*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिन विशेष
*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिन विशेष
*१७ फेब्रुवारी इ.स.१६७९*
शके १६००, कालयुक्त संवछरे पौष शुद्ध १०, दशमी
युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत!
शिवाजीराजे कित्येक कामांबद्दल शंभूराजेंशी त्रासून कंटाळले होते. यामुळे शंभूराजेंबद्दल महाराजांच्या मनात फारच वाकडेपणा येऊन शिवाजीराजे अत्यंत त्रासले होते..... शिवाजीराजांनी मनात आणले की, शंभूराजेस हर एक बहाण्याने पकडून जीवे मारावे किंवा कैद करावे. शंभूराजेंने शिवाजीराजांचा इरादा ओळखला व दिलेरखानाकडे जाण्याचा त्यांनी निश्चय केला. दिलेरखानाला पत्र दिले व दिलेरखानाला मिळण्यास निघाले. १७ फेब्रुवारी ला सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या अधिकाऱ्यांना कळवितात, 'दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी त्यांच्यावर (शिवाजीराजेंवर मोठा) विजय मिळविला आहे. सर्वात त्यांची मनःशांती अधिक ढळवणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र (संभाजी) त्यांच्यावर नाखूष होऊन बादशाही सरदार दिलेरखान याच्याकडे निघुन गेले.
(Which hath more disturbed him is that his eldest son hath left him in high discontent and is fled to owne Dillele Kaune (dilerkhan) a great Umbrow of this king's lying neere his country and as fame gives out resolves to turne moore....)
जेधे शकावलीतील नोंद -
शके १६०० कालयुक्त संवछरे पौष शुध १० संभाजीराजे परली गडावरून निघुन दिलेरखाना कडे गेले त्यांनी त्यासी हप्त (सप्त) हजारी दिली, सन्मान केला."
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८३*
शहजादा अकबराविषयीची अखबारातून नोंद! "नादान अकबराने बंडखोराने आपल्या अधिकारात नविन २ हजार स्वार व २ हजार पायदळ चाकरीत ठेवले होते. त्यांचा पगार छत्रपती संभाजी महाराज देत असत. "छत्रपती संभाजी महाराजांनी एक पोवळ्याची माळ व एक हत्ती नादान अकबरास बंडखोरास भेट म्हणून दिला होता. परंतू नादान अकबराने बंडखोराने एका वेश्येस मुसलमान करून आपल्या घरी ठेवले व तिला माळ वगैरे भेट म्हणून आलेले तीस बक्षिस दिले. ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली. "नादान अकबरास बंडखोरास निरोप पाठविला की, मी माळ वगैरे तुझ्यासाठी भेट दिली होती". "नादान अकबराने ऊत्तर पाठविले की, आम्ही बादशहा आहोत. मनास येईल ते करू". "नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी निरोप पाठविला की, तुझ्याकडील वस्तू मजकडे पाठवावी." "त्यामुळे नादान अकबर लाचार झाला. त्याने डेरा जाळून टाकला व फकीर बनून फिरंग्यांच्या मुलखात निघाला होता." "छत्रपती संभाजी महाराजांनी फिरंग्यांना लिहिले की, नादान अकबरास बंडखोरास जाऊ देऊ नये". तेव्हा त्यांनी त्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे नादान अकबर बंडखोर परत येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखात रहात होता. तेथे रहात आहे म्हणून बादशहा गप्प बसला.
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८३*
विजरईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!छत्रपती संभाजी महाराजांचे वकील येसाजी गंभीर इकडे आले असून ते माझ्याशी तहाची बोलणी करीत आहेत. पण राजांनी त्यांना व शिष्टमंडळास तहावर सही करण्याचे अधिकार दिले नाहीत. राजांचे हे वेळकाढूपणाचे धोरण योग्य नाही. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य आणि आरमार आपणावर चालून येत आहे. आम्ही त्या सैन्यास आणि आरमारास आमच्या राज्यातून वाट दिली आहे. मोगलांशी आमचा तह होण्यापूर्वी तुमचा तह होणे गरजेचे आहे.
*१७ फेब्रुवारी इ.स.१६८९*
(फाल्गुन शुद्ध ८, अष्टमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)
छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर बादशहाच्या दरबारात उभे करण्यात आले. इश्वरदास म्हणतो की, बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलासखान व हमीदुद्दीनखान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचविले, पण या बाणेदार महाराजांनी बादशहा समोर यत्किंचितही मान झुकविली नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहीले. "आपल्याला गेली ८ वर्षे भुंड्या डोक्याने, किमाँश न घालता रानोमाळ, सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा" छत्रपती संभाजी महाराज कशासच बधत नाहीत हे पाहून किमान छत्रपती संभाजी महाराजांनी पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनूसार छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले गेले.
*१७ फेब्रुवारी इ.स.१७३८*
पोर्तुगीजांनी धारावी जिंकला.१५ फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रु द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे ३०० ग्रेनेडियर्स आणि १४४० एतद्देशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसीक कडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक १७ फेब्रुवारी सन १७३८ रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी, नाईकमंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याने निकराचा लढा दिला परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. "यावेळी मराठ्यांची पाचसातशे माणसे मेली. पाचशे कैद झाली. पोर्तुगीजांकडील बारा सैनिक व सरदार मॅसेडो ठार झाले." अशी नोंद आहे.
*१७ फेब्रुवारी इ.स.१७३९*
मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.
*१७ फेब्रुवारी इ.स.१७६४*
निजामाच्या मोहिमेवरून परतल्यावर माधवरावांनी दि. १८ सप्टेंबर १७६३ या दिवशी पुण्याच्या पुन:भारणीसाठी कामाला सुरुवात केली. अनेक पेठांची पुनर्रचना करून नवीन पेठा वसवण्यास जागा दिल्या. निजामाच्या स्वारीत ज्या लोकांच्या घरांचे नुकसान झाले होते, त्यांना सरकारातून नुकसानभरपाई देण्यात आली. एकूणच राक्षसभुवनाच्या लढाईनंतर माधवरावसाहेबांची हुशारी, मुत्सद्देगिरी आणि कर्तव्यतत्परता नुसती पुण्यालाच नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानालाच दिसून येऊ लागली. दि. १७ फेब्रुवारी १७६४ या दिवशी माधवराव पेशवे मोहिमेवर निघाले. पानिपत-उदगीरच्या सुमारासच म्हैसूर संस्थानात हैदरअलीचा उगम झाला होता. त्याच्या उपद्व्यापांना लगाम घालण्यासाठी पेशवे दक्षिणेत निघाले. याआधीही १७६२ मध्ये माधवरावांनी धारवाडवर स्वारी केली होती. आताच्या स्वारीत गदग, उंबळी, कुंदगोळ इ. ठाणी जिंकून माधवरावांनी तुंगभद्रेच्या उत्तर तीरांपर्यंतचा मुलुख जिंकून घेतला. याला प्रतिकार करण्यासाठी आलेल्या हैदरला माधवरावांनी धारवाड आणि सावनूरच्या लढाईत सपशेल हरवले. शेवटी कर्नूळच्या जवळ असलेल्या अनंतपूर येथे पेशवे आणि हैदरअली यांच्यात तह झाला. या तहानुसार हैदरअलीने पेशव्यांना ३२ लाख रुपये रोख खंडणीदाखल दिले. जून सन १७६५ मध्ये माधवराव पेशवे कर्नाटकाच्या स्वारीवरून पुण्यात परतले.
*१७ फेब्रुवारी इ.स.१८८३*
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू,
(जन्म : शिरढोण, महाराष्ट्र, ४ नोव्हेंबर १८४५)
त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
Comments
Post a Comment