडपेक्षा कमी नाही.

पाहूया बापूच्या रक्तरजित ऐतिहासिक पार्श्वभूमी.

 गाव गुंडांनी मनमानी सुरू केली. यातूनच गावगुंडांच्या टोळ्या वाढल्या. बोरगाव हे वाळवा तालुक्यातील सुजलाम सुफलाम गाव .

  कृष्णा नदीचा वेढा आणि सुपीक जमिमीनुळे बारमाही शेतं हिरवीगार. रोजगाराच्या उपलब्धतेमुळे बाहेरचे मजूरही बोरगावसह आसपासच्या वाड्यावस्त्यात येऊन राहिले. गावगुंडांच्या नजरेतून हे गरीब मजूर आयती शिकार ठरत होते.

त्यांच्या कोंबड्या पळवणे, शेतशिवारातून बोकड, शेळ्या उचलणे असे प्रकार वाढत होते. याच्याविरोधात बोलायची सोय नव्हती. कुणी बोललाच तर त्याला धमकावून मारहाणही व्हायची. बोरगावचा रंगा शिंदे हा गावगुंडांच्या टोळीचा म्होरक्या होता. त्याचा उपद्रव इतका वाढली की, त्याने एक दिवस गावातील एका महिलेवर जबरदस्ती केली. या महिलेने बापू कडे भावाच्या नात्याने मदत मागितली.  आणि बापू भावासारखा त्याच्या पाठीमागे उभा राहिला. परंतु येथूनच रक्तरंजित इतिहासाला वेगळे वळण लागणार होते.

अगठा बहादूर असरलेले बापू बोरगाव च्या तालमीत घाम गाळत होते. बापूने चांगली शरीरयष्टी मिळवली.
आईवडिलांकडून मिळणारी तोंडी माहिती, ओव्या, कीर्तन आणि प्रवचन हेच त्याचे शिक्षणाचे साधन. घोंगडं अंगावर टाकून दिवसभर मेंढरांमागे पळणे, पोटभर खाणे आणि पैलवानकी करणे एवढाच नित्यक्रम सुरू होते.

 रंगा शिंदे व त्याच्या टोळीचे  कारनामे रोज त्याच्या कानावर येत होते, मात्र त्याचे गांभीर्य कळत नव्हते.

 गणेशोत्सवात गावात मंडळासमोर ओव्यांचा कार्यक्रम सुरू होता. रात्री ओव्या रंगात आल्या आणि रंगाने बायकांमध्ये शिरून दंगा सुरू केला. बायकांची पळापळ झाली. बापूने रंगाला बाजूला घेऊन पान सुपारी दिली. ओव्यांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आणि काही वेळातच बापूने चाकूने रंगाचा कोथळा बाहेर काढला. १९६६ मध्ये बापूच्या हातून हा पहिला खून झाला.
 तिथूनच रक्तरंजित इतिहासाची सुरुवात बोरगाव मध्ये सुरू झाली.

 यानंतर फरार झालेला बापू पोलिसांना २५ वर्षे सापडले नाहीत .

रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगाव पंचक्रोशीत लोकांनी पुरणपोळीचे जेवण केल्याच्या आठवणी काही जुने लोक सांगतात.


रंगा च्या भावाने बदला घेण्याची शपथ घेतली, त्यामुळे मात्र बापूने त्यालाही संपवले.

यानंतर रंगा शिंदेच्या मामाने बापूला मारण्यासाठी बंदुकीचे लायसन मिळवले.याची माहिती मिळताच बापूने रंगाच्या मामाला ताकारीच्या स्टँडमध्ये गोळ्या घातल्या.

 सलग तीन खून केल्याने परिसरात बापू बिरू वाटेगावकर नावाची दहशत निर्माण झाली. बापूविरोधात साक्ष देण्यासाठी कुणी धजत नव्हते.

त्यामुळे पोलिसांना पुरावेच मिळाले नाहीत. या काळात बापू बोरगाव, जुनेखेड, वाळवा, ताकारी, रेठरे हरणाक्ष, बिचूद, शिरटे, येडेमच्छिंद्र, खरातवाडी परिसरात दबा धरून बसले असावेत असं त्याच्या भाषणातुन दिसते .

 लोकांनी शेतातल्या वस्तीवर जागो जागी त्याच्या जेवणाची सोय केली. दरारा वाढेल तसे काही तरुण बापूकडे ओढले गेले. यातूनच ३५ ते ४० जणांची गँग तयार झाली असावी. अश्या  दंतकथा जुन्या जाणत्या माणसान कडून ऐकायला मिळतात.              गावगुंडांमुळे आपण पोलिसांच्या हाती लागू याची भीती बापूला होती. त्यामुळे अशा गावगुंडांना बापूने हेरून ठार केले.असं बापू भाषणात सांगत.


एकूण बारा खुनांची कबुली त्याने पोलिसांकडे दिली होती. मात्र बापूने यापेक्षा जास्त खून केल्याची माहिती पोलिस खासगीत चर्चे ला वाव येत . १२ खून करूनही बापूला केवळ रंगा शिंदेच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली. बापूने त्याच्या टोळीतीलही काही सदस्यांना संपवले असावे .

आपल्या नावाने कुणी लोकांना दमदाटी करून लूटमार करणे त्याला पसंत नव्हते. यातूनचार सहकाऱ्यांवर बापूने हल्ला केला. चुकीचे वागणाऱ्या स्वत:च्या मुलालाही बापूने मारले.

या साऱ्या घटना गेल्या 8-10 वर्षांत बापू स्वत:च सार्वजनिक कार्यक्रमांतून सांगत होते.



खूनसत्र सुरू झाल्यानंतर बापू तब्बल २५ वर्षे फरार होता. या काळात त्याला शेतकरी आणि मजुरांनीच तारले. जेवणाची शिदोरी शेतात पोहोच केली. पोलिसांच्या गाड्या पोहोचण्यापूर्वी बापूला निरोप पोहोचायचे. शिवारातील मंदिरांमध्ये आसरा मिळाला. या काळात काही पोलिसांनीही बापूला मदत केली असावी. बापूला मिळालेली बंदूकही एका पोलिसाचीच होती. असं सांगण्यात येते.

कृष्णा-खोरे दहशतीच्या विळख्यातून मुक्त केल्यावर एके दिवशी आपल्या लढयाला पूर्णविराम देऊन त्यांनी पोलिसांसमोर बिनशर्त शरणागती पत्करली. भारतीय घटनेनुसार बापू बिरू वाटेगावकर वर कित्येक खुनांच्या मालिकेचे गुन्हे दाखल झाले आणि त्यांना 'जन्मठेपेची' शिक्षा सुनावली. शिक्षा भोगून ते गावी परतले आणि त्यांनी उर्वरित आयुष्य भजन, कीर्तन आणि प्रवचनात व्यतीत केले. तंबाखू, सिगारेट व दारू अशा व्यसनांच्या आहारी जाऊन भरकटणारी तरुण पिढी वाचविण्यासाठी ते गावोगावी प्रवचने करत. बापू बिरु वाटेगावकरांनी हुंडा पद्धतीला विरोध करत कित्येक लेकी-सुनांचे नांदणे बसवले, कित्येकांची कर्जे मुक्त केली, कित्येकांच्या जमिनी सोडवून दिल्या यासाठी वेळप्रसंगी त्यांनी बंदूकही चालविली.

अगदी त्यांच्या स्वतःच्या मुलाने (तानाजी वाटेगावकर) पर-स्त्रीचे अपहरण केल्यावर त्यालासुद्धा त्यांनी गोळी घालून ठार केले.

असे म्हणतात की बापू बिरू वाटेगावकर फरारी असताना कुख्यात चंदनतस्कर "वीरप्पन" ने त्यांना बोलावून घेतले आणि त्याच्या टोळीत सामील होण्यास सांगितले, यावर बापू बिरू वाटेगावकर गरजले.. "तू एक तस्कर आहेस पैशासाठी तू जनावरे मारून तस्करी करतोस आणि मी सर्व-सामान्यांसाठी हाती शस्त्र घेतले आहे. आपले मार्ग वेगवेगळे आहेत."


 त्याने साताऱ्यातून बंदूक मिळवल्याचे पोलिस चौकशीत सांगितले होते. विशेष म्हणजे बंदुकीच्या गोळ्याही त्याला काही पोलिसांकडून मिळाल्या होत्या. या नेमक्या कुणाकडून मिळाल्या याबाबत मात्र अखेरपर्यंत मौन बाळगले.

१९९० मध्ये बापूला तत्कालीन पोलिस निरीक्षक मदन पाटील यांनी जुनेखेडच्या परिसरात बाभळीच्या बनात जेरबंद केले. कळंबा जेलमधील बापूला पोलिस बंदोबस्तातून काढून पळवण्याचाही प्रयत्न झाला.



सांगली कोर्टातील सुनावणी आटोपून कोल्हापूरला परतताना शिगावचा गुंड रवी कांबळे याने तमदलगेजवळ एसटी अडवून बापूची सुटका केली होती. यानंतर काही वेळातच पोलिसांनी जत तालुक्यातील उमदीजवळ त्याला जेरबंद केले. जन्मठेपेची शिक्षा भोगताना तुरुंगात चांगल्या वागणुकीचा फायदा मिळाला.


शाहीर बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा आणि मंगला बनसोडे यांच्या तमाशातील वगनाट्याने बापूला जनमानसांत पोहोचवले. किंबहुना, बापूची प्रतिमा निर्माण केली.

फरार असलेल्या काळात एकदा बापू बहे-बोरगावच्या रामलिंग बेटावर गेल होते . सोबत चार साथीदार होते. मध्यरात्रीच्या सुमारास रामाचे दर्शन घेण्यासाठी पुजाऱ्याला उठवले. तेव्हा स्वामी जोगळेकर महाराज मंदिरात भेटले. जोगळेकर महाराजांनी बापूला माळ दिली. 'मांसाहार मस्तीची वस्तू आहे. व्यसन सोड आणि पैशांचा मोह करू नको,' असा सल्ला त्यांनी दिला.आणि मंत्र दिला.
यानंतर बापूने मांसाहार आणि व्यसन केलेच नाही. जन्मठेपेच्या काळात अध्यात्मिक वृत्ती आणखी वाढली.

 अभंग तोंडपाठ झाले. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची संगत सुटली. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात अंतर्बाह्य बदल झाला होता. बापू प्रवचने देऊ लागले .

खून केलेल्या गुंडांचे कारनामे सांगून त्याने समाजात स्वत:बद्दल सहानुभूती निर्माण केली होती.आणि अन्याय विरुद्ध बंड करावे.अशी शिकवण दिली 

अन्यायाविरोधात लढणारा ढाण्या वाघ, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.

वयाच्या ९६ व्या वर्षी १६ जानेवारीला सांगलीच्या आधार हॉस्पिटल मध्ये  निधनं झाले.


"बोरगांवचा ढाण्या वाघ" हा किताब
त्यांच्या जीवानावर आधारित "बोरगावचा ढाण्या वाघ" नावाने सिनेमा निघाला आहे. त्यात मिलिंद गुणाजीने बापूंची भूमिका केली आहे.
त्यांच्या जीवनावर ’कागल तुरुंगातला कैदी - बापू बिरू वाटेगावकर’ नावाचे नाटक आहे. नाटकाची निर्माती विठा भाऊ मांग यांची मुलगी--मंगला बनसोडे हिने केली होती.
बापू बिरु वाटेगावकरांच्या पावलावर पाऊल टाकत एका गुन्हेगाराने तुरुंगातून पलायन केले होते, ही कथा एका बातमीचा विषय होती.
हैद्राबाद येथील बलात्कार झाला होता तेव्हा बापू ची सर्वात जास्त आठवण काढली
आजच्या आधुनिक काळातील जणु महाराजांचे रूप घेऊन च जन्माला आले होते बापू.

 





Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४